निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या महिन्यापासुन ती अबोलीचे झाडही ओळखते.>>>>>>>>>>> जागू काय हे? खरंतर तिने 'प्राजक्ताचं' झाड ओळखायला पाहिजे!!...........:डोमा:

वा गं शाने, इथे लिहिले नाही म्हणजे आठवण आलीच नाही??????????????>>>>>>>>>>+१००००००
अग, इथे लिहीलं तरच आठवण आली असं आहे का? Happy

जागू काय हे? खरंतर तिने 'प्राजक्ताचं' झाड ओळखायला पाहिजे!!...........डोळा मारा>>>>>>>>>>>ते तर ती केव्हाच ओळखू लागलेय. Wink

Yogesh Jagtap added a life event from May 27, 2013 to his timeline:
Got Engaged.

जिप्स्या, (छुपे रुस्तम.) अभिनंदन!
Perennial-Pleasures-Nursery-Custom-Services-Wedding-Flowers.jpg

Yogesh Jagtap added a life event from May 27, 2013 to his timeline:
Got Engaged. >>>>> जिप्सी - हार्दिक अभिनंदन ........

अभिनंदन योगेश.. कॅमेराची लेन्स ठेवायला हक्काचा खांदा मिळाला >>दा Proud
जिप्स्या अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

कॅमेराची लेन्स ठेवायला हक्काचा खांदा मिळाला >>>>>>>>>>>दिनेशदा, की तिच्या पर्सला हक्काचा खांदा मिळाला? Wink Lol

जिप्स्याच्या एटिएम कार्डला आता चांगले दिवस येणार हेच अंतिम सत्य आहे. बाकी कॅमेराची लेन्स ठेवायला हक्काचा खांदा मिळाला वगैरे कल्पनेच्या भरा-या मारणा-याने मारत रहावे. 'तिकडे' काही फरक पडत नाहीय. 'तिकडे' फक्त शॉपिंग लिस्ट बनत आहे. हक्काचा फायनान्सर मिळालाय.

असे अस्वच्छ पाणी चिमण्या आणि बुलबुलांना आवडत नसावे. सध्या विरूद्ध दिशेच्या खिडकीत त्यांच्यासाठी पाणी ठेवले आहे. ईथे सगळेच येतात चिमण्या, बुलबुल, दयाळ आणि नको वाटणारी कबूतरे.>>>>>

कदाचित हीच तर कावळ्यांची युक्ती तर नाही ना.. की पाणी असे काही टाकुन घाण करुन टाकायचे म्हणजे इतर पक्षी ते पिणार नाहीत आणि सगळे कावळ्यानाच मिळेल?

असेल, कावळ्यांना तेवढी अक्कल असू शकेल. म्हणजे पाणी खराब करणे हा हेतू नसेल पण त्यावर आपली मालकी दाखवणे हा नक्कीच असेल.

मी ज्या रस्त्यावरून फिरायला जातो तो रस्ता.

हिच ती अंबाडी

काल तर दूरवर आणखी बोंडे दिसली.. म्हणजे माझं काम वाढलं ना आता Happy

हो साधना, पण तिथपर्यंत कसे पोहोचायचे हाच प्रश्न आहे.

अशाच जंगलात हि सदाफुली दिसली. आमच्या कॉलनीतून बी गेले असेल हे खरेय, पण जिथे पाणी नाही ( दोन महिने पाऊस नाही ) मूळाशी मुंग्यांनी उकरुन ठेवलेले, अशा परिस्थितीत किती जोमाने फुलली आहे ही.
अशी तर आमच्या कॉलनीतही फुललेली नाही.

