निसर्गाच्या गप्पा धाग्यावर विषारी वनस्पतींची चर्चा चालु होती. या विषारी वनस्पतींची ओळख व्हावी म्हणुन औषधी वनस्पती सारखाच हा "विषारी वनस्पती"चा हा धागा.
एक किस्सा:
एकदा गृपमध्ये ट्रेकिंगविषयी चर्चा चालू होती. तेंव्हा एकाने किस्सा सांगितला. एक गृप ट्रेकिंगला गेला असता रात्रीचे जेवण बनवायला घेतले. त्या गृपकडे चमचा नसल्याने एकाने झाडाची फांदी काढुन त्याने ढवळायला घेतले. रात्री जेवल्यानंतर सगळे झोपले. सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते. रामेठी-कामेठी असं काहीस त्या झाडाच नाव होतं. एकाचा उपयोग दात निखळुन पडण्यासाठी तर दुसर्याचा उपयोग दात मजबूत करण्यासाठी होतो.
वरील माहितीच्या आधारे मायबोलीकर शांकलीने केलेली विपु:
जिप्सी, मी आत्ताच एका वैद्यांना (वैद्य कमलाकर देसले) यांना रामेठा/दातपाडी बाबत विचारलं. ते म्हणाले की
"दातपाडीमधे जो विषारी गुणधर्म सांगितला आहे तो असा की त्याने अंगावर सूज येते. गावाकडे गुरं जेव्हा बाजारात विकायला नेतात, तेव्हा रामेठ्याचा पाला गुरांच्या अंगाला चोळतात. त्यामुळे गुरं गुटगुटीत दिसतात." मग मी त्यांना त्या घटनेबद्दल विचारलं, त्यावर ते म्हणाले की "हिरड्या सुजल्या असाव्यात. क्वचित वेदना सुद्धा झाल्या असाव्यात. पण दात पडले असतील हे संभवत नाही. तसं कुठं पुस्तकांमधे उल्लेख नाही. बरेच जण वनस्पतींमधल्या विषारी गुणधर्माबद्दल अभ्यास करतात. त्यांच्याही पेपर्समधे दात पडल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही घटना म्हणजे बहुधा दंतकथा असावी."
मात्र एक गोष्ट जी मला माहिती आहे ती म्हणजे, अनेक वनस्पती ह्या बर्यापैकी विषारी असतात. पण तो विषारीपणा हा त्यांच्या स्व-संरक्षणाचा भाग असतो. बहुतेक सर्व वनस्पती औषधी असू शकतात. पण ह्या गोष्टींची नीट खातरजमा, माहिती आणि अभ्यास करूनच त्यांना हाताळायला पाहिजे.
रामेठा/दातपाडीचा फोटो
(फोटो साभार: शुभदा मॅडम)
रानतंबाखू
रानतंबाखू हाताला किंवा डोळ्याला लागली तर डोळ्यांची प्रचंड आग होते व तात्पुरते (कायमचे नव्हे) अंधत्व येऊ शकते.
कावळी - Cryptolepis buchanani या विषारी वनस्पतींवरचा शशांक पुरंदरे यांचा लेख.
भुरंबी म्हणजेच भांबुर्डा का?
भुरंबी म्हणजेच भांबुर्डा का? तो औषधी पण असतो. जखमेवर ह्या पाल्याचा रसही लावतात.
डॉ. राणी बंग यांच्या गोईण ह्या पुस्तकात ऐनाची (Terminalia alata) फळे विषारी असतात असे आदीवासी बाईने सांगीतले आहे. त्यात मजेशीर दंतकथा आहे.
सीतेला तिची सासू वनवास करायची, काही खायला द्यायची नाही. एकदा भुक लागली म्हणून सीतामाई जंगलातून येनाची फळे आणून खात होती. ते पाहून रागाने तिच्या सासूने फळाना लाथ मारली. त्यामुळे ते फळ विषारी झाले व तेंव्हापासून ते कोणीच खात नाही पाखरेदेखील.
ऐनाची पालवी.
हे खर आहे की पाखरे ही फळ खात नाहीत. कारण पालवी येईपर्यंतपण झाडांवर सुकलेली फळे असतात
.
ऐनाची फळे.
म्हणजे जागूने पोपटी
म्हणजे जागूने पोपटी करण्यासाठी जो पाला वापरला होता तोच असणार. >>> तो भांबुर्डा वेगळा.
भुरंबी म्हणजेच भांबुर्डा का? >> http://www.maayboli.com/node/21397 या धाग्यावरचा ५ वा प्रचि भांबुर्डा दिनेशदा जो सांगताहेत पण प्रचि ४ भुरंबी वाटतोय पण यालाही भांबुर्डा म्हणतात का माहीत नाही.
आजच काही कामा निम्मीत्त
आजच काही कामा निम्मीत्त लेकाच्या शाळेत गेलो होते त्यांच्या बागेत चित्रक फुललेला पाहुन भिती वाटली .
नितीन, खरं तर मुलांनाच हि
नितीन, खरं तर मुलांनाच हि माहिती हवी. खेळताना सहज कुतुहलाने झाडे हाताळतात ती.
एस आर डी, बटाट्याचा हिरवा भाग पण विषारीच असतो. तसाच रताळ्याचा पालाही. पण रताळ्याचा पाला तव्यावर गरम करुन त्याची भाजी करतात. ( असे केल्याने विखार कमी होतो. ) इथे अंगोलात सर्रास तो पाला खातात.
