Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुंडोपंत, आजवरच्या अनुभवातुन
गुंडोपंत, आजवरच्या अनुभवातुन सान्गतो की केवळ गुरू हाच एक ग्रह असा आहे की जो व्ययात देखिल वाईट फळ देत नाही. किंबहुना, गुरुचे विशेषत्व हे की तो ज्या स्थानी अस्तो त्या स्वस्थानाचीच हानि करतो (याच कारणामुळे फलित वर्तविण्याबाबतीत मी त्यास अतिशय फसवा ग्रह असे मानतो), पक्षी, व्ययस्थानाच्या फळाची हानी होणे हे जातकाचे दृष्टीने चान्गलेच ठरते. शिवाय गुरुची दुसरी नजर, अन तिसरी नजर अनुक्रम प्रथम व द्वितिय या भौतिक सुखाचे दृष्टीने आवश्यक स्थानान्वर पडत असल्याने बघण्यात असे आहे की भविष्यकालिन भरघोस घडामोडीन्ची पायाभरणी व्ययातिल गुरू करवुन घेतो. सबब व्ययातिल (बाराव्या) गुरुची धास्ती बाळगण्याचे कारण नाही.
नमस्कार, ह्या आधि हि मि हा
नमस्कार,
ह्या आधि हि मि हा प्रश्न भविश्य हया बिबि वर विचारला होता, पण अजुनहि उत्तराच्या प्रतिक्शेत,
कुन्डलीत थोडा period खराब होता, म्हणुन दररोज न चुकता, गुरुजिनी सान्गितल्याप्रमाणे, (In Specifice Pattern) मन्त्र जाप (दत्तमाला जप, गेले १० महिने) करुन हि जर जोडिदाराच्या (Spouse) मनातिल आपल्या बद्दलच्या भावना हळुवार करता येत नसतील तर.....काय??? प्रेम आणि परस्पर विश्वास भरपुर असुन हि कुठलि तरि अद्रुश्य शक्ती दोघानाहि एकमेकापासुन दुर ठेवत असेल तर काय करता येइल,
जाणकारानी Please मदत करा.
its urgent.
Sweetupie, मनमोकळेपणाने संवाद
Sweetupie,
मनमोकळेपणाने संवाद झाला आहे का?
ते सर्वात महत्त्वाचे!
सहजीवनात खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात
- . पैसा - दोघांचा दृष्टीकोन कसा आहे?
- . आईवडील (म्हणजे सासूसासरे) - दोघांचा दृष्टीकोन कसा आहे?
- . प्रेम करण्याच्या तर्हा - म्हणजे आपापल्या वागणूकीच्या अपेक्षा तपासून पाहायच्या.
- . जीवनाची मूल्ये - १००% नाही पण काही जुळली पाहिजेत.
( हे महत्त्वाप्रमाणे क्रमवार नाहीये!)
यातले काहीच जुळत नसेल तर कोणत्या ज्योतिषा कडे जाणार? कोणता तोडगा करणार?
कधी कधी आपापले वैयक्तिक दृष्टीकोनच निराळे असतात.
(रास आणि नक्षत्र कोणते आहे ते ही पहावे.)
अशावेळी सर्व काही जुळूनही मने जुळतीलच असे नाही.
काही राशीच एकमेकांना प्रतिकूल असतात. अशावेळी फार काही घडूच शकत नाही.
तरीही संवाद घडत असेल तर सुधारणेला वाव आहे.
कोणत्या घटनेमुळे/गोष्टीमुळे हळूवारपणा येत नाही? ती गोष्ट दूर करता येईल का?
गुरू पालटामुळे काही बदल घडेलच.
इतर तोडगे तज्ञ मंडळी सुचवतीलच.
गुरुचे विशेषत्व हे की तो ज्या
गुरुचे विशेषत्व हे की तो ज्या स्थानी अस्तो त्या स्वस्थानाचीच हानि करतो (याच कारणामुळे फलित वर्तविण्याबाबतीत मी त्यास अतिशय फसवा ग्रह असे मानतो)
लिंबुराव +१
नेमके विवेचन दिलेत. धन्यवाद. ग्रह फसवा आहेच. पण तसा फले देणारा...
भविष्यकालिन भरघोस घडामोडीन्ची पायाभरणी व्ययातिल गुरू करवुन घेतो. वा तुमची जोतिष्याकडे पाहण्याची द्रूष्टी किती सकारात्मक आहे. आनंद वाटला.
hello, majhi DOB
hello,
majhi DOB 10.11.1981
Birth time 2.45 p.m.
