निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आमच्या मागे रहाणार्या
आमच्या मागे रहाणार्या वहिनींकडे त्यांनी बरेच प्राणी पाळलेत. शिवाय प्राण्यांच्या बरोबरीने पक्षीही पाळलेत. आणि त्याचबरोबर काही व्हिजिटिंग फॅकल्टीज पण आहेत, बुलबुल, ब्राह्मणी मैना, दयाळ इ.इ. (आमचं प्राणीसंग्रहालयाचं जॉईंट व्हेंचर आहे बरं का!!) म्हणजे आमच्याकडे मांजरं, साप वगैरे आणि त्यांच्याकडे कोंबड्या, बदकं, लव्हबर्ड्स, पोपट, कुत्री, खारी इ.इ..............:फिदी:
तर पाळलेल्या पक्ष्यांमधे काही छोट्या आकाराचे काकाकुवा सदृश पक्षी पण आहेत. त्यातले एक पिल्लू दाखवायला त्यांनी आणले होते. त्याचे फोटो. .............
ईश्वरी फोटो काढतेय हे लक्षात आल्यावर महाशय लगेच सावध झाले आणि 'लूक' देऊ लागले............कोण आहे रे ते????? ऑ????..............
एवढुस्सा जीव पण किती कळत होतं त्याला! त्याच्या बरोबरचे सगळे क्षण खूप आनंदात गेले.
सुंदर आहे पक्षी हा ! बोलका
सुंदर आहे पक्षी हा ! बोलका पण असणार.
आफ्रिकन काकाकुवा, नायजेरियातल्या एका रिसॉर्ट मधे होते. खरेच क्वीक लर्नर असतात ते. आमच्या ग्रुपमधे आम्ही एकमेकांना ज्या हाका मारत होतो, त्याची लगेच नक्कल करत असत.
पण आपल्याकडे विकायला आणतात त्याच्यापेक्षा बरेच मोठे होते ते. पिंजर्याजवळ बोट नेले तर बोटाचा लचका
तोडला असता, असे वाटत होते.
बोलतो की नाही ते अजून नाही
बोलतो की नाही ते अजून नाही कळाले, पण हुशार मात्र असणार. आणि हा आकाराने पूर्ण वाढल्यावरही बुलबुलाएवढाच दिसतो.
दिनेशदा , उशीरा लिहितेय पण
दिनेशदा ,
उशीरा लिहितेय पण कुंडीत मिरचीचे एकच रोप आहे.वर्ष झाले त्याला पण १ ही मिरची नाही भरपूर फुले येतात.
दुसर्या कुंडीत ७-८ रोपे आहेत .ती २-३ महिन्यांची आहेत.
शांकली ,
फोटो छानच! भाव किती बोलके आहेत!
येळेकर, मग बहुदा झाडात
येळेकर, मग बहुदा झाडात काहीतरी गडबड आहे. माझ्या माहितीप्रमाणे मिरचीत तरी नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे नसतात.
झाड जोमदार असेल तर आणखी वाट बघता येईल. पानामागून आली आणि तिखट झाली, असे मिरचीच्या बाबतीत म्हणतात खरे. तूम्हाला फुलामागून आली... असे म्हणावे लागेल, एवढेच.
शांकली, छान फोटो
शांकली,
छान फोटो !
येळेकर,
मिरचीला पाणी थोड्या अंतराने द्या, जास्त पाण्यामुळे देखील होत असेल, तसं मिरचीच नविन रोप महिन्यात वाढतं, त्यामुळे दुसरं रोप आता लावता येईल, लावताना २ रोपे लावा.
वांग्या मध्ये एक झाड उंच वाढतं, फुले खुप येतात पण वांगी लागत नाहीत, ते नर झाड असतं अस म्हणतात, पपईमध्ये देखील अशी नर झाडे खुप दिसतात.
शांकली मस्त फोटो. हुशार दिसतय
शांकली मस्त फोटो. हुशार दिसतय पिल्लू.
दिनेशदा | 15 May, 2013 - 12:46
आपल्याकडे हवामान कसे आहे आता ? आकाशात ढग दिसू लागलेत का ?
दिनेशदा, गेल्या भागात तुम्ही हा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर इथे देत आहे.(फारच लवकर):स्मित:
हे असं आहे वातावरण :
आणि हा कावळा, असे वातावरण बघून चिंतातूर झालाय.
जर पाऊस आला तर, आपण नुकतेच बांधलेले (शेणाचे घर) वाहून जाणार आणि परत चिऊताईचे दार वाजवून "चिऊताई चिऊताई दार उघड " असे म्हणावे लागणार.
शोभा, त्याची पावले सोन्यानी
शोभा, त्याची पावले सोन्यानी मढवून त्याला गोड खाऊ दे बरं... शुभसंकेत घेऊन आलाय तो.
