ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक गमतीदार योगायोग.
माझ्या प्रतिक्रियेने त्या शेवटल्या ११ चे १२ वाजतील, आप्लं होतील. पण अगदी १,१११ वै ज्योतिषाच्या धाग्यावर पाहून गम्मत वाटली. -->

_tp.jpg

इथे वरती मी स्वप्नात साप दिसणे असा उल्लेख वाचला. एमेनसीजी यावर उपाय हनुमान साधना असु शकेल, पण श्री शंकराची उपासना जास्त फलदायी ठरते, म्हणजे शिवलीलामृत वगैरे वाचणे, शंकराचे दर्शन घेणे इत्यादीने हे दूर होते. दुसरे असे की कालसर्प योग हा अस्तित्वात नाहिये, ह्याने काही फरक पडत नाही, उगीच पैसे उकळण्याचे धंदे आहेत हे. दाते पंचंगाने सुद्धा हा योग नसल्याचे सांगीतले आहे.

नारायण नागबळी हा गेलेल्या ( मृत ) आपल्या पूर्वजांकरता आहे, किंवा जी व्यक्ती घर सोडुन गेलीय, आणी ती जिवंत आहे की नाही याविषयी आहे

.

Diet Consultant | 17 September, 2012 - 15:43 नवीन
इथे खरे ज्योतिषी पत्रिकेचा अभ्यास करून उत्तरे देत आहेत का ?
<<<
जगात कुठेतरी 'फ्री मील' अर्थात फुकट जेवण मिळते का?

हो, एमेनसी उर्फ मिलिंद पूर्वी पत्रिकेचा चांगला अभ्यास करुन मग उत्तर देत होते, पण बहुतेक कामाच्या व्यापामुळे ते इथे दिसत नाहीत सध्या. मी पत्रिकेचा अभ्यास सुरु करुन ३ महिने होत आले, पण पत्रिका पहात नाही, म्हणजे भविष्य वगैरे सांगत नाही. पण माझ्या अभ्यासावरुन सांगते की एमेनसी बरोबर भविष्य सांगतात, ते ही चकटफू.

टुनटुनजी,
माझ्या जन्मतारखेवरून मला कालसर्प योग किंवा नारायण नागबळी आहे का हे सांगू शकाल ?

विजय कुलकर्णी पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की कालसर्प नावाचा कुठलाच योग अस्तीत्वात नाही. हे दाते पंचांगात सुद्धा लिहीलेले आहे. कालसर्प म्हणजे पत्रिकेत जर समोरासमोर राहू किंवा केतू असतील ( तसे ते जन्मलग्न कुंडलीत कायम एकमेकासमोरच असतात, कारण राहु हा सर्पाचे तोंड आणी केतू हा शेपुट मानला जातो) आणी त्यांच्या एका बाजूलाच सर्व लहान मोठे शुभ अशुभ ग्रह असतील तर तो कालसर्प योग आहे असे म्हणतात ( आजचे पैसेखाऊ ज्योतिष्यी ).

आणी एका बाजूला सर्व ग्रह म्हणजे पत्रिकेत जर राहू १ ल्या स्थानात आणी केतू त्याच्या समोर ७ व्या स्थानात असेल तर १ ते ७ या स्थानातच बाकी उरलेले सर्व म्हणजे रवी शनी असे ग्रह. हे थोतांड आहे, यावर विश्वास ठेऊ नका, फक्त पैसे उकळण्याचे काम आहे हे.

नारायण नागबळी हा अशाकरता करतात की आपल्या पूर्वजांपैकी जर कुणी काही विधी न होता ( म्हणजे तो घरातुन पळुन गेल्यावर त्याचा काही ठावठिकाणा न लागल्यास, किंवा तो बरेच वर्ष परत न आल्यास) मरण पावला असेल तर त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून करतात. कारण हिंदु धर्मात दाह संस्कारांचे महत्व चांगलेच आहे. आणी काहींच्या मते जर पत्रिकेत रवी राहू एकत्र असतील ( युतीत ) तर ना. ना. बळी करतात. पण याने काहीच बरा वाईट फरक पडत नाही, आहेच तेच चालू रहाते हा माझा अनूभव आहे.

आणी नुसती जन्मतारीखच नाही तर वेळ आणी ठिकाण पण संगावे लागते. त्यापेक्षा तज्ञ ज्योतिष्यी उदा. विजय केळकर वगैरेना संपर्क करा. ठाण्यातले सुनील गोंधळेकर चांगले

<<कालसर्प नावाचा कुठलाच योग अस्तीत्वात नाही>>
माफ करा पण मी तुमच्या मताशी सहमत नाही. कारण कालसर्प योग असतो व त्याच्या १२ प्रकारानुसार व तो कोणत्या स्थानातुन होतो यानुसार त्याचे भिन्न-भिन्न फले अनुभवास येतात दाते वाल्यानी त्यान्चे मत मान्डले आहे. आपला अनुभव ही खुप महत्वाचा!
मला प्रकर्शाने आलेला अनुभव म्हणजे जर आई-वडिलाच्या पत्रिकेत पुर्ण कालसर्प योग असेल तर त्याच्या मुलाच्या पत्रिकेत निदान अर्ध कालसर्प असतोच. एखादा मुलगाच (विशेषत: शेवटचा) सुटतो.
आणि जेन्व्हा राहु-केतु ची दशा अन्तर सुरु होते तेन्व्हा त्याची काहीतरी वाईट फले अनुभास येतात.