जागू, हा वर जांभळट फुलाचा फोटो टाकला आहेस तो पाला पोपटीसाठी वापरतात का ? मग मी वेगळा पाला म्हणत होतो. बहुतेक नितीन पण तोच म्हणतोय ( माझ्या आजोळचा आहे तो ) मी म्हणतोय त्या पाल्याला,
न चुरडताही औषधासारखा वास येतो. पानांचा आकार साधारण लांबट फुग्यासारखा आणि पानावर बारीक लव असते.
मी म्हणतोय त्या पाल्याला, न
मी म्हणतोय त्या पाल्याला,
न चुरडताही औषधासारखा वास येतो. पानांचा आकार साधारण लांबट फुग्यासारखा आणि पानावर बारीक लव असते.>>> दा त्या धाग्यात प्रचि ५ वर तोच मुळ्याच्या पानांसारखा दिसणारा भांबुर्डा.
कच्च्या करांद्यातही सायनाईड ( जहाल विष) असते असे वाचले आहे.
क्रुपया अधिक माहीती द्या.
प्रचि.(मा.बो.पु.प्र.)
दिनेशदा तोही भांबुर्डाच.
दिनेशदा तोही भांबुर्डाच. आम्ही दोन्ही पोपटीकरता वापरतो.
नितीन आम्ही हे करांदे खातो पण उकडून.
ह्या फोटोत दोन्ही भांबुर्डे आहेत. फुग्याच्या आकाराच्या आणि कातरी पानांचाही.
लहाणपणी एक म्हैस रानातला
लहाणपणी एक म्हैस रानातला कोवळा जोंधळ्याच रोप खाल्ल्याने तडफडुन मेलेली पाहिली आहे.
त्याला किरुळ का कायतरी म्हणत होते मोठे लोकं.
ऐन विषारी असतो हे ऐकून जाम
ऐन विषारी असतो हे ऐकून जाम आश्चर्य वाटले. पण लॉजिक भारी आहे. पक्षी खात नाहीत हे...
लहाणपणी एक म्हैस रानातला
लहाणपणी एक म्हैस रानातला कोवळा जोंधळ्याच रोप खाल्ल्याने तडफडुन मेलेली पाहिली आहे. <<< ते जोंधळ्याचं रोप नक्कीच नसेल. जोंधळ्याच्या कोवळ्या किंवा जून रोपांनी गुरांना काही अपाय होत नाही. (त्याच्यावर एखादा भयानक रोग बसला असेल तर गोष्ट वेगळी.)
फुग्याच्या आकाराच्या आणि
फुग्याच्या आकाराच्या आणि कातरी पानांचाही. <<< जागू, ती फुग्याच्या आकाराची पाने फार ओळखीची वाटतायत. पण त्यांचा (किंवा तशा दिसणार्या इतर) वापर कुठे होतो हे आठवत नाही.
रुईचा फुलोरा मात्र दिसायला
रुईचा फुलोरा मात्र दिसायला खुप सुंदर असतो. काय ते रंग, काय त्या महिरपी !
व्वा कसलं सुंदर दिसतय ते
व्वा कसलं सुंदर दिसतय ते रुईचं फुल!
आम्ही त्या मधल्या पाच पाकळ्यांना राजाचा महाल म्हणायचो. एकेक करुन त्या काढुन टाकल्या आणि वरची टोपी काढली की आतमधे दोघं राजाराणी दिसतात.
लहानपणी(आमच्या), मोठी माणसे
लहानपणी(आमच्या), मोठी माणसे आम्हाला याला हात लावू देत नसत. (या झाडाला स्पर्श केला, तर मुलीचे लग्न होत नाही असा समज होता.)
आम्हाला पण मनाई होती. लहानपणी
आम्हाला पण मनाई होती.
लहानपणी एरंडाची बी मी खाल्ली होती. खाताना छान लागली मग उलट्या सुरु झाल्या. तेव्हापासून त्या झाडाजवळ जायलाही मनाई होती.
दिनेशदा काय सुंदर आलेत
दिनेशदा काय सुंदर आलेत रुईच्या फुलाचे फोटो. मस्त
आज वेळ काढून हा धागा वाचला.
आज वेळ काढून हा धागा वाचला. छान माहीती.
लहानपणी(आमच्या), मोठी माणसे आम्हाला याला हात लावू देत नसत. (या झाडाला स्पर्श केला, तर मुलीचे लग्न होत नाही असा समज होता.) >>>>>>>>>>> मध्यंतरी एका लग्नाचे फोटो पाहिले होते. मुंडावळ्या रुईच्या कळ्यांच्या केल्या होत्या. फारच छान दिसत होत्या... अगदी कलादुसरीचे मणी वापरल्यासारखा. वरच्या फोटोत दिसत आहेत तशा कळ्या.
आर्या ,शोभा...क्सो क्यूट..
आर्या ,शोभा...क्सो क्यूट..
रुई चं फूल कसलं दिमाखदार दिस्तंय.. राजेशाहीच अगदी!!!
वा ! फार उपयुक्त माहिती आहे
वा ! फार उपयुक्त माहिती आहे !!
खुप प्रयतनाने मला हे सदर
खुप प्रयतनाने मला हे सदर सापद्ले.
किती उपयोगी धागा
किती उपयोगी धागा
Pages