=================================================
=================================================
पूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आई आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे. अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, "अरे, याला अमुक अमुक म्हणतात का?" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी "आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.
आपणांसही या सार्या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काहि वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.
ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.
=================================================
=================================================
पान १
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:
अडुळसा, ब्राह्मी, अश्वगंधा, नागकेसर, मरवा, टाकळा, ओवा, वेखंड, रिठा, सब्जा, अक्कलकारा, कापूर तुळस, तमालपत्र, हाडजोडी, गवती चहा, हिरडा, वेलची, सागरगोटा, जायफळ, गुळवेल, सर्पगंधा, दंती, मेंदी, शेर, शतावरी, बेहडा, वनई उर्फ निरगुडी, रुई, रिंगण, पारिंगा, पानफुटी, माका, कोरफड, कडूलिंब, जास्वंद, गुंज, हळदकुंकू.
चर्चा आणि माहिती: विड्याचे पान, गुलबक्षीचे पान, गणेशपुजनात वापरण्यात येणार्या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग.
=================================================
पान २
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:
कुर्डु, गेळफळ/मैनफळ, पुनर्नवा (शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका),खडकी रास्ना, अग्निशिखा (कालिकारि, खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी).
रिगन या वनस्पतीची फळे नागीनी
रिगन या वनस्पतीची फळे नागीनी या रोगावर कशा प्रकारे वापरतात . या बाबत माहिती मिळावी.
अतिशय उपयुक्त धागा आभार जागु
अतिशय उपयुक्त धागा आभार जागु आपलेही आभार
उत्तम धागा. पर्किन्सन्सवरिल
उत्तम धागा. पर्किन्सन्सवरिल अश्वगंधा आणि कवचबीचा उपयोग सांगितल्याबद्दल धन्यवाद कवचबिमध्ये प्रकार असतात का?ब्रह्मीहि पार्किन्सन्सला चांगली म्हणतात.त्यातहि प्रकार असतात का?
छान धागा, जिप्सी.
छान धागा, जिप्सी.
एरंडाच्या झाडाचा फोटो नाहिये
एरंडाच्या झाडाचा फोटो नाहिये का कुणाकडे. एरंडाचे पण औषधि उपयोग भरपुर असतात. काविळिवर, पोटदुखिवर कामा येतात एरंडाची पाने. तसेच तेलाचे सुद्धा भरपुर उपयोग आहेत. एरंडामधे लाल पानांचे आणि हिरव्या पानाचे असे २ प्रकार सापडतात. त्यातले लाल पानांचे जास्त औषधि असते असे ऐकले आहे. ही विकि ची लिंक.
शेराचा उपयोग कानदुखीवर करतात.
शेराचा उपयोग कानदुखीवर करतात. हे झाड आमच्याकडे होते. त्यांच्या कांड्या नीट काढाव्या. त्याचा सफेद रंगाचा चीक येतो म्हणून सांभाळून तोडाव्या. चीक डो़ळ्यात उडता कामा नये. त्या कांड्या धूवून तव्यावर शेकाव्या. नंतर ठेचून त्याचा रस गाळून घ्यावा आणि दुखणार्या कानात घालावा. हा माझ्या आजीचा अक्सीर ईलाज होता.
सूज आणि दुखीवरही एरंडाची पाने गरम करुन शेकतात.
एरंड(नेटवर मिळालेला फोटो)
नीना धन्यवाद. एरंडाची ही पाने
नीना धन्यवाद. एरंडाची ही पाने थोड्या पाण्याबरोबर वाटुन त्याचा लेप पायाच्या भेगांवर लावायचा, भेगा लगेच भरुन येतात्.:स्मित:
पहिल्या पानावर असलेला
पहिल्या पानावर असलेला ओव्याच्या झाडाचा फोटो हा "पानओवा" आहे.म्हणजे फक्त पानाला वास ओव्याचा येतो,ओवा येणारे झाड वेगळे ते खाली दिलेल्या लिंक सारखे असते-
http://www.google.com/imgres?q=carom+plant&sa=X&biw=1280&bih=802&tbm=isc...
Asparagus म्हणजे शतावारी का?
Asparagus म्हणजे शतावारी का? Asparagus ची भारतात लागवड करणे किती फायदेशीर ठरेल?
वा व मस्त धागा इतके दिवस
वा व मस्त धागा इतके दिवस ह्या औषधी वनस्पतींची नाव ऐकून होते पण इथे फोटो पाहता आल्यामुळे त्या कश्या दिसतात तेही कळल , धन्यवाद जिप्सी
त्या फोटोमध्ये दाखवलेली हाडजोडी ही वनस्पती आहे ती इथे मिळणाऱ्या ड्रगन फ़्रुटच्या वनस्पती सारखी दिसत आहे . ड्रगन फ़्रुट च मराठी नाव काय आहे?
एरंडाच्या झाडाशी जरा जपूनच ,
एरंडाच्या झाडाशी जरा जपूनच , याच्या बिया विषारी असतात किंवा त्यात असणारी रसायने प्रत्तेकाला सहन होतातच असे नाही.
माझ्या माहितीप्रमाणे एरंडाचे
माझ्या माहितीप्रमाणे एरंडाचे तेल बियांपासुन काढतात. हे तेल औषधी आहे.