रमेशजी आधी दातेंनीच लिहीले होते की कालसर्प अस्तिस्त्वात नाहिये म्हणून. तुम्ही म्हणता त्या योगांची नावे उदा. अनंत, तक्षक, वासुकी वगैरे बद्दल मी कुठल्याश्या भविष्य विषयी दिवाळी अंकात वाचले होती..
आणी स्वतः च्या अनूभवांवरुन सांगते की असे जरी काही योग असले तरी त्यांना विधींऐवजी एकमेव मोठा पर्याय असतो, आणी तो म्हणजे परमेश्वराची उपासना, आराधना. माझी पत्रिका पाहुन एका पूजा सांगणार्‍या ज्योतिष्याने मला कालसर्प योग सांगीतला होता, पण त्यावेळी माझी महादेवाची उपासना सुरु होती ( ती अजूनही चालू आहे आणी रहाणार ) .

काय झाले? माझे त्यांतर लग्न झाले, मी स्थिरस्थावर आहे ( कालसर्प पुजा विधी न करता ). किरकोळ अडचणी प्रत्येकाला येतात.

हो, राहु महादशा आणी अंतर्दशा यांच्या शुभाशुभ परीणामांबाबत मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र हा कालसर्प विधी/ पुजा आणी ना. ना. बळी प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.

कालसर्प योगाबाबत मी बराचसा रमेश यान्च्या मताशी सहमत आहे.
केवळ दाते पन्चान्गकर्त्यान्नी सान्गितले म्हणून मी तो योग नाहिच्चे असे काही म्हणावयास जाणार नाही, कारण तसे म्हणणे, अन ज्योतिष थोताण्ड आहे असे म्हणणे यात अर्था अर्थी काहीच फरक नाही.
मात्र मी माझे समोर येणार्‍या पत्रिकातील राहूकेतुन्चा विशेष अभ्यास सुरू केला आहे. राहुकेतूच्या एकीबाजूसच सर्व ग्रह असणे यामुळे होणार्‍या गुणावगुणाबाबत तात्विक दृष्ट्या माझे दुमत नाही. पूर्वी माहित नव्हते, व आता सन्ख्यात्मकरित्या दृष्टोत्पत्तीस काही बाबी येत असता त्या नाकारणे मला मान्य नाही. सबब, मी दोन्हीही शक्या शक्यतान्चा विचार करतोय. Happy तोवर माझे मत राखिव.

टुनटुनजी,
मी कोणत्याही विधीविषयी बोललो नाही फक्त कालसर्प योगाचे परीणाम अनुभवास येतात येवढेच म्हणालो.
माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास समोरच्या जातकास फारच त्रासदायक अनुभव येत असेल व त्याच्या पत्रिकेत पुर्ण कालसर्प असेल तरच मी कालसर्प विधी सान्गतो अन्यथा 'रमेश तान्बे' यान्च्या पुस्तकातील उपाय सान्गतो ते खुपच अनुभवास येतात.
प्रश्न विचारते वेळेचे रुलिग मध्ये राहु असेल तर विशेष!

रमेशजी मी पण कुठे म्हंटले आहे की तुम्ही विधी ( कालसर्प वगैरे ) करायला सांगता आहात म्हणून. मी त्या योगांचा उल्लेख केला आहे, जे वाचले होते. वर विजय कुलकर्णींनी विचारले म्हणून मी लिहीले होते.

धोंडोपंत आपटेंचा ब्लॉग बघीतलात का? बरीच माहिती ( इतर ) मिळेल तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने.

लिंबुजी तुम्ही थोडे धार्मीक आहात असे मला वाटतेय म्हणून लिहीते, इतरांचा विश्वास बसणार नाही. पण राहू हा स्मशान ( भूत प्रेत जारण मारण ) कारक आहे. तसाच तो कलेचा पण कारक आहे. आणी केतू अध्यात्माचा कारक आहे.

बाकी वेळ मिळाला की लिहीन. सध्या वेळ नसल्याने थांबते.

टुनटुन्जी

राहू हा सगळ्याला विलंब लावतो हे खरे आहे का? व केतू हा अध्यात्मिक आहे असे आपण म्हणता पण स्थानपरत्वे त्याची फळे असतात का ?

माझ्या जन्म कुंडलीत दशमात मिथुन राशीचा आर्द्रा नक्षत्रातला राहु आहे. नवमांशात त्याला बळ नाही. नोव्हेंबर २००९ पासुन राहु महादशा सुरु आहे. जेव्हा दशामातल्या मुळ राहु वरुन गोचरीचा राहु जाईल तेव्हा काय फले मिळतील ?