Birth place Mumbai ahe
majhye nokrit change karnya sathi upaya suchwa. khup prayatna karun hi yash nahi..
ekadha khada vaprava ka?
kahi sadhana karavayach asele tar tase suchwa.
waiting for your reply.
Regards
मनि१२३ १ जुन नंतर गुरू
मनि१२३
१ जुन नंतर गुरू तुमच्या लाभात येत आहे.
त्यामुळे जुन नंतर फरक पडेल असे वाटते.
तुमच्या शिक्षणाशी संबधित तुमचा व्यवसाय/नोकरी आहे का?
चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा चालली आहे त्यामुळे नोकरीत बदल करावासा वाटतोय पण शनी ते घडत नाहीये.
अजून धीर धरणे आवश्यक आहे असे वाटते.
<<...सबब व्ययातिल (बाराव्या)
<<...सबब व्ययातिल (बाराव्या) गुरुची धास्ती बाळगण्याचे कारण नाही.<<
लिंबुदा... माझी रास कर्क आहे. तुमच्या या वक्तव्यामुळे धीर आला.
Dear Panth, Thanks for kind
Dear Panth,
Thanks for kind reply.
majhya nokri ani shikshanacha kahi sambhand nahi.
2 varha me nokri satha prayantna karat ahe , mala nokri badal grajecha ahe.
adhicha pratisadal mhatlya pramaney ekadhya khada vaparnaychi garaj, kivha kahi mantra jap karava ka ya baddal suchya,
apalya margdarshanabaddal apli abhari
Mani
गुन्डोपन्तजी, DOB -
गुन्डोपन्तजी,
DOB - १०.apr.१९८४
birth time - 11.14 am
birth place - mumbai
दोघान्चे ३०.५ गुण जुळतात, आणि दोघान्च्या हि पत्रिकेत एकदाच लग्न आहे, म्हणुनच अनेकाना पत्रिका दाखवलि तरिहि सगळ्यानि एकच उत्तर दिले कि हे लग्न तुटणार नाहि, तरिहि मन्त्र जापाचा जो आवश्यक असा फायदा का होत नाहि आहे.
.
.
कर्क राशीसाठी सध्या दिवस कसे
कर्क राशीसाठी सध्या दिवस कसे आहेत जरा सांगाल का?
मीन राशी ला १ जुन नन्तर
मीन राशी ला १ जुन नन्तर काय फरक जानवेल?
<<<कर्क राशीसाठी सध्या दिवस
<<<कर्क राशीसाठी सध्या दिवस कसे आहेत जरा सांगाल का?<< +१००
दक्षिणा, कर्क राशीचे काही
दक्षिणा, कर्क राशीचे काही दिवस बरे आणि काही दिवस चमत्कारिक जात आहेत. चांगले मित्रत्वाचे संबंध विनाकारण शत्रुत्वात बदलेले दिसण्याचे योग आहेत. सुख स्थानी शनी राहू एकत्र आहेत.
गुरू पालट झाला तरी जुलै ऑगस्ट हे महिने काळजी घ्यावी. मंगळाचे भमण आता होईल. वेळ प्रसंगी पडते घ्यावे. राग ताब्यात ठेवावा. आततायी निर्णय घेऊ नयेत.
नोकरी व्यवसायातून चित्त उडण्याचे दिवसही दिसून येतील. केतू असा परिणाम देतो. वैराग्याचा तो कारक आहे.
पण सप्टेंबर नंतर दिवस चांगले आहेत. काळजी नसावी.
वरचे विवेचन असले तरीही फल हे आपापल्या पत्रिके प्रमाणे मिळेल हे ध्यानात ठेवावे.
कर्क रास प्रत्यक्ष श्रीरामाची. महापुरुषांना वनवास चुकला नाही तर आपण कोण लागून गेलो?
गीता वाचनातून अध्याय २, ३, ४, ५; मनाची शांतता मिळवावी.
-------------
स्वीटुपाय, मी वर काही सल्ला दिला होता. त्यावरही जे अटळ आहे त्याचा शोक करू नका, आणि भय बाळगू नका.
देव पाठीशी असतो. कधी कधी भयाने आपले विचार त्याचे अस्तित्व दिसू देत नाहीत.
उपासना असेल तर प्रत्येक घटनेतून मार्ग मिळत राहतील. वेळ आली की मार्गही दिसू लागतील.
मॅरेज कौंसेलरचा दोघांनी मिळून सल्ला जरूर घ्या!
-------------
मनि१२३, अन्कुरी.
वेळ मिळेल तसे उत्तर देईन.
प्रत्येक पत्रिका बनवणे आणि त्यावर विचार करून उत्तर देणे हे वेळ खाऊ काम असते हे लक्षात असू द्या!
