निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी सगळं आयुष्य निसर्गात वेचलं. निवृत्त झाल्यावरही त्यांचा जीव शहरात रमेना म्हणून ते परत जंगलात गेले.. त्यांच्या नखाचीही सर माझ्या लेखनाला कधी येणार नाही..

००००००००००००००००००००००००००००००

मायबोलीकर जाह्नवीने मला लुआंडा मधल्या एका दुकानाचा पत्ता दिला होता. ते शोधायच्या मोहीमेवर असताना. एका पार्किंगमधे मला भला मोठा पिंपळ दिसला. अंगोलातला पहिलाच पिंपळ बघून मी हरखलो होतो कारण त्यावेळी मी ज्या ग्राफानील भागात रहात होतो, तिथे पिंपळाचे एकही झाड नव्हते.

पण त्या क्षणभरात मला जाणवले कि तो पिंपळ वेगळा आहे. नेमका फरक लक्षात येईना. तो लक्षात आला, हि दोन झाडे, आमच्या कॉलनीत शेजारी शेजारी बघितली तेव्हा... बघा तूम्हाला फरक जाणवतोय का ?

पाऊस!!!!!!!!! आला आमच्याकडे... Lol

ते पिंपळ किती वेगळे वाटत आहेत..

ते कावळ्याने काड्या जमवण्यावरुन आठवलं.. मागील आठवडयात बालगंधर्वला बसले होते. तिथे एक शोभेच्या झाडाशी काऊची झटापट चालली होती.त्याचं एक पान त्याने नीट कापून ठेवलं चोचीने. नंतर त्याला अगदी शेंड्यावरचं पान हवं होतं. पण त्या झाडाला खोड नसल्याने त्याला तिथे जाता येईना. मग त्याने झाडाला प्रदक्षिणा घालत खुप विचार केला. मधेच फ्रस्ट्रेट होऊन चोच आपटून घेतली शेजारच्या झाडावर. मग शेवटी वैतागला आणि तिसरीच काडी घेऊन उडाला.. Happy

हो बेलफळाला फळे येतात. आईने दोनदा दिलि होती. ती अशीच खाऊन गेली. ह्यावेळी मुरांबा किंवा सरबत करणार आहे.

दोन्ही पिंपळ विरुद्ध आहेत दिनेशदा.

हो शांकली. काही काही पोळ्यांच्याही जवळ माश्यांच्या भितीने जाता येत नाही.

ह्म्म्म.. दोन्ही पिंपळाच्या पानांच्या आकारात फरक आहेसा वाटतोय्..एक चिंचोळी तर दुसरी वाटोळी दिस्तायेत..

दा, पहिल्या फोटोतल्या पिंपळाचं (पानाचं) टोक निमुळतं होत बारीक रेघेसारखं असतं तसं नाहीये का? आणि फांद्याही खाली लोंबलेल्या वाटताहेत. पण दुसरा पिंपळ मात्र आपल्याकडच्या पिंपळासारखाच वाटतोय. पण मलावाटतं की आपल्याला इतके छोटे पिंपळ बघायची सवय नाहीये. कदाचित त्यामुळे सुद्धा असं वाटातंय का?

दिनेशदा,
पहिला पिंपळ आहे की पिंपरी? मागे मला पण असेच झाड दिसले होते त्याचा फोटो मागील भागात टाकला होता. शांकलीने ते पिंपरीचे झाड असल्याचे सांगितले होते.
पहिल्या फोटोतल्या झाडाचा विस्तार पण पिंपळासारखा नाहीये, फांद्या खालीपण पसरल्या आहेत.

दुसर्‍या फोटोत मात्र झाड कसे पिंपळासारखे ठामपणे उभे आहे.

