निसर्गाच्या गप्पा धाग्यावर विषारी वनस्पतींची चर्चा चालु होती. या विषारी वनस्पतींची ओळख व्हावी म्हणुन औषधी वनस्पती सारखाच हा "विषारी वनस्पती"चा हा धागा.
एक किस्सा:
एकदा गृपमध्ये ट्रेकिंगविषयी चर्चा चालू होती. तेंव्हा एकाने किस्सा सांगितला. एक गृप ट्रेकिंगला गेला असता रात्रीचे जेवण बनवायला घेतले. त्या गृपकडे चमचा नसल्याने एकाने झाडाची फांदी काढुन त्याने ढवळायला घेतले. रात्री जेवल्यानंतर सगळे झोपले. सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते. रामेठी-कामेठी असं काहीस त्या झाडाच नाव होतं. एकाचा उपयोग दात निखळुन पडण्यासाठी तर दुसर्याचा उपयोग दात मजबूत करण्यासाठी होतो.
वरील माहितीच्या आधारे मायबोलीकर शांकलीने केलेली विपु:
जिप्सी, मी आत्ताच एका वैद्यांना (वैद्य कमलाकर देसले) यांना रामेठा/दातपाडी बाबत विचारलं. ते म्हणाले की
"दातपाडीमधे जो विषारी गुणधर्म सांगितला आहे तो असा की त्याने अंगावर सूज येते. गावाकडे गुरं जेव्हा बाजारात विकायला नेतात, तेव्हा रामेठ्याचा पाला गुरांच्या अंगाला चोळतात. त्यामुळे गुरं गुटगुटीत दिसतात." मग मी त्यांना त्या घटनेबद्दल विचारलं, त्यावर ते म्हणाले की "हिरड्या सुजल्या असाव्यात. क्वचित वेदना सुद्धा झाल्या असाव्यात. पण दात पडले असतील हे संभवत नाही. तसं कुठं पुस्तकांमधे उल्लेख नाही. बरेच जण वनस्पतींमधल्या विषारी गुणधर्माबद्दल अभ्यास करतात. त्यांच्याही पेपर्समधे दात पडल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही घटना म्हणजे बहुधा दंतकथा असावी."
मात्र एक गोष्ट जी मला माहिती आहे ती म्हणजे, अनेक वनस्पती ह्या बर्यापैकी विषारी असतात. पण तो विषारीपणा हा त्यांच्या स्व-संरक्षणाचा भाग असतो. बहुतेक सर्व वनस्पती औषधी असू शकतात. पण ह्या गोष्टींची नीट खातरजमा, माहिती आणि अभ्यास करूनच त्यांना हाताळायला पाहिजे.
रामेठा/दातपाडीचा फोटो
(फोटो साभार: शुभदा मॅडम)
रानतंबाखू
रानतंबाखू हाताला किंवा डोळ्याला लागली तर डोळ्यांची प्रचंड आग होते व तात्पुरते (कायमचे नव्हे) अंधत्व येऊ शकते.
कावळी - Cryptolepis buchanani या विषारी वनस्पतींवरचा शशांक पुरंदरे यांचा लेख.
अरे पुर्ण करणार आहेस ना हे?
अरे पुर्ण करणार आहेस ना हे? की एकच वनस्पती दाखवणार?
अजुन माहिती हेडरमध्ये अॅड
अजुन माहिती हेडरमध्ये अॅड केली.
साधना ये तो शुरुवात है.. देख
साधना ये तो शुरुवात है.. देख आगे आगे होता है क्या..
थँक गॉड ती दातपाडी दंतकथाच निघाली.. होप सो....
साधना, प्रतिसादात देऊया या
साधना, प्रतिसादात देऊया या वनस्पतींची माहिती.
ज्यांना ज्यांना अधिक माहिती असेल ते इथे भर टाकतील.
जिप्स्या तुझ्याजवळचं संकलन
जिप्स्या तुझ्याजवळचं संकलन एकत्रच टाक ना.. मग पुढे ज्या कुणाजवळ असेल नवीन वनस्पतींचे फोटो/माहिती इथे अॅड करत जातील
वर्षूदी, डन!!!!
वर्षूदी, डन!!!!
अफुचे झाड विषारी आहे का?
अफुचे झाड विषारी आहे का?
अगदी उपयुक्त धागा जिप्सी!
अगदी उपयुक्त धागा जिप्सी!
