मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंत्रालय नव्याने झालं त्यावेळी, मंत्रालय या शब्दावर पेपरमधे वाद झाला होता.>>>>> माझी मावशी मंत्रालयात कामाला होती पण ती नेहमी सचिवालयच म्हणायची.

आम्ही मूळ मुंबईतून आलो अस, नॉन इंडियनस त्यात बॉलीवूड प्रेमी असतील तर त्यांना कळल तर त्यांच्यामते आपल्या अगदी आसपास शारुख ( इथे त्याला तसाच म्हणतात) प्रियंका रहातात आणि आपल्याघरी रोज त्याचं येण जाण असत असा भाव त्यांच्या तोंडावर असतो '.

दुसरा वर्ग असा आहे कि मुंबईतून आलात म्हणजे "स्लम " एरीयातून आलात असा भाव दिसतो . Sad

पण जो खरा मुंबईकर असतो तो मात्र सदैव यह है बॉम्बे ( मुंबई) मेरी जान असच म्हणत असतो .

गौरीम,

मस्त प्रचि आहे. ही बस वळतांना वरच्या मजल्यावरच्या समोरच्या खिडकीत बसलेल्यांना खूप मज्जा येत असे. अश्या ट्रेलर बशी मुंबईत ८० च्या पूर्वार्धात बंद झाल्या. मात्र बडोद्यात खूप उशीरापर्यंत चालू होत्या. हल्ली तिथे आहेत का ते माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

हीरा,

>> Yo Rocks,this famous statue stands at the top of the dome of Victoria Terminus building

मला वाटतं की हा ब्रिटानिया देवीचा पुतळा आहे. एका हाती त्रिशूळ आणि दुसर्‍या हाताखाली चाक असे पारंपारिक चित्र सर्वत्र आढळते.

Britannia-_traditional.jpg

मला आठवतं त्याप्रमाणे ही मूर्ती हटवावी म्हणून लोकांनी अर्ज केले होते. जरी तिच्या हातात मशाल असली तरी तिच्यावर विद्युद्दंड म्हणून त्रिशूळ वा चतु:शूल बसवलेला दिसतो. म्हणून बरेच लोक हे ब्रिटीश साम्राज्याचे प्रतीक समजतात.

आ.न.,
-गा.पै.

<< आजच्या लोकसत्तामधिल प्रची >> मला निश्चितपणे आठवतं कीं प्रायोगिक तत्वावर घेतलेल्या या मोजक्याच 'ट्रेलर बसेस' वळणावर उलटण्याच्या घटना घडल्यामुळे 'बेस्ट'ने वापरातून काढून घेतल्या.

<< मला आठवतं त्याप्रमाणे ही मूर्ती हटवावी म्हणून लोकांनी अर्ज केले होते.>> अशा मूर्तिंमुळें साम्रज्यवादाचं उदात्तिकरणच होतं असं नाहीं; मला तर वाटतं, अशा कांही मूर्ति पुढच्या पिढ्याना सावधगिरीची सूचना म्हणून मुद्दाम ठेवाव्या. शिवाय, मूर्ति हलवल्याने इतिहास तर लपत नाहीच !

ती ट्रेलर बस वळताना, थोडी तिरकी व्हायची.
३५१ ठक्कर बाप्प पेट्रोल पंप जवळ आणि त्या आधीच्या तीन तलावाजवळ वळताना, चांगलीच तिरकी व्हायची.
अनेक वेळा वरच्या मजल्यावर जागा असूनही लोक जायचे नाहीत.

मला निश्चितपणे आठवतं कीं प्रायोगिक तत्वावर घेतलेल्या या मोजक्याच 'ट्रेलर बसेस' वळणावर उलटण्याच्या घटना घडल्यामुळे 'बेस्ट'ने वापरातून काढून घेतल्या.