दिनेशदा, आता जातेच सराफ़ाकडे
दिनेशदा, आता जातेच सराफ़ाकडे आणि हलवायाकडे
शोभा, त्याची पावले सोन्यानी
शोभा, त्याची पावले सोन्यानी मढवून त्याला गोड खाऊ दे बरं.
दिनेशदा, आता जातेच सराफ़ाकडे आणि हलवायाकडे
कुठल्या बँकेवर दरोडा टाकलास ते मलाही सांग. मीही निघते लगेच...
<<<<दिनेशदा, आता जातेच
<<<<दिनेशदा, आता जातेच सराफ़ाकडे आणि हलवायाकडे>>> शोभा जाता-जाता मला पण हाक मारून जा, मी पण येइन म्हणते..........:डोमा:
शांकली छान आहे ग फोटो !
अरे बापरे! ह्या कावळ्यानी
अरे बापरे!
ह्या कावळ्यानी वैताग दिलाय यावेळी! उन्हाळा म्हणून २-३ वर्षे, दोन्ही खिडक्यांत पाणी ठेवत असू.
पाणवठ्यावरील मैना,चिमण्या, कावळे तृप्त (मला वाटायचे) झालेले पाहुन बरे वाटत असे.
पण यावर्षी कावळ्याने माशाचे तुकडे,हाडॅ पाण्यात टाकायला सुरुवात केली.प्रथम वाटले, चुकून पडलं असेल.२-३ दिवस तीच कथा! शेवटी किळसून पाणवठा बंद केला.
येळेकर, पाणी बघितल्यावर
येळेकर, पाणी बघितल्यावर चोचीतील भक्ष्य सुटत असेल त्यांच्या.
येळेकर, पाणी बघितल्यावर
येळेकर, पाणी बघितल्यावर चोचीतील भक्ष्य सुटत असेल त्यांच्या.
दिनेशदा, एकदा-दोनदा सुटेल पण
दिनेशदा,
एकदा-दोनदा सुटेल पण सलग ४वेळा झाल्यावर वैताग आला.कावळा भक्ष्य लपवतो माहित आहे. पण हे काही वेगळेच!
पुण्यातील गोळीबार मैदान
पुण्यातील गोळीबार मैदान चौकाकडून जो एक रस्ता कँपकडे जातो (वन वे) तिथे लगेचच डावीकडे एक जैन मंदीर आहे. तेथील आवारात आक्टोपस ट्री असा फुललाय - जरुर पहा -
पण यावर्षी कावळ्याने माशाचे
पण यावर्षी कावळ्याने माशाचे तुकडे,हाडॅ पाण्यात टाकायला सुरुवात केली.प्रथम वाटले, चुकून पडलं असेल.२-३ दिवस तीच कथा! शेवटी किळसून पाणवठा बंद केला.
कावळ्या चिमणीसाठी पाणी ठेवताय तर त्यांना ठरवु द्याना ते कसे वापरायचे ते. आपण त्यांच्यासाठी पाणी ठेवतो आणि वर ते आपल्या मनासारखेच त्यांनी वापरावे असेही ठरवतो हे बरोबर नाही असे मला वाटते. तुमच्यावर टिका किंवा तुम्हाला कमी लेखायचे नाहीय पण कावळा असे करण्यामागचे काहीतरी कारण असेल ते त्याला माहित आहे आणि तुम्हाला नाही. तुम्ही पाणी ठेवायचे बंद केल्याचा त्याला आणि इतरा पक्ष्यांना नक्कीच तोटा झाला असणार. असे करु नका, उन खुप जास्त आहे बाहेर.
तुम्हाला हाडे वगैरे आवडत नसतील, घरात चालत नसतील तर पाण्याचे वेगळे भांडे ठेवा, भांड्याला हात न लावता त्यात वरुन दुस-या भांड्याने पाणी ओता. पण एक चांगले काम बंद करु नका.
साधना, पहिली गोष्ट म्हणजे नो
साधना,
पहिली गोष्ट म्हणजे नो अहो जाहो! संवाद साधायला सोपे वाटते ग!
अग,पण रोज मी पक्ष्यांचे पाणी बदलताना भांडे धुते. त्यातच पाणी नाही घालत.
बरे म्हणजे २ खिडक्यातील भांड्यात हीच स्थिती!
तसेच २-३ दिवस हाडे पाण्यात राहिल्यानंतर त्यावरचे मांस कुजून घाण वास यायचा.
मग ते वास येणारे पाणी नंतर प़क्षी प्यायचे नाहीत.
बाय दि वे , आज सकाळीच पाणी भरून ठेवले आहे.
शशांक,
या झाडाचे नाव आता कळले!
शशांक, आपल्याकडे फार कमी झाडे
शशांक, आपल्याकडे फार कमी झाडे आहेत ही. प्रत्येक फुल अगदईच छोटेसे असते पण त्या गुच्छाची ठेवण मस्तच असते.
