ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१३ -"बेस्ट इन शो"

Submitted by लाजो on 16 May, 2013 - 09:17

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"

दर वर्षी प्रमाणे परवा, १४ मे रोजी आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज होते. त्यासाठी केलेला हा केक. केक जजेस आणि ऑफिसातील लोकांना अतिशय आवडला. तुम्हाला ही आवडेल अशी आशा करते Happy

~~~~~~~~~~~~~~~~

बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम असते. इथे नव्या बनणार्‍या सबर्ब्ज मधे वूड फायर्ड हिटर्स वापरण्यावर बंदी आणली आहे. मुख्य कारण धूरामुळे होणारे प्रदूषण. हिच थीम घेऊन मी केक बनवला होता.

१. सर्वप्रथम दोन चॉकलेट केक्स बनवले.

२. केक्स बेक होत असताना पुठ्ठ्याचे छप्पर बनवुन घेतले. आणि पुठ्ठ्याचीच चिमणी बनवली.

३. ओट स्लयासेस वापरून भिंती बनवल्या आणि ट्रान्स्परंसी वापरून खिडक्या.

४. पुठ्ठ्याच्या छपरावर आणि चिमणीवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावुन घेतली. छतावरच्या टाइल्स म्हणून 'आफ्टर डिनर मिंट्स'च्या चपट्या वड्या मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या. चिमणीला मेल्टेड चॉकलेट लावुन त्यावर ओट स्लयसेसचा चुरा चिकटवला. चिमणीत कापुस भरला **

५. बॅटरी ऑपरेटेड टी लाईट कँडलवर चॉकलेट बिस्किट स्टिक्स (लाकडसारखे दिसावे म्हणून) मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या.

ट्रान्स्परंट खिडक्यांमधुन टी कँडलची फुरफुरणारी (फ्लिकर होणारी) ज्योत अगदी वुडफायर लावल्यासारखी दिसत होती Happy

६. घर साईटवर ठेवले आणि आजुबाजुचे लँडस्केलिंग इ इ , फायनल केले. गाडी पार्क करायची जागा, पाँड, छत्री वगैरेंची जागा निश्चित केली.

७. अगदी शेवटी ऑफिसमधे गेल्यावर टी कँडल ऑन केली, भिंतींवर छत ठेवले Happy

-----

** मी खरतर अ‍ॅक्च्यल धूर येण्याची सोय केली होती. चिमणीच्या आत एक बाटलीचे छोटे झाकण अ‍ॅल्यूमिनियम फॉइल मधे गुंडाळून बसवले होते. त्यात उदबत्तीचा तुकडा लावायची सोय केली होती. अगदी थोडासाच धूर तयार होत होता. पण ही कल्पना फायनल करायच्याआधी सोमवारी बेकऑफ च्या ऑरगनायजर ला मी माझी कल्पना दाखवून परवानगी मिळेल का म्हणून विचारले. परंतू बेक ऑफ बंदिस्त हॉल मधे होणार असल्यामुळे आणि तिथे स्मोक डिटेक्टर्स असल्यामुळे धूर जरी नगण्य असला तरीही उगाच काहि प्रॉब्लेम्स नकोत म्हणून माझी कल्पना फेटाळली Sad म्हणून मला धूर म्हणून कापूस ठेवायला लागला...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा २५-३० एक एंट्रीज होत्या. $१२५० जमा झाले.

यंदाची चॅरिटी होती 'पेगॅसस'. अपंग मुलांसाठी हॉर्स रायडिंग शिकवणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे कार्य पूर्णतः डोनेशन्स वर चालते. इथे काम करणारे देखिल सगळे वॉलेंटिअर्स आहेत. मध्यंतरी पुरेशी डोनेशन्स न मिळाल्यामुळे संस्था बंद पडणार होती. परंतू ही बातमी कळताच कित्येक लोकांनी, संस्थानी, ऑफिसेस नी लगेच मदतीचा हात पुढे केला आणि पेगॅसस ला बंद पडण्यापासुन वाचवले Happy

पेगॅसस बद्दल अधिक माहिती इथे मिळेल http://www.pegasusact.com.au/

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१२ -"बेस्ट इन शो"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर झालंय. लँड स्केपिंगपण सुरेख. कापसाच्या धुराची कल्पना फार आवडली.

लाजो, हार्दिक अभिनंदन आणि पुन्हा एकवार तुझ्या उत्साहाला आणि कल्पनाशक्तीला दंडवत!

जरा 'आपला तो बाब्या..' टाईप वाटेल पण बाकीचे केक तुझ्या केकपुढे अगदीच पच्यॅक दिसतायत हं. Happy

लाजो, हार्दिक अभिनंदन! मस्त कल्पना...... विशेषतः लॉन्, मार्शमॅलो वापरुन केलेली फुले-झाडे, वुडफायर्,उदबत्ती वापरुन धुर करण्याची कल्पना तर अफलातुन होती...ती वापरता आली असती तर..
मला खुप खुप आवडला केक.
मामी म्हणते ते अगदी १००% बरोबर आहे.......जरा 'आपला तो बाब्या..' टाईप वाटेल पण बाकीचे केक तुझ्या केकपुढे अगदीच पच्यॅक दिसतायत हं

लाजो........... तू म्हणजे ना....... कमाल आहेस !!
प्रचंड आवडेश Happy
खूप खूप अभिनंदन सखी Happy

ला>>जो... आता तुला नमस्कार करून करून जुनं झालंय जेश्चर..
तुझ्या कल्पना इतक्या अफाटेत कि तारीफ करायलाही सुचत नाहीयेत उपयुक्त शब्द..
मामी + १००० Happy

लाजो, हार्दिक अभिनंदन.....मस्त केक....खुप क्रिएटिव आहेस गं तु !!

लाजो, खूप आवडला केक.
हॅट्स ऑफ तुला!! किती तो उत्साह आणि क्रिएटिविटी आणि परत स्टेप बाय स्टेप फोटो, सगळं वर्णन!!

Pages

Back to top