या प्रायोगिक तत्वावर होत्या? कारण माझ्या लहानपणी मी कायम यांच्यातुनच प्रवास केलाय. आत 'डोके सांभाळा' ही पाटी असायची Happy

एक ट्रेलर बस बोरिवली ते सायन अशी सुरू केलेली, ती मात्र प्रायोगिक तत्वावर केलेली हे पेपरात वाचलेले. ३४१ (हाच नंबर असावा, आता आठवत नाही) बस नेहमीची आणि ट्रेलर अशा दोन्ही अवतारात होती. नेहमीची बस नेहमीच्या अवतारात आणि ट्रेलर पिवळ्या रंगाची. तिला सुरवातीला दोन कंडक्टर्स होते. स्वरुप साधारण बाहेरगावच्या ट्रेन्स कशा मध्ये कापडी जोडणीने जोडलेल्या असतात तसे दोन डबे मधुन जोडलेली बस. मी कधीकधी चढायचे हिच्यात. मज्जा यायची उगीचच. नंतर दोन कंडक्टरांच्या जागी एकच झाला, मागच्या बाजुचे दोन्ही दरवाजे बंद झाले, आणि मग बसच बंद झाली. मुंबईच्या ट्रअ‍ॅफिकमध्ये एवढी लांबलचक बस चालवणे आणि वळवणे दोन्ही अशक्य हे कारण दिले गेले.

गा. पै., होय ती ब्रिटॅनिया देवीच आहे. आपण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तो पुतळा हटवून तिथे हिंदमातेचा पुतळा लावावा अशी टूम बर्‍याच वर्षापूर्वी निघाली होती खरी पण त्या मागणीने जोर पकडला नाही. याची कारणे दोन. एक तर मुंबईकर इतका घाईत असतो की वीटीला उतरल्याबरोबर ऑफिसच्या दिशेने धावतच सुटतो. परततानाही बसमधून उतरतो तो थेट लोकलमध्ये उडी मारतो. मध्ये थांबून मान वर करून वीटीचा घुमट बघायला त्याला वेळच नसतो .माझी खात्री आहे, पाच टक्के सुद्धा मुंबईकरांना वीटीच्या इमारतीवर असा काही पुतळा आहे हे ठाउक नसेल. दुसरे म्हणजे समोर एखादे शिल्प,स्थापत्य दिसत असले तरी त्यात रस घेउन ते निरखण्याची सर्वसामान्य मुंबईकराची सवय आणि आवड नाही. कुठे क्रिकेट मॅचचा टीवी पडदा लावला असेल तर मुंबईकर तिथे थबकेल,एखादा बॉल, एखादा स्ट्रोक आवडला तर दाद देईल, अनोळखी शेजार्‍याशी चर्चा करून शेरेबाजी करेल पण कलाकृतींकडे ढुंकूनही बघणार नाही. न्यू इंडिआ अ‍ॅशुअरन्सच्या इमारतीवर शेतकर्‍याचे एक उठावशिल्प आहे. ते कशाला, फाउंटनचे शिल्प तरी किती जणांनी पाहिले असेल?

शिल्पांवरून आठवले,मुंबईत जुना इतिहास अंगाखांद्यांवर वागवणारी अशी अनेक छोटीछोटी स्थापत्ये/ शिल्पे आहेत. मला नक्की आठवत नाही पण झेविअर्स कॉलेजकडून धोबीतलाव चौकात जाताना रस्त्याच्या टोकाला घोड्यांना आणि गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेली एक पोय होती. ही पाणपोयी दुर्लक्षित, डबराने वेढलेली होती तरी तिच्यावरच्या फलकामुळे मुंबईत एकेकाळी घोडागाड्यांचे किती प्रस्थ होते ते समजून येई.न जाणो,शंभर वर्षांपूर्वी मुंबईतल्या घोड्यांच्या ट्रॅम्सचे घोडेही इथे पाणी पीत होते असतील.