मला ते दोन्ही पिंपळ वाटत नाहीयेत Happy अर्थात ते पिंपळच असतील ही गोष्ट वेगळी,. पण इथले पिंपळ कुटूंबवत्सल दिसतात, वाढताना सावली नीट खाली पसरुन पडेल याची काळजी घेत वाढतात. Happy

बेलफळ खूप औषधी असते. एक तर पोटाच्या विकारावर हमखास उपाय, आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यात जिरे सैंधव घालून सरबत प्यायलं तर उन्हाळाही बाधत नाही.
माझे वडील या दोन्ही गोष्टी करून ठेवायचे.

दिनेशदा, अभिनंदन! Happy

पहिल्या पिंपळाची पाने, पातळ वाटतात. तसेच त्याच्या बहुतेक फांद्या जमिनीच्या दिशेने पसरलेल्या आहेत. ते पिंपळाचे सोंग घेण्याचा प्रयत्न केलेले झाड वाटतेय. Happy
दुसरा पिंपळ खंबीरपणे उभा आहे. तोही फांद्याना शिस्तीत ठेऊन.आणि आकाशाला भेटायला निघालेला. Happy

ईनमीनतीन Happy

त्या सगळ्या रूजल्या त्याची आता छोटी छोटी रोपे तयार झाली आहेत. कुणाला पाहिजे असेल तर सांगा. >>> जिप्सी मला चालतील. फक्त ती लावायला अंगण असलेले घर पण दे Wink

मानुषीताई, 'म्हातार्‍या' मस्त.

त्या धनेशच्या पिल्लांना दिनेशच्या हातच्या खाण्याची चटक लावली पाहिजे. मग सगळे बाबा-धनेश दिनेशच्या किचनच्या खिडकीत येतील. आपल्या पिल्लांच्या फर्माईशी पुर्‍या करायला Happy

मी त्या पिंपळाला झुलता पिंपळ नाव ठेवलेय. दोन्ही पिंपळच आहेत. मोठे झाड असल्यावर दोन तीन मीटर लांब फांद्या झुलत असतात.
मला आणखी नवल वाटतय. कि या लोकांनी, पिंपळाची एवढी रोपे कशी तयार केली ?

पिंपळाचा आणखी एक प्रकार कोकणात खास करुन समुद्रकिनारी दिसतो. त्याची पाने जरा जास्तच पोपटी रंगाची असतात.

अबोली,

कावळ्यांचा आणखी एक खेळ असतो. समजा त्यांना हल्ला करता येईल त्यापेक्षा मोठा जर पक्षी झाडावर आला तर सुरक्षित अंतरावर ते गोलाकार बसतात आणि चोचीजवळचे पान, न तोडता केवळ ओढतात. घोगर्‍या पण दबक्या आवाजात काव काव करतात. त्यांचा तो निषेध असतो.

माधव, या धनेशांची आणखी एक गंमत. आपल्याला त्यांची चोच त्यांच्या शरीराच्या मानाने लांब आणि बोजड वाटते. पण त्यांना त्याची सवय असते.
कर्नाळ्याला एक धनेश होता, तो त्याच्या दिशेने फेकलेला कुरमुरा पण चोचीने व्यवस्थित झेलायचा.

त्या धनेशच्या पिल्लांना दिनेशच्या हातच्या खाण्याची चटक लावली पाहिजे. मग सगळे बाबा-धनेश दिनेशच्या किचनच्या खिडकीत येतील. आपल्या पिल्लांच्या फर्माईशी पुर्‍या करायला >>>>>>>>
माधव ......अगदी अगदी!

त्या धनेशच्या पिल्लांना दिनेशच्या हातच्या खाण्याची चटक लावली पाहिजे. मग सगळे बाबा-धनेश दिनेशच्या किचनच्या खिडकीत येतील. आपल्या पिल्लांच्या फर्माईशी पुर्‍या करायला >>>>>>>>+१००००००० Lol

वासरावरुन आठवले.

