निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला असे गाय-वासरू (चिनी मातीचे-पांढरे शुभ्र चकचकीत) कुठे मिळाले तर कृपया माझ्यासाठी आणा. >>>>नक्की नक्की!!..............:डोमा:

<<<त्यांचा तो निषेध असतो>>>
कावळा हा हुशार पक्षी आहे खरंच..

वासरु अतिशय गोड...अगदी मिठी माराविशी वाटतेय त्याला... Happy

त्या धनेशच्या पिल्लांना दिनेशच्या हातच्या खाण्याची चटक लावली पाहिजे. मग सगळे बाबा-धनेश दिनेशच्या किचनच्या खिडकीत येतील. आपल्या पिल्लांच्या फर्माईशी पुर्‍या करायला>>>>>>>>>>>>>>>:हाहा:
:

धनेशाच्या चर्चेवरून आठवलं; एकदा श्री.चितमपल्ली आणि माधवराव पाटील नागझिर्‍याच्या की नवेगावबांधच्या जंगलात गेले होते. तेव्हा त्यांना (श्री. चितमपल्लींना ) धनचिड्याची (धनेशाची) घरटी, त्यांचा जीवनक्रम अशा बद्द्ल काही निरिक्षण करायचं होतं म्हणून ते माधवराव पाटलांना आणि बरोबर असलेल्या एका गोंडाला काही काही प्रश्न विचारत होते. तेव्हा त्यांनी एक प्रश्न असा विचारला होता की, या धनेशाची चोच अशी का असेल? याचा काही संकेत आहे का? तेव्हा माधवराव पाटील त्यांना म्हणाले होते की, त्याची चोच नाले सारखी (नावेसारखी, त्या आकाराची आहे) ते पाणाड्याचं निर्देशक आहे. हा पक्षी पाण्याची वाट (दिशा) दाखवतो. त्यावेळी श्री. चितमपल्लींनाही त्याच्या चोचीच्या आकाराचा अर्थ किंवा संकेत म्हणा जाणवला होता.

तो प्रसंग किंवा त्यांचे संवाद मी पुस्तकात बघून इथे नक्की देईन. खूप रंजक आहे तो प्रसंग. आदिवासी-गोंड अशा लोकांना रानवाटा उपजत ठाऊक असतात. ती लोकं म्हणजे चालती बोलती वनविद्याच असतात. खरेखुरे निसर्गपुत्रच ते!! नाही?

.

मानुषी, एकदम हँडसम मॉडेल आहे. कसल्या सही पोझेस दिल्यात. दुसरी पोझ सगळ्यात आवडली, त्यात त्याचा अ‍ॅटिट्युड अगदी दिसून येतोय. आता तुझ्या मानसपुत्राला मॉडेलिंगच्या ऑफर्स येणार बघ!

साधना ... Biggrin

दिनेशदा, स व र वरून व्यक्तीसापेक्ष शब्द ... मस्तच. Happy

काय वो मामी......... .एक सुपुत्र आणि एक सुकुत्रं (लुई!)आहेत तेवढे बास की वो! ह्यो आनी मानसपुत्र कशापायी?:फिदी:
आमचं सुकुत्रं...........

हो शांकली, आहे खरा तसा त्याचा लेख. उंबराची झाडे, पाण्याचा प्रवाह आणि धनेश असाही काहीतरी संबंध आहे.

मामी, सुकुत्रं Happy Happy

केशराचा पाऊस हि चितमपल्लींची कादंबरी, मोर केशराचे झुलती पहाटेस दारी, ही गाण्यातली ओळ..
यावरून केशराच्या शेताबद्दल काही वेगळ्याच प्रतिमा मनात निर्माण होतात.. पण प्रत्यक्षात ते शेत, त्यातली काढणी वगैरे फारच वेगळे प्रकरण असते. खालची लिंक बघाच.

http://www.youtube.com/watch?v=8ys5mGceEIs

शोभा, खरंच मला सुद्धा त्या चिनिमातीच्या गाय-वासराची फार- फार आठवण येते. Uhoh
वर्षू, तुमच्या तिकडे लक्ष ठेव गं खेळण्यांच्या दुकानात गेलीस तर.