<< १००१. अभिनंदन मुंबई. >> +१.
माझ्या रडारच्या रेंजमधेच असूनही मुंबईतल्या अनेक गोष्टी मेंदूच्या स्क्रीनवर उमटल्याच नव्हत्या. त्या या धाग्यामुळें लक्षांत आल्या व येताहेत ! शिवाय, माझ्या सिस्टीममधे भिनलेल्या कांहीं जुन्या आठवणी बाहेर काढण्याचा स्वार्थही या धाग्यामुळे साधतां आला. मामी व इथल्या सर्वच पोस्ट-कर्त्यांचे, वाचकांचे मनःपूर्वक आभार व शुभेच्छा.

साधना, ९० लिमिटेड वरही ती पिवळी बस होती काही दिवस. पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही.
सांताक्रूझ, बोरीवली भागात काही मिनी बसेस मात्र चांगल्या चालत होत्या. मनोरीची जेटी सेवा पण बेस्ट्च चालवत असे. ( थोडक्यात, मुंबईच्या बदलत्या गरजांसाठी बेस्ट नेहमीच तत्पर असते. )

मढ ते वर्सोवा लाँच मात्र बहुतेक बेस्ट कडे नव्हती. आता ती आहे का माहीत नाही. अत्यंत गलिच्छ अशा गटारगंध असलेल्या खाडीतून ती जात असे. पण वेळ मात्र खुपच वाचत असे.

मागील पानांवर अनेकांनी भाऊच्या धक्क्याबद्दल लिहले आहेच, तरीपण मला माहीत असलेली थोडीफार माहीती इथे लिहून माझाही ह्या धाग्याला थोडाफार हातभार.
----------------------------------
सूर्य उगवायच्या अगोदरच तिथे माणसांचा राबता सुरू व्हायचा. टॅक्सी , खाजगी गाड्या , हातगाड्या आणि कधी कधी तर टांगे आणि व्हिक्टोरियासुद्धा त्या गदीर्तून वाट काढत येताना दिसायच्या. माणसांची तुफान गदीर् , फेरीवाल्यांचा कलकलाट , त्यातच कानठळया बसवणारा आगबोटीचा भोंगा आणि हे सारे कमी वाटले तर आसमंतात भरून राहिलेला ताज्या माशांचा आणि सुक्या मासळीचा उग्र दर्प. हे वर्णन आहे , १५-२५ वर्षांपूवीर्पर्यंतच्या भाऊच्या धक्क्याचे.

आज भाऊचा धक्का तिथे आहे , पण ती धावपळ नाही. गाड्यांचे भों भों नाहीत आणि चिवडा चिक्की आणि चहा विकणाऱ्यांचे तार सप्तकातले आवाजही नाहीत. मासळीचा कुबट वास तेवढा शिल्लक आहे. भाऊचा धक्का असा उदासवाणा होण्याचे कारण मुंबई आणि गोवा दरम्यानची प्रवासी बोटसेवा बंद झाली हे आहे. आताही भाऊच्या धक्क्यावरून छोट्या मोठ्या बोटी सुटतात. त्या कोकणातील अन्य बंदरांची वाहतूक करतात. त्यातून माल वाहतूक होते. पण 1 मे 1988 रोजी कोकण बोट सेवा बंद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्याचे वैभव अचानक नाहीसे झाले , ते काही पुन्हा आलेच नाही.

मुंबईतील बॅलार्ड पियर इतिहासजमा होऊन काही वर्षे लोटली. माझगाव डॉकही फक्त व्यापारी व नौदलाची जहाजे बनवण्याचा कारखाना बनून राहिला. न्हावा शेवा बंदराच्या उभारणीमुळे आंतरराष्ट्रीय जहाजसेवा मुंबईऐवजी तिथून सुरू झाली. अशा अवस्थेत भाऊचा धक्का मात्र आपले मराठीपण टिकवत उभा राहिला , हेच महत्त्वाचे. गेली अनेक वर्षे मराठीतील भाऊचा धक्का आणि इंग्रजीतील फेअरी व्हार्फ पाहताना हे भाऊ कोण , असा प्रश्न मनात यायचा. या बंदरावर मुख्यत्वे ये-जा कोकणाकडील माणसांची. तिथे मोठ्या माणसाला भाऊ म्हणून संबोधण्याचीच प्रथा. त्यामुळेच हे धक्कावाले भाऊ कोण , हे प्रश्ान्चिन्ह बरीच वषेर् मनात रेंगाळत होते.