तशी कण्हेर, रुई अशी चिक निघणारी झाडं विषारी मानली जातात.
हे एक नेहमी घरी/ बागेत आढळणारं शोभेचं झाड अतिशय विषारी आहे. मुलांना यापासुन फार जपावं लागतं.
dieffenbachia - हे वरती
dieffenbachia - हे वरती "मी_आर्या" ने दिलेल्या वनस्पतीचे नाव.
एकदा गृपमध्ये ट्रेकिंगविषयी
एकदा गृपमध्ये ट्रेकिंगविषयी चर्चा चालू होती. तेंव्हा एकाने किस्सा सांगितला. एक गृप ट्रेकिंगला गेला असता रात्रीचे जेवण बनवायला घेतले. त्या गृपकडे चमचा नसल्याने एकाने झाडाची फांदी काढुन त्याने ढवळायला घेतले. रात्री जेवल्यानंतर सगळे झोपले. सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते. रामेठी-कामेठी असं काहीस त्या झाडाच नाव होतं. एकाचा उपयोग दात निखळुन पडण्यासाठी तर दुसर्याचा उपयोग दात मजबूत करण्यासाठी होतो.>>>
हा किस्सा प्र. के. घाणेकरांच्या कुठल्यातरी पुस्तकात वाचल्यासारखा वाटतोय..
रामेठा/ दातपाडीचा अनुभव :
चकदेव पर्वत ट्रेक करताना माझ्या छोट्या भावाने रामेठ्याची काठी आधारासाठी तोडुन घेतली, आणि हात न धुतल्याने मधेमधे त्याच हाताने घाम पुसला, संध्याकाळपर्यंत मडक्यासारखा गोल गरगरीत चेहरा झाला होता.
तीन दिवस लागले सुज ओसरायला.
मस्त आहे हा धागा. धन्यवाद,
मस्त आहे हा धागा. धन्यवाद, जिप्सी.
ते एक अळूच्या पानांसारखं दिसणारं पण शोभेचं फताड्या आणि भल्यामोठ्या पानांचं झाड असतं ते ही महाप्रचंड खाजरं असतं. याचा अनुभव मी घेतलेला आहे.
<<ते एक अळूच्या पानांसारखं
<<ते एक अळूच्या पानांसारखं दिसणारं पण शोभेचं फताड्या आणि भल्यामोठ्या पानांचं झाड<<
<<बागेत आढळणारं शोभेचं झाड अतिशय विषारी आ<<<<
अरारारा....शोभे! तुझ्या झाडांचा उद्धार होतोय बघ गं इकडे!
(No subject)
(No subject)
व्वा! झाला का हा धागा काढून?
व्वा! झाला का हा धागा काढून?
आर्ये,
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी?
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी? अगं नक्की काय अपाय होतो ते ही लिही की.
>>>त्यांच्याही पेपर्समधे दात
>>>त्यांच्याही पेपर्समधे दात पडल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही घटना म्हणजे बहुधा दंतकथा असावी.
दात पडले नसतील तर कशी 'दंत'कथा?
दात पडले....म्हणूनच तिला ’दंत’कथा म्हणायला हवंय!
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी?
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी? अरेरे अगं नक्की काय अपाय होतो ते ही लिही की.>>>>>>>तुझ्याकडे आहे का?
दात पडले....म्हणूनच तिला ’दंत’कथा म्हणायला हवंय!>>>>>>>>>काका
आर्ये..ते साधंभोळं झाड मला
आर्ये..ते साधंभोळं झाड मला इतकं आवडायचं.. लागतं पटकन, वाढण्याकरता खाण्यापिण्याचे नखरे नाहीत..
पर्रफेक्ट फॉर माझ्यासारखे बिन हिरव्या बोटांच्या लोकांकरता..
हे विषारी?? वरून मुलांकरता डेंजरस???
दक्स + १.. नक्की सांग ना काय अपाय होतो यापासून ..खरंच माहीत नाहीये..
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी?
आर्ये तु टाकलेलं झाड विषारी? अगं नक्की काय अपाय होतो ते ही लिही की.
डायफनबेकीयाचे पान तोडले की तुटलेल्या जागेतुन पांढरा चिक निघतो . तो चिक विषारी असतो. मुलांना झाडापासुन जपावे कारण मुलांना सवय असते उगीचच पाने तोडायची.
दातपाडी>>> हिरड्या प्रचंड
दातपाडी>>> हिरड्या प्रचंड सुजतात म्हणे...