@meeradha | 16 April, 2013 -
@meeradha | 16 April, 2013 - 11:11
पहिल्या पानावर असलेला ओव्याच्या झाडाचा फोटो हा "पानओवा" आहे.म्हणजे फक्त पानाला वास ओव्याचा येतो,ओवा येणारे झाड वेगळे ते खाली दिलेल्या लिंक सारखे असते-<<
धन्यवाद मीराधा या माहितीबद्दल.
मी येथे याबाबत विचारण्यासाठीच आलो होतो तो उत्तर मिळाले.
माझ्याकडे कित्येक वर्षांपासून पहिल्या पानावरील प्रचितील ओवा आहे. पण त्याला कधी फूल आल्याचेही आठवत नाही. नुसतेच पान खातो. भजी केली तर कुरकुरीत होतात पण ओव्याचा स्वाद मात्र शून्य.
खरा ओवा कसा लावतात? ओवा बी पासूनच का? कोणी सांगेल?
पानफुटीचा उपयोग किडनीस्टोन वर
पानफुटीचा उपयोग किडनीस्टोन वर उपचारासाठी वापरतात असे ऐकले आहे. कोणास नेमकी माहिती आहे? माझ्याकडॅ पानफुटी आहे.
फारच माहीतीपुर्ण धागा.
फारच माहीतीपुर्ण धागा. अगदी वाचनीय. नेहमी उपयोगी पडेल असा. धन्यवाद.
तान्ह्या मुलाच्या टाळूवर
तान्ह्या मुलाच्या टाळूवर एरंडाचे पान, हळद, तेल, वगैरे बांधतात. टाळू भरण्यासाठी. (म्हणजे काय ते नक्की माहीत नाही.)
गजानन, अगदी लहान बाळाच्या
गजानन,
अगदी लहान बाळाच्या डोक्याला हात लावून पाहिलंत, तर "टाळू" म्हणजे कवटीचा वरचा सेंटरचा भाग मऊ लागतो. (अतीव हलक्या हाताने हा उद्योग करावा. धसमुसळेपणे नाही) तिथले हाड अजून कूर्चावस्थेत असते, कालांतराने ते कडक हाडात रुपांतरीत होते. याला टाळू भरणे असे म्हणतात.
बाळ जन्माला येताना कवटी हा आकाराने सगळ्यात मोठा पार्ट असतो. तो योनीमार्गातून बाहेर निघत असताना कवटी थोड्या प्रमाणात 'मोल्ड' होऊ शकते, ती याच मऊ टाळू मुळे. याला फाँटॅनेली असे म्हणतात, व अशा दोन मोठ्या जागा कवटीत असतात.
कोणतेही पान बांधणे, तेल लावणे, निरनिराळी वाटणे तिथे थापणे इ. उद्योग केले नाहीत तरी टाळू "भरणारच" असतो.
इब्लिस, माहितीबद्दल
इब्लिस, माहितीबद्दल धन्यवाद.
कोणतेही पान बांधणे, तेल लावणे, निरनिराळी वाटणे तिथे थापणे इ. उद्योग केले नाहीत तरी टाळू "भरणारच" असतो. <<< हो, ना. म्हणूनच पान बांधण्याच्या हेतूमागचे टाळू भरणे म्हणजे नक्की काय ते कळले नाही.
अजून येऊ द्या....
अजून येऊ द्या....
घाणेरी, टणट्णी, रायमुनीया
घाणेरी, टणट्णी, रायमुनीया हिचा एक उपयोग असाहि आहे कि डोकं दुखत असेल तर त्यावर उतारा...
असे वाचल्याचे आठवतयं. जाणकार क्रुपया अनुमोदन द्या.
हाडजोडी वनस्पतीच्या फुलांचा व
हाडजोडी वनस्पतीच्या फुलांचा व पानांचा फोटो पाठवा
रीठयांच्या पानांचा रस काढुन
रीठयांच्या पानांचा रस काढुन त्यात१ मिरी वाटुन नाकात टाकावा डोक दुखायच थांबत
रीठयांच्या पानांचा रस काढुन
रीठयांच्या पानांचा रस काढुन त्यात१ मिरी वाटुन नाकात टाकावा डोक दुखायच थांबत..............धन्यवाद मनेश....
dandelion म्हणजे कुठली
dandelion म्हणजे कुठली वनस्पती? याची मुळे वजन कमी करण्यासाठी वापरतात अशी माहिती मिळाली.
धागा संपला अरेरे ......
धागा संपला अरेरे ......
वेखंडाचे रोप मुंबईत कुठे
वेखंडाचे रोप मुंबईत कुठे मिळेल?
मला हा प्रश्न कुठे विचारु ते
मला हा प्रश्न कुठे विचारु ते कळलं नाही म्हणून इथेच विचारत आहे.
बाल्कनीत गवती चहा लावला आहे. त्याच्या मधून हिरवे कोंब आले आहेत पण त्याभोवतीची पाने पिवळट झाली आहेत. तर ती कापून टाकली तर चालेल ना?
आणि हिरवी पाने आणखी वाढण्यासाठी काय करायचे? ती आत्ता फूटभर वाढली आहेत.
Pages