डॉकयार्ड रोडजवळ कोकणातल्या प्रवासी वाहतुकीसाठी हा धक्का 1839 मध्ये उभा राहिला. त्याचे नाव तेव्हाच ' भाऊचा धक्का ' असे पडण्याचे कारण लक्ष्मणभाऊ हरिश्चंद अजिंक्य या मराठी कंत्राटदाराने स्वखर्चाने तो बांधला होता. त्यामुळे या धक्क्याचे कधीही अधिकृत नामकरण झाले नसूनही ' भाऊचा धक्का ' मराठी समाजमनात अमर झाला.

1788 च्या सुमारास उरणला जन्मलेले लक्ष्मण हरिश्चंद अजिंक्य तेव्हाही पोटाच्या उद्योगाच्या शोधातच मुंबईत येऊन पोहोचले. वयाची विशी गाठायच्या आतच पितृछत्र हरपल्याने या तरुणावर आई आणि बहिणीच्या चरितार्थाचीही जबाबदारी होती. पण कष्ट करण्याची तयारी आणि अंगिभूत हुषारी यांच्या जोरावर लक्ष्मणभाऊ अजिंक्य एका इंग्लिश गन कॅरेज फॅक्टरीत कारकून म्हणून कामाला लागले व तेथेच मोठे अधिकारीही बनले. याच कंपनीचे मालक कॅप्टन रसेल यांच्या साथीने या उरणच्या तरुणाने ' रसेल भाऊ अँड कंपनी ' स्थापन केली. त्या काळात मुंबईतील अनेक भागात भराव घालून खोलगट , पाणथळ भाग जोडण्याचे काम चालू होते. रसेल भाऊ अॅड कंपनीला चिंच बंदरापासून मशीद बंदरापर्यंतच्या आणि कुर्ला रोडच्या भरावाचे मोठे काम मिळाले. त्याच्या बदल्यात नवीन जागेचा वापर आणि कर्नाक बंदर , चिंच बंदर आदी ठिकाणी मालाच्या चढउताराचे मक्तेदारी अधिकार मिळाले. बघता बघता उरणचा लक्ष्मणभाऊ भाऊशेठ बनला. मोठी श्रीमंती आली , तरी भाऊचे मन भूतकाळातच रमत होते. आपली कोकणची माणसं , त्यांच्या समस्या यामुळे त्यांचे मन दु:खी व्हायचे. बंदरावर ते तासनतास आपल्या भूतकाळाचाच विचार करत राहायचे.

याच काळात म्हणजे 1831 मध्ये क्लेअर बंदर उभे राहिले. आणखी काही वर्षांतच कर्नाक बंदरही आले. ब्रिटिश गव्हर्नरांच्या नावे उभ्या राहिलेल्या या बंदरांत इंग्लंडहून साहेबांना घेऊन येणाऱ्या मोठ्या बोटींची सोय झाली. पण कोकणातून येणारी माणसे मात्र सामानसुमानासह गुडघाभर , तर कधी कंबरभर पाण्यात उतरून किनाऱ्याला लागत होती कारण त्यांच्या बोटी लागण्यासाठी धक्काच नव्हता. भाऊंच्या मनात हे शल्य सलत होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून परवानगी मिळवली व कचरा टाकून समुदात भराव घातला व खास कोकणातल्या बोटींसाठी 1839 मध्ये ' भाऊचा धक्का ' उभा राहिला. त्याला लागलेल्या पहिल्या बोटीचे भाऊंनी स्वत: स्वागत केले.