ऐशुला ८वी-१०वी संस्क्रुत होते. पण खुप सारे तिच्या डोक्यावरुन जायचे. त्यात एक धडा होता - गौरवस्य प्रिय वासरः. तिला वासरः म्हणजे वासरु वाटले. बाकी धड्यामध्ये फक्त एकदाच वासराबद्दल लिहिलेय आणि नंतर त्याचा उल्लेखही नाही म्हटल्यावर संस्कृतात अशीच पद्धत असते असा तिने समज करुन घेतला. तिने हिंदीतल्या 'मिसाल' ह्या शब्दाचा अर्थ मिसाईल असा लावलेला कारण धड्याच्या शेवटी मिसाईलचे चित्र होते.

जेव्हा सरांच्या कानावर तिने लावलेले अर्थ गेले तेव्हा त्यांनी त्वरेने एक हिंदी-संस्कृत मराठी डिक्शनरी आणुन वर्गात टेबलावर कायमची ठेऊन दिली आणि कुठल्याही शब्दाचा अर्थ आपल्या मनाने लावण्याअगोदर एकदा डिक्शनरीत डोकावुन बघा अशी सगळ्या मुलींना तंबी दिली Happy डिक्शनरीचा फायदा झाला. हिंदी-संस्कृतमध्ये १०० पैकी ९५ मिळाले तिला.

रच्याकने वासरः म्हणजे दैनंदिनी, म्हणजे मराठीत डायरी. Happy

वासरू छानच आहे. Happy
आमच्याकडे लहानपणी चिनीमातीची पांढरी शुभ्र (चकचकीत) बसलेली गाय तिच्या गळ्यात लाल गोफ आणि तिला टेकून बसलेल गोंडस वासरू होत. ते इतकं छान दिसायच. पण अनेक ठिकाणी प्रवास करता करता हरवलं कुठेतरी. मला खूप वाईट वाटतं. त्याची आठवण आली की. Sad
कुणाला असे गाय-वासरू (चिनी मातीचे-पांढरे शुभ्र चकचकीत) कुठे मिळाले तर कृपया माझ्यासाठी आणा. Happy

Madhav yes you are right. I wrote diary by mistake. In the chapter it is used for day- gaurav favourite day is sunday and chapter describes sunday.

:::

साधना, वासरः म्हणजे दिवस. त्यावरून सूर्याला वासरमणी असे नाव आहे. >>>>> पण पु. लं. नी (बहुतेक बटाट्याच्या चाळीत असावे) वासरी म्हणजे दैनंदिनी असा उल्लेख केल्याचे आठवतंय ..... ही शाब्दिक कोटी का हा खराच असा शब्द आहे ??? Happy

साधना, ऐशूचे पण खरेच आहे. आपण मनात असेल तेच वाचतो.
व स र आणि एक काना, अशी नोंद झाली.. कि मला वारस ( वृक्ष), शांकलीला (सोन) सावर आणि जागूला रावस (मासा) दिसेल त्यात !

देखणं आहे हं वासरू!! खूप गोग्गुडं आहे. Happy खरंच त्याची दृष्ट काढायला सांग बाई!!

व स र आणि एक काना, अशी नोंद झाली.. कि मला वारस ( वृक्ष), शांकलीला (सोन) सावर आणि जागूला रावस (मासा) दिसेल त्यात !>>>>>>>>>>>>> Lol

ऐशुला ८वी-१०वी संस्क्रुत होते. पण खुप सारे तिच्या डोक्यावरुन जायचे. त्यात एक धडा होता - गौरवस्य प्रिय वासरः. तिला वासरः म्हणजे वासरु वाटले. बाकी धड्यामध्ये फक्त एकदाच वासराबद्दल लिहिलेय आणि नंतर त्याचा उल्लेखही नाही म्हटल्यावर संस्कृतात अशीच पद्धत असते असा तिने समज करुन घेतला. तिने हिंदीतल्या 'मिसाल' ह्या शब्दाचा अर्थ मिसाईल असा लावलेला कारण धड्याच्या शेवटी मिसाईलचे चित्र होते.>>>>>>>>>>>> Lol

Pages