Submitted by अवल on 18 March, 2013 - 00:08
वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला
आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.
मग जरा स्वतःचेच डोके चालवले. थोडे प्रयोग केले, थोडी उसवाउसव झाली पण प्रयत्न सोडला नाही. जमलेले डिझाईन मग वंदनाला बक्षिस म्हणुन पाठवले.
मला त्या फोटोतल्या प्रमाणे मॉडेल मिळाले नाही. मग मी आपले ते सोफ्यावरच चढवले.
या डिझाईनची गंमत अशी की हे दोन पद्धतीने घालता येते. वर दाखवलेय तसे व्हि नेक चे किंवा खाली दाखवलेय तसे बोट नेक चे
पूर्ण उलगडले की पोंचू असा दिसतो
बघा बरं तुम्हीच सांगा जमलेय का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवल छानच झालाय गं पोंचू
अवल छानच झालाय गं पोंचू
अवल खुप छान झाला आहे ग. माझी
अवल खुप छान झाला आहे ग. माझी आई पुर्वी क्रोशे कामातून बरेच रुमाल करायची. त्यात गुलाबाची फुल पण असायची. मी लोकरीपासून क्रोशाची रुमाल करते पण क्वचीत. तू खुप छान करतेस हे विणकाम.
माझ्याकडे एक क्रोशाचे पुस्तक आहे. त्यातल्या डिझाइन्स देऊ का मी तुला. मी मागे त्यातील एक फुलपाखरू च्या आकाराचा रुमाल केला होता. तो मी एकीला रुखवतीत दिला.
अवल हे मॉल मधे पाहिले.
अवल हे मॉल मधे पाहिले. तुझ्यासाठि हे फोटो! दुसरा फोटो काढनाता मुलाने घरि चल म्हणुन ओढायला सुरुवात केलि म्हणुन पटकन काढला. म्हणुन नीट नाहि आलाय.सध्या बर्याच शॉपमधे या स्टाईल चे टॉप दिसतायत.
अरे, प्रिया, कित्ती छान आहे
अरे, प्रिया, कित्ती छान आहे हा पॅटर्न . धन्यवाद. इथे खुप दिवसांनी आले त्यामुळे आता बघतला. धन्यवाद ग
हा नवीन अर्चनाने करायला सांगितला म्हणून. धन्यवाद ग
पूर्ण उलगडून
बोट नेक घातला तर
व्हि नेक घातला तर
कित्ती सुंदर दिसतोय गं हा
कित्ती सुंदर दिसतोय गं हा पोंचू!! रंग पण खूप मस्त आहे.
खूप आवडला.
पांढरा आणि निळा, दोन्ही रंगात
पांढरा आणि निळा, दोन्ही रंगात सुंदर दिस्तोय. निळा जास्त आवडला.
मला खूप आवडला असा करायचाय
मला खूप आवडला असा करायचाय मला. शिकव ना. मी पण होते तुझी ऑनलाईन विद्यार्थिनी
Beautiful.....
Beautiful.....
अप्रतिम, अवलजी, माझि आई
अप्रतिम,
अवलजी,
माझि आई तुमच्या क्रोशा work चि खुप मोथि पन्खि आहे, आणि तिला हा अननसाचा patern शिकायचा आहे, तर आपण pls आपल्या शिकाशिकवा blog वर सभसद कसे होता येइल ते कळवाल का?
तिने इथे बघुन माझ्यासाथि एक crochet ponchu and crocket stoll बनवला आहे, पण मला फोटो upload करता येत नाहि आहेत.
pls reply.
धन्यवाद सर्वांना वेल,
धन्यवाद सर्वांना
वेल, sweetupie तुम्हाला विचारपूस मध्ये उत्तर दिलय
सुंदर.
सुंदर.
Pages