पण मुंबई-गोवा हायवे झाला व बससेवाही सुरू झाली आणि ' भाऊचा धक्का ' कालबाह्य ठरू लागला. वाटेतल्या अनेक बंदरांत हलगजीर्पणामुळे गाळ साठत गेला आणि बोटी धक्क्याला लावणे दुरापास्त झाल्याने त्यांचे टप्पे कमी कमी होत गेले. त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही झालाच. त्यामुळेच 1845 पासून प्रवासी सेवा करणारी बाँबे स्टीम नेव्हिगेशन (बी एस एन)कंपनी 125 वर्षांनंतर तोटा सहन न झाल्याने 1964 मध्ये बंद पडली. कोकणवासीयांची मोठी पंचाईत झाल्याचे पाहून यशवंतराव चव्हाण यांनी विश्वासराव चौगुलेंना गळ घालून बोटसेवा पुन्हा सुरू केली. या सेवेचा गवगवा खूप झाला पण आथिर्क गणितांची उत्तरे चुकत राहिली. त्यातच 1971 मध्ये कंपनीची ' रोहिणी ' ही बोट मालवण बंदरात बुडाली आणि कंपनीचे कंबरडेच मोडले. अखेर या सेवेचेच राष्ट्रीयीकरण झाले आणि 1973 मध्ये मोगल लाइन्सने कोकणसेवक व कोकणकन्या या दोन बोटींची सेवा सुरू केली. दरम्यान वाटेरवरील बंदरांची संख्या केवळ दोनवर आली.

त्यातच 29 जानेवारी 1988 रोजी मुंबईहून पणजीला गेलेली ' कोकणसेवक ' परत आलीच नाही. बऱ्याच काळाने असे कळले की , श्रीलंकेला जाणाऱ्या भारतीय शांतिसैनिकांची वाहतूक करण्यासाठी भारत सरकारने कोकणसेवक ' पळवली '. उरली केवळ कोकणशक्ती. पण तिची शक्तीही क्षीण होत गेली आणि 1 मे 1988 ला तिने शेवटचा श्वास घेतला. मुंबई-गोवा दरम्यानची बोट सेवा कायमची बंद पडली आणि मग ' भाऊचा धक्का ' उदास दिसू लागला , ती स्थिती आजही कायम आहे. धक्क्यावरचे मोठे छत , त्यावरील ' भाऊचा धक्का ' ही मोठ्ठाली अक्षरे , दुकानांच्या रिकाम्या टपऱ्या आणि आता मोडकळीस आलेले बाक गतवैभवाची आठवण करून देतात , इतकेच.

३५१ ट्रेलर बसमधुन लहनपणी कायम प्रवास करायची वेळ यायची.कलेक्टर्स कॉलनीच्या स्टॉपला चढून सायनच्या शाळेत जाताना त्या वयात ट्रेलर बसमधून जाताना मजा वाटायची.त्यावेळी बसचे हाफ तिकिट १० पैसे होते. Happy

विकास, खुप छान लिहिले आहेत. माझ्या आठवणीत बोटीचा प्रवास आहे. पण त्यावेळीदेखील मालवण बंदरात लांबवर बोट उभी रहात असे.
रोहीणीबद्दल मी आणि भाऊंनी पण लिहिले आहे.
त्यावेळी गोवा हायवे नव्हता त्यामूळे आमचा मालवणचा प्रवास व्हाया कोल्हापूर असाच व्हायचा.
खाडी पूल पण नव्हता त्यामूळे पुण्याला जायलाच ४/५ तास लागायचे. रातराण्या नव्ह्त्या, प्रवास दिवसाचा, मे महिन्यातल्या उन्हाळ्यातला.

मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावरून कधी जलवाहतूक झालीच नाही का ? प्राचीन उल्लेख आढळतात ते शूर्पारक टेकड्या, म्हणजे आताचे नालासोपारा वगैरेचेच.