परवा सोनाली कुलकर्णीचा, विसराळू विनू हा लेख वाचला आणि मला वाटलं, प्राण्यांमधे हा किताब, खारीला द्यावा लागेल.
थंड प्रदेशातल्या खारी, उन्हाळ्यात फार बिझी असतात. झाडाखाली पडलेली ओक सारख्या झाडांची फळे, किंचीत
कुरतडून त्या लांबवर नेतात आणि छोटासा खड्डा खणून त्यात पुरुन ठेवतात. हि त्यांची हिवाळ्यासाठीची
बेगमी असते. त्या अशा रितीने भरपूर बिया पुरुन ठेवतात पण कालांतराने त्या जागा विसरतात आणि सगळ्याच
काही परत उकरून काढत नाहीत.
अशा व्यवस्थित पेरलेल्या बिया त्या जागी रुजतात आणि झाडाचे रोप तिथे रुजते. ( खारीच्या वर्गातले अनेक प्राणी असे करतात. )
पण हे मी बघितले आहे ते थंड प्रदेशातल्या खारींबद्दल. आपल्याकडच्या खारी असा उद्योग करतात का ?
मूळात त्यांनी रुजवाव्यात अशा बिया तरी आपल्याकडे असतात का ? मी तरी बघितलेले नाही.
आणि, रच्याकने प्रा. महाजनांनी विदेशी वृक्ष मधे ओक बद्दल लिहिलेले आहे का ? आठवत नाही.
पुण्यात ओकचे झाड आहे का ? मुंबईत हँगिंग गार्डन जवळ एक चांगले वाढलेले झाड आहे.
यावर्षी कावळ्याने माशाचे
यावर्षी कावळ्याने माशाचे तुकडे,हाडॅ पाण्यात टाकायला सुरुवात केली.प्रथम वाटले, चुकून पडलं असेल.२-३ दिवस तीच कथा! शेवटी किळसून पाणवठा बंद केला.>>>>>>>>>>>
येळेकर............अरे तुम्हालाही हाच अनुभव? माझ्याकडच्या मातीच्या भांड्यात मीही रोज भांडी स्वच्छ धवून पाणी भरते. पण एकाच भांड्यात रोज काही ना काही तरी पडायला लागलंय. हल्लीच. भाकरी पोळी इ.इ. २ दिवस पहातेय.....कावळेच या भांड्यावर जास्ती दिसतात.
दुसरं भांडं जरा उंचावर गच्चीतल्या पाण्याच्या टाकीवर आहे. ते पाणी मात्र स्वच्छ असतं. तिथे मात्र बरेच पक्षी येतात. होले, कबुतरं, साळुंख्या.
शशांक ऑक्टोपस छान !
शांकली पक्षी किती गोड आहे, आणि अॅटिट्यूड दाखवतोय!
काल बदामाचे झाड पाहिले.
काल बदामाचे झाड पाहिले. प्रत्येक पानांच्या झुपक्यातून बारीक पांढर्या केसाळ शेंड्या डोकावत
होत्या.बदामाचा मोहर असेल का? सोबत कॅमेरा नव्हता.नाहीतर फोटो अपलोड केला असता.
शशांक,हे झाड मला माझ्या
शशांक,हे झाड मला माझ्या प्राथमिक शाळेत घेऊन गेलं !
या झाडाला आम्ही क्वीन्स अम्ब्रेला ट्री म्हणायचो
हुजुरपागेत जुन्या प्राथमिक शाळेत हे झाड होतं !
शाळेच्या पहिल्याच दिवशी याची आणि माझी ओळख झाली.
लक्ष्मी रोडला गेलं की बरेच वेळा मी याला भेटायला जायचे! पण ही बरीच जुनी गोष्ट झाली,
पुढे सिमेंटच्या जंगलात याला जीव गमवावा लागला
गेले ५ दिवस मी नि.ग. वर
गेले ५ दिवस मी नि.ग. वर नव्हते पण कोणीच माझी आठवण काढली नाही.
मी ४ दिवस महाबळेश्वरला जाऊन आले. आधीही गेले होते पण ह्यावेळी निसर्गाचे बारीक निरीक्षण केल्याने खुप छान वाटले. वेळ कमी असल्याने भराभर फोटो काढलेत. नंतर टाकेनच. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहीलो तिथे डिस्कव्हरी चॅनेल झाले होते. जायंट घार की शेकरू घारीसारखेच पण चॉकलेटी आणि मोठे जोडपे झाडांव्र उड्या मारत होते. फोटोही निट काढता येत नव्हता इतके चपळ होते. दुसर्यादिवशी माकडांनी हैदोस चालवला होता. तेही पाहण्यात आणि कॅमेर्यात टिपण्यात आमचा वेळ चालला होता.