पण मजा बघितली का ? जमिनीतून नुसती फुलेच आली आहेत. पाने वगैरे काहीच नाही.
आणि मला वाटतं, केशराचे तंतू फुलातून वेगळे करायचे नाजूक काम हातानेच करावे लागते आणि ते काम,
शक्यतो स्त्रिया किंवा लहान मुलेच करतात.

प्रज्ञा, तुळशीबागेत मिळायला हवेत. मी पण लक्षात ठेवेनच.
का कुणास ठाऊक, पण गाय आणि दत्ताची मूर्ती असे नेहमी एकत्रच माझ्या डोळ्यासमोर येते. अगदी लहानपणी नियमित जात असलेल्या, मालाड पूर्वेच्या दत्तमंदिरातील मूर्तीमूळे असेल ते.

सुकुत्र!!............:हाहा:

मानुषी, तिसर्‍या फोटोत त्याने चक्क डोळा मारलाय!

बाकी लुई मात्र अगदी शाणा मुग्गा आपलं कुत्रा वाटतोय बरंका!..:डोमा:

दा, लिंक ओपन होत नाई........:अरेरे: आय मीन फुलंच दिसताहेत फक्त..........फिल्म पुढे सरकतच नाईये...

आत्ता दिसली ती फिल्म. आणि तुम्ही वर म्हणाल्यानुसार लहान मुलं किंवा बायकाच केसर वेगळे करताना दिसताहेत.

ईथे सगळेच कसे छान छान...

कावळ्यांनी घरटी करायला घेतली बहुदा......... माझ्या घरच्या घरट्यात पिलूसुद्धा जन्मले!!

kavala 1.jpgkavala 2.jpg

दरवर्षी खिडकीच्या बॉक्स ग्रीलमधे कावळ्याचे एक घरटे बांधले जाते. बाळंतपण होते. जरा खिडकी उघडली की कावळे काव-काव करून उच्छाद आणतात. पण त्यांचे काम झाले, पिले उडाली की घरटेसुद्धा कावळेच मोडतात. कधी मला काढून टाकावे लागले नाही.

मधुरा - कावळा हा पक्षी कोणालाही त्याच्या घरट्याच्या आसपासही फिरकू देत नाही, तुला हे असे सुरेख फोटो कसे काय टिपता आले ?? (तुझा चांगला मित्र झालेला दिसतोय .... Happy )
घरट्यात पिल्लू असेल तर विचारायलाच नको - अति म्हणजे अतिच काळजी घेतो पिल्लाची .....

शशांक, फोटो मुलाने -- मल्हारने काढले आहेत, त्याच्या मोबाईलवर. मला कॅमेरासुद्धा धरता येत नाही. सगळे डोळ्यात साठवता येते. असो.

ज्या खिडकीत हे बांधकाम झाले आहे ते घर आम्ही वापरत नाही. फक्त काही झाडे हॉलच्या ग्रीलमधे ठेवली आहेत आणि घरात काही सामान. झाडांना पाणी घालायला रोज जावे लागते. स्वयंपाकघराची खिडकी कावळ्यांची आहे. ती सहसा उघडतच नाही म्हणून दरवर्षी पाळणा हलतो.

हॉलच्या ग्रीलमधे कबुतरांची पण फार बाळंतपणे झाली. आता मात्र होत नाहीत.

"शाणा मुग्गा!" खरंच गं शांकली ... अगदी बरोब्बर ओळखलंस!
मधू म................मल्हारला शाब्बासकी हं! मस्त काढलाय फोटो!