विकास पंडितजी, छान पोस्ट . 'भाऊच्या धक्क्या'बद्दलची कोकणी माणसाची एकवेळची भावनिक आत्यंतिकता शब्दबद्ध करणं तसं कठीणच !
<< मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावरून कधी जलवाहतूक झालीच नाही का ? >> दिनेशदा, वर उल्लेखिलेल्या हल्लींच्या बोट सर्व्हीसशिवाय [ व फार थोडा वेळ चाललेल्या 'हॉव्हर क्रॅफ्ट'/स्पीडबोट सर्व्हीसशिवाय], माझ्या माहितीनुसार, प्रवासी वाहतुकीबद्दल या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच आहे. पण मालाची जलवाहतूक मात्र अगदीं नियमितपणें ५०-६० वर्ष पूर्वींपर्यंत पश्चिम किनार्‍यावर चालत होती. एन्रॉन प्रकल्पाच्या खालील किनारा, देवबाग-कर्ली इत्यादी ठीकाणं तर जहाजबांधणी व वाहतुकीसाठीं प्रसिद्ध होतीं. म्हणूनच मालवण बंदरानजीक धान्य व इतर मालाचीं गोदामं व व्यापार्‍यांच्या पेढ्या होत्या. धान्य, नारळ, कौलं इत्यादीची आवक-जावक समुद्रमार्गाने होत असे. मुंबई- मालवण अंतर शीडाच्या जहाज/ गलबताने ४-५ दिवसांचं असे असं लहानपणीं मला मालवण बंदरात सांगितलेलं आठवतं.

खुद्द मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर जलवाहतुकीची स्थानिक सेवा सुरू करावी यासाठी गेलीं पंधरा-वीस वर्षं चर्चा चालू आहेत. कांही कच्चे आराखडेही तयार करण्यात आले होते, बोरिवली ते नरिमन पाँईंट मधले ' लँडींग पॉईंटसही ' 'टेंटॅटीव्हली' ठरवण्यात आले होते. हॉव्हरक्रॅफ्ट कीं स्पीडबोट हे पर्यायही तपासले गेले होते. [पूर्वीं 'सिडको'ने घेतलेलं हॉव्हरक्रॅफ्ट प्रायोगिक तत्वावर सुरवातीला वापरण्याचाही विचार झाला होता. पण हॉव्हरक्रॅफ्ट ज्या 'एअर क्यूशन'वर चालतं त्याला एका ठराविक उंचीपुढच्या लाटांमुळे बाधा येते म्हणून भर समुद्रातल्या या सर्व्हीससाठी तो विचार सोडून देण्यात आला].पण वर्षांत फक्त सात- आठ महिनेच चालणार्‍या या सेवेचं आर्थिक गणित पेलवणारं नसावं म्हणून यात प्रगति होत नाहीय. [ माहिती पक्की आहे; कृपया स्त्रोत विचारुं नका].

जिप्सी, अप्रतिम प्रचि !

खुद्द मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर जलवाहतुकीची स्थानिक सेवा सुरू करावी यासाठी गेलीं पंधरा-वीस वर्षं चर्चा चालू आहेत.<<< याचसोबत बेलापूर ते कुलाबा साईडलादेखील बोटवाहतूक चालू होणार होती. परदेशामधून तंत्रज्ञ आणून सर्व प्राथमिक पाहणी वगरे झाली होती. पण पुढे ते सर्वच बारगळलंय.

<< याचसोबत बेलापूर ते कुलाबा साईडलादेखील बोटवाहतूक चालू होणार होती >> मला आठवतं कीं 'सिडको'ने घेतलेलं हॉव्हरक्रॅफ्ट मुख्यतः अशा वाहतुकीसाठीच होतं. याशिवाय, दक्षिण मुंबईतलीं वाहनं 'रो-रो' [ roll in- roll out ] बोटीने बेलापूर/ धरमतर इथं सोडायची [ व परत आणायचीं] यासाठीही बराच काळ चर्चा होत होती. पोर्ट ट्रस्टच्या एका चीफ इंजीनीयरनी पूर्वीं त्याकरतां विशिष्ठ घक्क्याचं छान डिझाईनही तयार केलं होतं, असंही खात्रीलायकपणे कळलं होतं. मग मधेंच पाण्याखालून बोगदा किंवा पूल बांधायची कल्पना आली, चर्चाही खूप झाली व मग सगळंच बारगळलं !!