बाकी छान गप्पा चालू आहेत.
अरे बापरे! ह्या कावळ्यानी
अरे बापरे!
ह्या कावळ्यानी वैताग दिलाय यावेळी! उन्हाळा म्हणून २-३ वर्षे, दोन्ही खिडक्यांत पाणी ठेवत असू.
पाणवठ्यावरील मैना,चिमण्या, कावळे तृप्त (मला वाटायचे) झालेले पाहुन बरे वाटत असे.
पण यावर्षी कावळ्याने माशाचे तुकडे,हाडॅ पाण्यात टाकायला सुरुवात केली.प्रथम वाटले, चुकून पडलं असेल.२-३ दिवस तीच कथा! शेवटी किळसून पाणवठा बंद केला. >>>>>>>>>
बर्याच जणांना असा अनुभव दिसत आहे. माझ्याकडेही अशीच परिस्थीती....गेली ३-४ वर्षे....
जवळच एक शिंपी सकाळी सकाळी पक्षांसाठी भावनगरी शेव घालतो. कावळे लगेच ती उचलून पाण्यात आणून टाकतात सगदी सकाळी सात- सव्वा सातला. मग कावळा जवळपास जाऊन बसतो. ५-१० मिनिटांनी येऊन शेव खातो. भावनगरी तर मऊ असते मग का पाण्यात घालतात त्यांनाच माहीत.
खाटकाकडे ज्या दिवशी जास्त माल संपेल त्या दिवशी कोंबडीची पिसेसुद्धा पाण्यात आणून टाकतात. हाडाचे तुकडे, माशाचे आवशेष तर नेहमीचेच. थोड्यावेळाने येऊन घेऊन जाईल आणि जवळच कुठेतरी बसून ताव मारेल. लगेच खायचे नसेल तर खाउ लपवण्याची खुबी तर वाखाणण्यासारखी.
पाणी रोजच खराब होते. वास येतो. रोज रात्रीच रिकामे करून धुवून ठेवते. सकाळी भरते. पुन्हा तिच कथा.
असे अस्वच्छ पाणी चिमण्या आणि बुलबुलांना आवडत नसावे. सध्या विरूद्ध दिशेच्या खिडकीत त्यांच्यासाठी पाणी ठेवले आहे. ईथे सगळेच येतात चिमण्या, बुलबुल, दयाळ आणि नको वाटणारी कबूतरे. बहुदा दिवसभरात पाणी संपते. सकाळी लगेच भरले नाही तर सुखद चिवचिवाट करून मागतात.
आजच कमला नेहरू पार्कसमोरून
आजच कमला नेहरू पार्कसमोरून गेले ... दाराजवळचं कैलासपतीचं झाड मस्त फुललंय! कॅमेरा सोबत नव्हता, त्यामुळे फोटो काढायला नाही मिळाले.
<<<<<लगेच भरले नाही तर सुखद
<<<<<लगेच भरले नाही तर सुखद चिवचिवाट करून मागतात.>>>>
अगदी खरं! अरे हो हो असं म्हणून पाणी भरेपर्यंत त्यांना धीर नसतो! आपल्यालाच अपराधी वाटते मग.
गेले ५ दिवस मी नि.ग. वर
गेले ५ दिवस मी नि.ग. वर नव्हते पण कोणीच माझी आठवण काढली नाही
वा गं शाने, इथे लिहिले नाही म्हणजे आठवण आलीच नाही?????????????
साधना बुलबुलने पुन्हा
साधना
बुलबुलने पुन्हा झुंबरात अंडे घातले आहे.
राधा ६ महिन्यांची असल्यापासुनच बुलबुलची जागा आणि बुलबुल ओळखते. तिला विचारले बुलबुल कुठे आहे की झुंबरावर बघते. मागच्या महिन्यापासुन ती अबोलीचे झाडही ओळखते.
ओह.........व्कावळे पाण्यात का
ओह.........व्कावळे पाण्यात का खाद्यपदार्थ आणून टाकतात हे कोडंच आहे म्हणायचं.
असे अस्वच्छ पाणी चिमण्या आणि बुलबुलांना आवडत नसावे. >>>>>>>>>>>हं........
गेले ५ दिवस मी नि.ग. वर नव्हते पण कोणीच माझी आठवण काढली नाही.>>>>>> जागूले तू इथे नाहीस असं वाटतंच नाही गं!
ती अबोलीचे झाडही ओळखते.>>>>>>>मग लेक कुणाची?
"वासाचा पयला पाऊस
"वासाचा पयला पाऊस आयला"............
आत्ता ऑफिसला येताना बांद्रा ते लोअर परेल मातीचा मस्त वास होता. नुकताच थोडासा शिडकावा झालेला होता. लोअर परेल ला तर दिसला सुद्धा.....
Pages