दिनेशदा, सदाफुलीचा रंग कित्ती सुंदर आहे ना? Happy

येताना याच्या बिया माझ्यासाठी आणा. Happy
(दिनेशदा म्हणतील, कुठलही सुंदर फुल दाखवल, की लागली बी मागायला. :अओ:)

आमच्या कॉलनीतून बी गेले असेल हे खरेय, पण जिथे पाणी नाही ( दोन महिने पाऊस नाही ) मूळाशी मुंग्यांनी उकरुन ठेवलेले, अशा परिस्थितीत किती जोमाने फुलली आहे ही.
अशी तर आमच्या कॉलनीतही फुललेली नाही. >>>>> हे बहुतेक सदाफुलीचे वैशिष्ट्यच दिस्ते आहे. आम्ही कुंडीत लावून छान पाणी, खते दिली तर मरुन गेली पण बाजूलाच एका भिंतीवर खत-पाणी काही एक नसताना जोमाने वाढत होती !!!!!

> हे बहुतेक सदाफुलीचे वैशिष्ट्यच दिस्ते आहे. आम्ही कुंडीत लावून छान पाणी, खते दिली तर मरुन गेली पण बाजूलाच एका भिंतीवर खत-पाणी काही एक नसताना जोमाने वाढत होती !!!!>>>>>>>>>>>तिच नावच सदाफुली आहे ना? तिला असे लाड करून घ्यायला आवडत नसेल. Happy

जिप्स्याच्या एटिएम कार्डला आता चांगले दिवस येणार हेच अंतिम सत्य आहे. बाकी कॅमेराची लेन्स ठेवायला हक्काचा खांदा मिळाला वगैरे कल्पनेच्या भरा-या मारणा-याने मारत रहावे. 'तिकडे' काही फरक पडत नाहीय. 'तिकडे' फक्त शॉपिंग लिस्ट बनत आहे. हक्काचा फायनान्सर मिळालाय. >>>>> एवढेच काय हक्काचा हमालही मिळालाय - शॉपिंग केलेलं सगळं उचलून न्यायला ...... Wink Happy

"जंगला"तच एका झाडाजवळ असे काहीतरी उगवलेले होते. निवडुंगच असावा पण काटे नव्हते ( मला तर सव्वा मीटर लांबीची शेवग्याची शेंगच वाटली. ) याला फुले वगैरे येतात का, ते बघायला हवे.

वा सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे.

कावळे खाद्य गोळा करून ते ठरावीक ठिकाणी लपवून ठेवतात आणि पाहिजे तेव्हा खातात अस मी पाहिलं आहे अगदी १,२ दिवसांनी पण खातात. जर आडोसा नाही मिळाला तर सोयीच्या ठिकाणी ठेवून त्यावर पाला टाकून लपवतानाही पाहिलय.

शोभा, आधी पाऊस तर पडू दे !>>>>>>>त्याचीच तर आतूरतेने वाट बघतेय. बर्‍याच बिया रुजत घालायच्या आहेत. Happy

जो_एस,
तसे असेल तर तो पक्ष्यांमधे अपवाद ठरेल. कुठलाच पक्षी असे अन्न साठवून ठेवत नाही..
"कशाला उद्याची बात .." असेच आयुष्य जगतात ते.

२ आठवड्यापुर्वी मामीने बेसिल ची आठवण काढली होती. मी पण लावला इथे कुंडीत मस्त जोम धरलाय.

पुदीना पण लावलाय. ( फोटो मात्र जरा आऊट ऑफ फोकस झालाय. )

लाल माठाच्या बियांची उगवण क्षमता १०० % असावी. माझ्या कुंडीत अशी दाटी झालीय !

माझ्या वडीलांनी आमच्या सोसायटीच्या बागेत, (जिची देखबहाल माझे वडीलच करतात)लाल माठचे बी पेरले. परवा रात्री भाजी खाल्ली. Happy

घोळ (की चिव्वळ्)ची भाजी निवडुन झाल्यावर मी उरलेल्या काड्या अशाच मोकळ्या जागी मातीत टाकल्या. पाणी दिल्यावर त्यालासुद्धा नविन पालवी फुटलेली दिसली.

Pages

Back to top