मागे एकदा वर्तमानपत्रात बातमी आली होती की डोंबिवलीहून श्री. जोंधळे (डोंबिवलीतील जोंधळे हायस्कूल ज्यांनी बांधलं आहे त्या परिवारातील) रोज त्यांच्या स्पीडबोटीतून डोंबिवली ते वरळी प्रवास करतात.

पूर्ण बातमी इथे पाहता येईल.

किंवा इथेही बघता येईल :
http://www.punemirror.in/index.aspx?page=article&sectid=3&contentid=2009...

पहिल्या लिंकमध्ये त्यांचा रूटही छान नकाशा काढून दाखवला आहे. वरळी ते उत्तन पर्यंत समुद्रातून आणि मग उत्तन ते डोंबिवली खाडीतून असा त्यांचा प्रवास असतो.

<< रोज त्यांच्या स्पीडबोटीतून डोंबिवली ते वरळी प्रवास करतात.>> माझ्या संगणकावर ही बातमी 'ओपन' होत नाहीय. पण मी काढीनच ही माहिती . मला प्रचंड कुतूहल आहे एकंदरीतच या विषयाबद्दल.

मामी, मनःपूर्वक आभार.
डोंबिवलीला गेलों तर मुद्दाम श्री. जोंधळेना भेटून माझा सलाम रुजूं करेनच. [ आपण आपल्या नद्या-खाड्यांचा वाहतुकीसाठीं कांहीच उपयोग कां नाही करत, हा कित्येक वर्षं मला भेडसावणाराच प्रश्न आहे. हल्लीं मांडवा/अलिबाग/किहीमच्या बाजूला बर्‍याच उद्योजकानीं बंगले बांधले आहेत व ते आपल्या आलिशान लाँचेसमधून 'गेटवे'वरून तिथं जातात. ]

जिप्सी, छत्रपती शिवाजी टर्मिनस व मुंबई महापालिका प्रचि मस्त.. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये गॉथिक शैलीतली शिल्पे पहाण्यासारखी आहेत. विशेषतः प्राण्यांची शिल्पे.. त्यातला सिंह तर तू दाखवलाच आहेस. मी बहुतेक मुंगुसाचं शिल्पही पाहिलेलं आहे.
.. मध्ये एक शिवाजी टर्मिनस शिल्प निरीक्षणही कुणीतरी अरेंज केलं होतं असं वाटतं! या गॉथिक शैलीतली शिल्पे असलेल्या इमारती दाखवणारं कुणी आहे कां इथे??? .. नाहीतर जिप्सी, तू याची थीम घेऊन फोटोवॉक कर आणि आम्हांला कर समृद्ध.. Happy

जिप्सी, प्रचि अतिशय सुरेख.

आपण आपल्या नद्या-खाड्यांचा वाहतुकीसाठीं कांहीच उपयोग कां नाही करत, हा कित्येक वर्षं मला भेडसावणाराच प्रश्न आहे. हल्लीं मांडवा/अलिबाग/किहीमच्या बाजूला बर्‍याच उद्योजकानीं बंगले बांधले आहेत व ते आपल्या आलिशान लाँचेसमधून 'गेटवे'वरून तिथं जातात.
>>>> गेटवे ते मांडवा/घारापुरी येजा करणार्‍या तीन कंपन्यांच्या बोटी / कॅटॅमरान आहेत - अजंठा , मालदार आणि PNP. गेटवे ते घारापुरी साधारण लाँचने सव्वातास लागतो. तेच अंतर स्पीडबोटीनं केवळ १४-१५ मिनिटांत कापता येतं. बर्‍याच बिझिनेस फॅमिलीज ची अलिबाग आणि आसपास मोठीमोठी फार्महाउसेस आहेत. काहींच्या स्वतःच्या स्पीडबोटस आहेत. ते लोकं दर विकांताला फार्महाउसवर जातात.

