ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"
दर वर्षी प्रमाणे परवा, १४ मे रोजी आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज होते. त्यासाठी केलेला हा केक. केक जजेस आणि ऑफिसातील लोकांना अतिशय आवडला. तुम्हाला ही आवडेल अशी आशा करते
~~~~~~~~~~~~~~~~
बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम असते. इथे नव्या बनणार्या सबर्ब्ज मधे वूड फायर्ड हिटर्स वापरण्यावर बंदी आणली आहे. मुख्य कारण धूरामुळे होणारे प्रदूषण. हिच थीम घेऊन मी केक बनवला होता.
१. सर्वप्रथम दोन चॉकलेट केक्स बनवले.
२. केक्स बेक होत असताना पुठ्ठ्याचे छप्पर बनवुन घेतले. आणि पुठ्ठ्याचीच चिमणी बनवली.
३. ओट स्लयासेस वापरून भिंती बनवल्या आणि ट्रान्स्परंसी वापरून खिडक्या.
४. पुठ्ठ्याच्या छपरावर आणि चिमणीवर अॅल्युमिनियम फॉइल लावुन घेतली. छतावरच्या टाइल्स म्हणून 'आफ्टर डिनर मिंट्स'च्या चपट्या वड्या मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या. चिमणीला मेल्टेड चॉकलेट लावुन त्यावर ओट स्लयसेसचा चुरा चिकटवला. चिमणीत कापुस भरला **
५. बॅटरी ऑपरेटेड टी लाईट कँडलवर चॉकलेट बिस्किट स्टिक्स (लाकडसारखे दिसावे म्हणून) मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या.
ट्रान्स्परंट खिडक्यांमधुन टी कँडलची फुरफुरणारी (फ्लिकर होणारी) ज्योत अगदी वुडफायर लावल्यासारखी दिसत होती
६. घर साईटवर ठेवले आणि आजुबाजुचे लँडस्केलिंग इ इ , फायनल केले. गाडी पार्क करायची जागा, पाँड, छत्री वगैरेंची जागा निश्चित केली.
७. अगदी शेवटी ऑफिसमधे गेल्यावर टी कँडल ऑन केली, भिंतींवर छत ठेवले
-----
** मी खरतर अॅक्च्यल धूर येण्याची सोय केली होती. चिमणीच्या आत एक बाटलीचे छोटे झाकण अॅल्यूमिनियम फॉइल मधे गुंडाळून बसवले होते. त्यात उदबत्तीचा तुकडा लावायची सोय केली होती. अगदी थोडासाच धूर तयार होत होता. पण ही कल्पना फायनल करायच्याआधी सोमवारी बेकऑफ च्या ऑरगनायजर ला मी माझी कल्पना दाखवून परवानगी मिळेल का म्हणून विचारले. परंतू बेक ऑफ बंदिस्त हॉल मधे होणार असल्यामुळे आणि तिथे स्मोक डिटेक्टर्स असल्यामुळे धूर जरी नगण्य असला तरीही उगाच काहि प्रॉब्लेम्स नकोत म्हणून माझी कल्पना फेटाळली म्हणून मला धूर म्हणून कापूस ठेवायला लागला...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा २५-३० एक एंट्रीज होत्या. $१२५० जमा झाले.
यंदाची चॅरिटी होती 'पेगॅसस'. अपंग मुलांसाठी हॉर्स रायडिंग शिकवणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे कार्य पूर्णतः डोनेशन्स वर चालते. इथे काम करणारे देखिल सगळे वॉलेंटिअर्स आहेत. मध्यंतरी पुरेशी डोनेशन्स न मिळाल्यामुळे संस्था बंद पडणार होती. परंतू ही बातमी कळताच कित्येक लोकांनी, संस्थानी, ऑफिसेस नी लगेच मदतीचा हात पुढे केला आणि पेगॅसस ला बंद पडण्यापासुन वाचवले
पेगॅसस बद्दल अधिक माहिती इथे मिळेल http://www.pegasusact.com.au/
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभिनंदन लाजो कसला मस्त आहे
अभिनंदन लाजो
कसला मस्त आहे केक! सहीच!
सहीच
सहीच
सुपरलाईक
सुपरलाईक
सुंदर!
सुंदर!
अ...........प्र..............
अ...........प्र..............ती.......................म!
मस्त्च
मस्त्च
अप्रतिम.
अप्रतिम.
जबरदस्त अभिनंदन मामी>>>>>>>
जबरदस्त अभिनंदन
मामी>>>>>>> +१
वॉव. फायरप्लेस आणि तिचा धूर-
वॉव. फायरप्लेस आणि तिचा धूर- फारच कल्पक!! घराचे एकूण लॅन्डस्केपिंगही भारी.. पॉन्ड, लिझर एरिया वगैरे. नो वन्डर तुझा पहिला नंबर आला. हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन लाजो..... केक निव्वळ
अभिनंदन लाजो.....
