रात्र पाऊस पाऊस
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
34
अश्या कोंदटल्या राती
टपकत्या मेघांसवे
मन मोकळे करावे
घ्यावी वाटून आसवे
ओला बधीर गारवा
घ्यावा वेढून जरासा
गोठाव्यात संवेदना
थोडा मिळावा दिलासा
झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://roopavali.blogspot.com)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुपर्ब! रमड, काय मस्त लिहितेस
सुपर्ब! रमड, काय मस्त लिहितेस गं! एक एक ओळ खास!
मजा आ गया!
खूप छान.
खूप छान.
Jabaree! Faar avadalee..
Jabaree!
Faar avadalee..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिन्नु, बी, आनंदयात्री...
चिन्नु, बी, आनंदयात्री... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वाह!!!! झिरपत्या
व्वाह!!!!
झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे<<<< टू गूड!
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
जियो....! मस्त!
जियो....! मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
लाजो, शशांक, मी_आर्या,
लाजो, शशांक, मी_आर्या, बंडोपंत .... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे! कविता वाचताना
मस्त आहे! कविता वाचताना वातावरण उभं राहिलं की भारी वाटतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरे कडवे मस्तच र्मड.
दुसरे कडवे मस्तच र्मड.
चिखल्या, मॅक्स, बुवा,
चिखल्या, मॅक्स, बुवा, असामी.... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भयानक सुंदर ! गारव्यासाठी
भयानक सुंदर !
गारव्यासाठी 'बधीर' हे विषेशण मस्तच.
या कवितेवरुन आठवलं -
या कवितेवरुन आठवलं -
http://www.maayboli.com/node/41589
(उगाच रिक्षा वाटत असल्यास कळवा - उडवेन ही पोस्ट)
चांगली रचना !
चांगली रचना !
अमित, मुक्तेश्वर ....
अमित, मुक्तेश्वर .... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांक... काही हरकत नाही. त्यानिमित्ताने मला तुमची ही कविता वाचण्याची संधी मिळाली.
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! खूपच छान कविता.
व्वा! खूपच छान कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता आवडली. (उन्हाळ्यात
कविता आवडली.
(उन्हाळ्यात पावसाची कविता वाचून जरा बरं वाटलं)
व्वा ! थोडक्यात पण छान
व्वा ! थोडक्यात पण छान मांडलंय.
दुसरं कडवं विशेष वाटलं.
कविन, शोभा१२४, नंदिनी,
कविन, शोभा१२४, नंदिनी, भिडेकाका .... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त शेवटचं कडवं खास आवडलं.
मस्त शेवटचं कडवं खास आवडलं. सुंदर कविता
नंदिनी, अगदी अगदी..उन्हाळ्यात
नंदिनी, अगदी अगदी..उन्हाळ्यात गारवा आला.
अमेय, भारती.... धन्यवाद!
अमेय, भारती.... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा: छान!! मला ही कविता वाचुन
वा: छान!!
मला ही कविता वाचुन गारवा अल्बम मधील गाणे आठवले--
'पाऊस दाटलेला, माझ्या मनातला हा
दारास भास आता, हळुवार पावलांचा.....,पाऊस दाटलेला...'
धन्यवाद मधुरीता!
धन्यवाद मधुरीता!
रमडस मस्त कविता !
रमडस मस्त कविता !
अप्रतिम कविता रे रमड
अप्रतिम कविता रे रमड
Pages