या स्पीडबोटस आपल्याला हव्या तर भाड्यानंही मिळतात. लाँचेचही पार्टी वगैरे करण्याकरता तीन-चार तासांकरता भाड्यानं मिळतात.

मरीनड्राईव्हवर मफतलाल बाथच्या शेजारी काही वर्षांपूर्वी H2O उघडलंय. त्यांच्यामुळे आता मुंबईच्या समुद्रात काही वॉटरस्पोर्टस करणं शक्य झालं आहे. नाहीतर इतका मोठा समुद्र किनारा लाभल्यावरही आपण करंटेपणा करून ना त्या किनार्‍याला सुंदर, स्वच्छ ठेवत, ना त्याचा उपयोग करून घेत.

इतर देशांत समुद्रकिनारा ही त्या शहराची शान असते. स्वच्छ पाणी (ज्यात पोहता येईल असं), सुरेख प्रॉमिनेड्स (त्यावरून लोकं चालताहेत, सायकल चालवताहेत, धावताहेत), बागा, स्वच्छ वाळू (मुलं वाळूचे किल्ले बनवताहेत, मंडळी तिथल्या पिकनिक टेबल्सवर पिकनिक करताहेत) आणि स्वच्छतागृहं सगळी सोय असते आणि तिथली मंडळी या सुविधांचा खुप छान उपयोग करतात. मध्यंतरी जुहुचौपाटी बर्‍यापैकी स्वच्छ दिसत होती. म्हणजे वाळू स्वच्छ होती पाणी तसंच खराब. हेमामालिनीनं तिच्या खासदारकीच्या काळात तिथल्या भेळापुरीवाल्यांनाही बर्‍यापैकी शिस्त लावली. त्यांना एक जागा नेमून देऊन तेवढ्याच जागेत विक्री करण्याची अट घातली गेली. बाकीच्या किनार्‍यावर टुरिस्ट पोलिसांची गाडीही सतत फिरायची, सतत कचरा उचलला जात असे. यामुळे ती चौपाटी बर्‍यापैकी स्वच्छ आणि सुरक्षित होती. आता पुन्हा तिथे 'ये रे माझ्या मागल्या' सुरू झालंय असं जाणवतं.

गिरगाव चौपाटी तर गणेश विसर्जनाचं मुंबईतील एक मुख्य ठिकाण. आजकाल ती ही चौपाटी बर्‍यापैकी स्वच्छ असते. पाणी मात्र तसंच - खराब.

<< सुरेख प्रॉमिनेड्स (त्यावरून लोकं चालताहेत, सायकल चालवताहेत, धावताहेत),>> वांद्रे रिक्लेमेशनला अनधिकृत झोपडपट्टीचं ग्रहण लागलं असलं तरी तिथलं प्रॉमिनेड मात्र खरंच छान आहे, निदान अजून तरी !

हे नंतरचे फोटो व माहितीही आवडली. त्या जोडलेल्या बसला पुण्यात जोडबस म्हणायचे Happy

हवा छान असेल तर मध्य रेल्वेच्या डॉकयार्ड रोड स्टेशनवरुन कर्नाळ्याचा सुळका दिसतो.>>> दिनेश, सॅण्डहर्स्ट रोड किंवा हार्बर लाईन म्हणायचे आहे का? डॉकयार्ड रोड हे हार्बर लाईनवर आहे.

जिप्सी, तुझ्या राजाबाई टॉवर च्या फोटो वरून पुलंचे 'राजाबाई टॉवर आणि वसईचा पूल हे एकच चित्र...' आठवले. त्यामुळे तो ही फोटो दिसतो का ते शोधत होतो Happy

१९९९ च्या वर्ल्ड कप च्या वेळेस रेल्वे स्टेशन्स वरून स्कोर सांगत ते लक्षात आहे का? पुढच्या वर्ल्ड कप्स च्या वेळेस मी मुंबईत नव्हतो त्यामुळे तेव्हाचे माहीत नाही.

Pages