केक निव्वळ अप्रतिम...........
लाजो जबरदस्त कल्पक आहेस तू.
लाजो जबरदस्त कल्पक आहेस तू. हॅट्स ऑफ्फ!
तुला नमस्कार करुन हात सुद्धा
तुला नमस्कार करुन हात सुद्धा दुखायला लागला बये भन्नाट
अतिशय सुंदर. आणि त्या
अतिशय सुंदर. आणि त्या टेबलावर इतरांच्या साध्या केक्सच्या गर्दीत तुझा केक अगदी उठुन दिसतोय.
फार भारी केक, अभिनंदन. __/\__
फार भारी केक, अभिनंदन. __/\__
अप्रतिम ...लाजो तुमच्या
अप्रतिम ...लाजो तुमच्या कल्पनाशक्ती त्रिवार मुजरा.....
जबरदस्त बनवलंय
जबरदस्त बनवलंय
सही$$$$ ___________/\________
सही$$$$
___________/\_____________ आता तुला गुरु मानुन ई-बेकिंग क्लास करणार आहे तुझ्याकडे.
आता तुला गुरु मानुन ई-बेकिंग
आता तुला गुरु मानुन ई-बेकिंग क्लास करणार आहे तुझ्याकडे. >>>> वर्षे, लाजोचा पुतळा समोर ठेऊन केक बेकिंगला सुरवात कर. मग गुरुदक्षिणा म्हणून तिला एक आवन घेऊन दे.
लाजवाब!!!! तुझ्या कल्पकतेला
लाजवाब!!!! तुझ्या कल्पकतेला सलाम!!!!
कसला जबरी दिसतोय केक... ग्रेट!!
गुरुदक्षिणा >> मी गुरुला
गुरुदक्षिणा >> मी गुरुला दक्षिणाच देउन टाकेल दक्षे चालेल ना
ग्रेट! मामी+१
ग्रेट! मामी+१
mastach......
mastach......
वॉव लाजो. माझा वासलेला 'आ'
वॉव लाजो.
माझा वासलेला 'आ' तसाच आहे.
भारीच
भारीच
खुप खुप धन्यवाद मंडळी ४-५
खुप खुप धन्यवाद मंडळी
४-५ दिवस कामात अडकल्याने इथे येऊन आभार मानु शकले नाही त्याबद्दल सॉरी.........
@ मामी कित्ती ते आपल्या बाबीचं कौतुक
इथे केक करणारा प्रत्येक जण चॅरिटीसाठी जास्त जास्त पैसे गोळा व्हावेत या हेतुने केक बनवतो. ज्याला जसा वेळ मिळेल, उत्साह असेल तसे केक/बिस्किटे बनवतात. मी एका केक साठी ७-८ तास वेळ दिला तर काहिंनी २-३ प्रकारचे वेगवेगळे केक्स बनवुन आणले होते. मग ते साधे कॅरट केक का असेनात. प्रत्येक केक चे ऑक्शन होते आणि साधा कॅरेट केक देखिल कधीकधी बीडींग वाढत वाढत $३०-४० ला विकला जातो माझा उत्साह जरा अतिच असल्याने मी डेकोरेशन वगैरे करते
@ साती, धन्स
@ सशल, अशा प्रेझेन्टेशन्स् मध्ये सगळं एडिबल असणं गरजेचं नसतं का?<<< अशी रिक्वायरर्मेंट काहि नव्हती तरी ९०-९५% केक एडिबल असणे गृहित धरले जाते. माझ्या केक मधे कार, बॅटरी ऑपरेटेड लाईट, खिडक्या आणि पुठ्ट्याचे छत व छत्री सोडुन बाकी सर्व खाण्यायोग्य पदार्थ आहेत. चॉकलेट्स वगैरे चिकटवण्याआधी अॅल्युमिनिअम फॉइइल लावुन घेतली आहे त्यामुळे ती चॉकलेट्स देखिल खातायेण्या योग्य होती.
ज्या टीम ने माझा केक विकत घेतला त्यातल्या बर्याच टीममेम्बर्सनी आवर्जुन मला 'केक आवडला आणि भरपूर व्हरायटी खायला मिळाली' असे येऊन सांगितले
@ वर्षा ईगुरू
परत एकदा सर्वांचे आभार
जबरीच, लाजो अभिनंदन ! हॅट्स
जबरीच, लाजो अभिनंदन !
हॅट्स ऑफ तुला, तुझ्या उत्साहाला आणी कल्पकतेला
क.क.कु. ( कमालिच्या
क.क.कु. ( कमालिच्या कल्पनाशक्तिला कुर्निसात.)
Pages