मस्त फोटो. आमच्याकडेही सध्या बाळंतपणे सुरू आहेत, पण झाडांवर. आणि कावळा कावळी दोघेही लक्ष ठेऊन असतात. कोकिळाबाईंची लबाडी त्यांना कळलीय, उगीच दुस-याची पोरे कशाला वाढवा म्हणत दोघेही जागता पहारा देत असतात.

साधना, Happy
कावळ्याचे घरटे मी प्रथमच पाहातेय. मल्हारला माझ्यावतीने "धन्यवाद" सांग.

सुंदर फोटो. खरं तर कावळ्याच्या इतका सुंदर फोटो मी यापुर्वी बघितलाच नव्हता.

गेली १० वर्षे, आमच्या किचनच्या जाळीवर नियमितपणे एक कावळा येऊन त्याची हक्काची चपाती घेऊन जातो. ( वडील गेल्यानंतर हे सुरु झाले. )
आई आणि वहिनी त्याच्याशी बोलतात. म्हणजे अजून चपात्या झाल्या नाहीत मग ये. ( तो खरंच जातो आणि थोड्या वेळाने परत येतो. ) आज तूझ्यासाठी पान ठेवणार आहे, ते ठेवले कि ये.
माझ्या वडीलांसाठी जे पान आम्ही ठेवतो, त्यावर पाणी शिंपडून आमची पाठ वळली कि त्यावर कावळे तुटून पडतात. आजवर कधीही वाट बघावी लागली नाही.
माझ्या वडीलांच्या मृत्यूचा धसका घेऊन, माझे अत्यंत प्रेमळ असे सावंतवाडीचे भाऊकाका, त्यानंतर ६ महिन्यातच गेले. त्यांच्या पानाला आजवर कधीही कावळा शिवलेला नाही. काकीने अनेक तीर्थक्षेत्री जाऊन बघितले, पण नाहीच.

छान गप्पा आणि फोटो !

मधु-मकरंद,
दुर्मिळ आणि छान फोटो , ते पिल्लु इतकं मोठं दिसलं त्यामुळे पहिल्यांदा ते ओळखलंच नाही..

कावळ्यांबद्दल आपण इतकं नवलाच्या ,अजब कथा ऐकतो त्यामुळे काही तरी दुढ ज्ञान, विद्या त्यांच्याकडे आहे अस वाटतं..

कावळ्यांबद्दल आपण इतकं नवलाच्या ,अजब कथा ऐकतो त्यामुळे काही तरी दुढ ज्ञान, विद्या त्यांच्याकडे आहे अस वाटतं >>

अगदी खरं!

आमच्या एका नातेवाईकांची दशक्रिया दादरला केली होती. तिथे अक्षरशः ओळीने पिंड ठेवलेले असतात कावळ्यांसाठी.
त्यादिवशी कावळे ही खुप होते, पण यांच्या पिंडाला अजिबात कावळा नाही शिवला. अर्धा-पाऊण तास झाला भटजी कंटाळले (त्यांना दुसरीकडे बोलावणे होते) आणि दर्भाचा कावळा केला.

आश्चर्य म्हणजे आजुबाजुला सगळ्या पिंडांना कावळे शिवत होते. यांच्या पिंडाच्या जवळ येत आणि मान हलवून निरखून बघत आणि दुर होत.

मधू म................मल्हारला शाब्बासकी हं! मस्त काढलाय फोटो!>>>>>>>>>>+१ Happy

दुर्मिळ आणि छान फोटो , ते पिल्लु इतकं मोठं दिसलं त्यामुळे पहिल्यांदा ते ओळखलंच नाही..+१ Happy

मानुषी, तुझा मानसपुत्र आणि सुकुत्र छानच. Happy

दिनेशदा, स व र वरून व्यक्तीसापेक्ष शब्द ... मस्तच.>>>>>>>.दिनेशदा, (अंगोलापल्ली ) Lol ___________/\___________. Happy

Pages