प्रतिसादा साठी धन्यवाद
प्रतिसादा साठी धन्यवाद गुन्डोपन्तजी.
गुरुचे विशेषत्व हे की तो ज्या
गुरुचे विशेषत्व हे की तो ज्या स्थानी अस्तो त्या स्वस्थानाचीच हानि करतो
>>
गुंडोपंत,
माझ्या कुंडलीत धनेचा गुरु + मंगळ ८ व्या घरात आहे. याचे फळ काय?
मीथुनेत कांय कांय बदल होतील १
मीथुनेत कांय कांय बदल होतील १ जून पासून
आणि वृषभेस कांय बदल होणार आहेत ?
गुंडोपंत धन्यवाद ताबडतोब
गुंडोपंत धन्यवाद ताबडतोब उत्तर दिल्याबद्दल. पण सप्टेंबर पर्यंत असाच काळ राहणार? अरे देवा.
गुंडोपंत आपण उपक्रमावरचेच
गुंडोपंत आपण उपक्रमावरचेच गुंडोपंत का?
पण सप्टेंबर पर्यंत असाच काळ
पण सप्टेंबर पर्यंत असाच काळ राहणार? अरेरे अरे देवा.
'हे ही दिवस जातील'
हा मंत्र जपायचा :)) अजून काय सांगणार?
आणि मध्ये आनंदाचे ही काही दिवस गेले की... त्याचे काय?
धन्स गुंडोपंत! <<नोकरी
धन्स गुंडोपंत!
<<नोकरी व्यवसायातून चित्त उडण्याचे दिवसही दिसून येतील<< हे तर आताच दिसुन येतय माझ्या बाबतीत.
तुम्हाला संपर्कातुन ईमेल केलीये.
गुंडोपंत मी पण हेच सांगायला
गुंडोपंत मी पण हेच सांगायला आले होते की ईमेल केलिये. अगदि एक ओळ आहे. कृपया वेळ मिळाला की चेक करून उत्तर द्याल का?
मी_केदार, मिथुन राशीचे दिवस
मी_केदार, मिथुन राशीचे दिवस पालटत आहेत. काळजी नसावी.
फार काळ कळ काढलीत. पण आता दिवस बदलले आहेत
ता. क. (मीथुनेत नाही मिथुनेत!)
बाकी प्रश्नकर्त्यांनाही वेळ
बाकी प्रश्नकर्त्यांनाही वेळ मिळेल तसा प्रतिसाद देतो. सध्या इतकेच.
Dear Pant, Thanks for reply.
Dear Pant,
Thanks for reply.
Regards
Mani
१ जूनला होणार्या गुरु बदला
१ जूनला होणार्या गुरु बदला बाबत मिलिंद यांनी केलेले विवेचन...
http://www.astromnc.com/component/content/article/20-discussion/189-guru...
धन्स इंद्रा, मीही हेच द्यायला
धन्स इंद्रा, मीही हेच द्यायला आले होते.
इन्द्रा, लिन्क बद्दल
इन्द्रा, लिन्क बद्दल धन्यवाद
मिलिन्दाचा लेख मस्तच आहे
वा मिलिंदने सर्वच राशींचा
वा मिलिंदने सर्वच राशींचा विचार दिला आहे. लेख चांगला आहे. (फक्त इंग्रजीतून आहे.)
पन्तजी, माझा प्रश्नच मुळि असा
पन्तजी,
माझा प्रश्नच मुळि असा होता कि, "प्रेम आणि परस्पर विश्वास भरपुर असुन हि कुठलि तरि अद्रुश्य शक्ती दोघानाहि एकमेकापासुन दुर ठेवत असेल तर काय करता येइल, "
तसे नसते तर केवळ समाज काय म्हणेल म्हणुन एकत्र राहण, हे दोघान्च्या हि मनाला पटत नाहि, आणि दोघानाहि दुसरिकडेहि जावेसे वाटत नाहि, एकमेकान्चि खुप काळजि असुन ही एकत्र आले रे आले कि शुल्लक कारणावरुन खटके उडतात्, marriage councellor and other all सगळे उपाय करुन झाले. तरिहि हे टिकवणे, हा अट्टाहास, अशा साथि कि त्या दोघानाहि माहित आहे कि एकमेकावाचुन नाहि राहु शकत, पण फुकटचा ego किवा कदाचित, काहि कुन्ड्लीतिल दोश ज्याचि ज्यास्त शक्यता आहे,
म्हणुनच आणखी काय प्रयत्न करता येतिल, एक जण कमि पडला तर दुसर्यालाच प्रयत्न करावे लागतील, फक्त ते योग्य दिशेने आणि अजुन जोरदार असावेत, हाच विचार आहे.
Pages