अजयजी आणी नितीनजी मला राहू विषयी इतकी सखोल माहिती नाही, परंतु राहु हा स्थाना नुसार आणी त्याच्याशी होणार्‍या इतर ग्रहांच्या युतीनुसार फल देतो. वास्तवीक राहु हा अतीशय धाडसी ग्रह ( मंगळासारखाच ) आहे. राहुचा प्रभाव असणारी माणसे तशी भितीमुक्त असतात. मात्र जन्मलग्न कुंडलीतील स्थानानुसार तो अचुक फल देतो.

नितीनजी दशमातला तुमचा मिथुनेचा राहु तसा स्वगृहीचा आहे, तो स्वतःच्या नक्षत्रात पण आहे. हा राहु नोकरीत अधीकार पद देतो आणी परदेशातुन पैसा मिळवुन देतो. ( तुमचा परदेशगमन योग आला आहे का? ) मला वाटते तुम्ही लोकांनी चांगल्या तज्ञ ज्योतिष्याला आपली पत्रिका जरुर दाखवावी. राहु विषारी प्राण्यांपासुन भय पण दाखवतो ( अशुभ असेल तर ).

अजयजी राहू एवढा विलंब दाखवत नाही जितका शनी दाखवतो.

कुंडलीत राहु अशुभ असेल तर महादेवाची उपासना जरुर करावी ( उपास मात्र धरु नयेत, तब्येतीला मानवत नसेल तर उगाच आपल्याला आणी देवाला पण त्रास).

टुनटुनजी,

धन्यवाद ! अजून एक शंका. ग्रहांना अवस्था असतात. मग गुरुसारखा शुभ ग्रह समजा वृध्द अवस्थेत असेल तर तो बलहीन समजावा का ? त्याचे फल मिळत नाही का ? तुमचे मत काय आहे ?

अजयजी यावर माझे असे काही मत नाही कारण जे ज्योतिष्यशास्त्रात शिकवलेले आहे तेच आम्ही म्हणणार, कारण आमची सुरुवातीची पायरी. हे मी पण वाचलेले आहे की वृद्ध अवस्थेतील ग्रह त्याचे कमी परीणाम देतो. याउलट बाल आणी तरुण अवस्थेतील ग्रह चांगले परीणाम देतो.

गमभन आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा पत्रिकेत ( जन्मलग्नकुंडली ) जे ग्रह मांडले जातात ते त्या दिवशी कोणत्या अंशावर आहेत ते बघीतले जातात. उदा सुर्य ( रवी)किती अंशावर आहे? वगैरे. साधारण ० ते ३० अंशापर्यंत ग्रहांची स्थिती असते. तो ग्रह जर १९ अंशांच्या ( डिग्री) पुढे असेल तर वृद्ध समजतात. बाकी २४ च्या पुढे मृत अवस्था. आणी त्या आधी बाल, कुमार, युवा अश्या अवस्था असतात.

ते ग्रह मग तसा परीणाम देतात.

रमेश रावलजी जरा कालसर्पाविषयी पूर्ण माहिती इथे द्याल का? माझा स्वतःचा विश्वास जरी नसला तरी माझ्या चुलत बहिणीचा यावर ठाम विश्वास आहे. तिच्यात आणी माझ्यात यावर वाद ( मैत्रीपुर्ण ) झालेत, पण परीणाम शून्य.

कालसर्प योगामुळे तिचे लग्न लांबले आहे, असा काही ज्योतिष्यांचा कयास आहे, त्यामुळे तिला ती शांती करावी लागतेय. त्र्यंबकेश्वर सोडले की अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी ही शांती करतात ? ( फक्त महाराष्ट्रातले सांगा ) आपल्या घरी करता येते का?

जमेल तेव्हा सांगा.

टुनटुनजी,
कालसर्प आणि त्याच्या सर्व प्रकाराविषयी इथे माहिती देने मला शक्य नाही कारण कामातुन मिळ्नारा वेळ आणि इथले मराठी typing.आणि याची माहीती फार दुर्मिळ आहे असेही नाही.
आपल्या बहिणिच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिच्या जन्म तपशील दिला तर विवाहविलबाचे कारण समजू शकेल. स्वत:च्या घरी मात्र कालसर्प शांती करु नये.

१ जून ला गुरू पालट होतो आहे.
अनेक बदल संभवतात.
राशीनुसार फलादेश मिळतीलच. पण मिथुन राशीच्या लोकांचे फलादेश आता सुधारतील. इतके दिवस कळ काढलीत आता चांगले दिवस आले आहेत! काळजी नसावी.

बुध शुक्र आणि गुरू एकत्र मिथुनेत असतील.
शनी आणि गुरू + इतर अनेक ग्रहांचा षडाष्टक योगही काही काळात संपेल त्यामुळेही काही दिलासा मिळेल ही साडेसातीतील राशींना आशा.

धन्यवाद लिंबुराव! तुम्हीही तुप-साखर घ्या! Happy

कर्केच्या व्ययात येत आहे. खर्च वाढणार. अध्यात्मातून आनंद हे फल दिसते आहे.
अजून तुम्हाला काय दिसते?

सिंह - गुरू लाभात. काही तरी चांगला लाभ देणार.
कन्या - दशमात गुरू - नोकरी किंवा व्यवसाय विषयक सुधारणा दिसतील.

Pages