इथे पाहीलत तर अनेक विषारी
इथे पाहीलत तर अनेक विषारी वनस्पती विषयी सविस्तर माहीती मिळेल.
सध्या माझ्याकडे फोटो नाही,
सध्या माझ्याकडे फोटो नाही, जूना लेख सापडत नाही. पण चित्रक पण तसा धोकादायकच आहे.
आणखी एक झाड असते त्याला सँड बॉक्स ट्री किंवा हुरा म्हणतात. हे झाड परदेशी आहे पण याच नावाचे आपल्याकडे एक झाड असते, तेही विषारीच आहे.
याला मेदूवड्यासारखी किंवा देवळाच्या कळसावर आमलक असतो, तशी फळे येतात. ( हेच ते सँड बॉक्स ) छोटी पण आकर्षक, लाल पिवळी फुले येतात. परदेशी झाडे आपल्याकडे दुर्मिळ असली तरी आहेतच.
समुद्राच्या काठी तिवरांच्या मधे, ब्लाईंडींग ट्री म्हणून एक झाड असते. ( माझ्या रंगीबेरंगीवर होता फोटो). त्याचा चीकही डोळ्यांसाठी घातक असतो.
खाजखुजली प्रमाणेच, कहांडळाच्या फळाची कुसेही टोचतात. पण दोन्ही विषारी नाहीत. उलट औषधीच आहेत.
अर्थात त्यासाठी जाणकारच हवा.
पिवळ्या कण्हेरीचेही औषधी उपयोग आहेत.
मला माहिती मिळाली कि लिहितो.
मामी, त्या फताड्या अळूची
मामी, त्या फताड्या अळूची मूळे खातात. पण त्याची खाज घालवायचे एक तंत्र आहे.
बांबूचे कोवळे कोंबही विषारीच असतात, त्यातील विखार घालवायचा पण उपाय असतो.
जंगलातले किंवा इतरत्रही उगवलेले अनेक मश्रुम्स विषारी असू शकतात.
ज्यांना शेवळाची भाजी माहीत आहे, ते तसे दिसणारे कोंब ( पहिल्या पावसानंतर ) उपटू बघतात. तेही विषारी असू शकतात. कुठलीही रानभाजी, अगदी तशीच दिसत असली तरी जाणकार सोबत असल्याशिवाय खुडू नये.
या भाज्या बाजारात विकायला आणणार्या स्त्रीयाच, त्यातल्या जाणकार असतात. त्या शक्यतो त्यांच्याकडूनच विकत घ्याव्यात. कृती माहीत नसेल तर त्यांनाच विचारावी.
रुईचा चिकही घातक असतो,
रुईचा चिकही घातक असतो, डोळ्यात गेल्यास जळजळ होऊ शकते असे ऐकलेय. हे खरे नसेल तर सांगा, उडवते इथुन.
आर्ये..ते साधंभोळं झाड मला
आर्ये..ते साधंभोळं झाड मला इतकं आवडायचं.. लागतं पटकन, वाढण्याकरता खाण्यापिण्याचे नखरे नाहीत..
पर्रफेक्ट फॉर माझ्यासारखे बिन हिरव्या बोटांच्या लोकांकरता..
हे विषारी?? वरून मुलांकरता डेंजरस???
दक्स + १.. नक्की सांग ना काय अपाय होतो यापासून ..खरंच माहीत नाहीये.. >>>> वर्षू नील
या झाडाचा चीक अंगावर लागल्यास त्वचेला खाज येऊन फोड येतात आणी जर चुकुन तोंडात गेला तर
पुर्ण तोंड भाजल्यासारखे होते. ( लहानपणीच्या अनुभवाचे बोल)
दिनेशदा, हाच कांय चित्रक..
दिनेशदा,
हाच कांय चित्रक.. ??
निसर्ग गप्पा चाच विशेषांक दिसतोय!.. असेच 'विशेषांक' येऊ देत.
मस्त सुरुवात रे जिप्सी!
सध्या मेफ्लॉवर (फुट्बॉल लिली)
सध्या मेफ्लॉवर (फुट्बॉल लिली) चा सिझन आहे. हे पण विषारी आहे असं गुगल्यावर कळलं.
ईन मीन तीन थांकु थांकु.. सर्व
ईन मीन तीन थांकु थांकु.. सर्व शंका दूर झाल्या...
http://www.poison-ivy.org/
http://www.poison-ivy.org/
Pages