गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
धमाल येतेय वाचायला
धमाल येतेय वाचायला
मुंग्यावर हा एक प्रभावी उपाय
मुंग्यावर हा एक प्रभावी उपाय आहे. कृपया पहा हा सनीकृत उपाय १:१८ मिनिटानी चालू होतो.
ओटी,पन्ह >>>
ओटी,पन्ह >>>
ओटी पन्ह मै पण तू असा भेदभाव
ओटी पन्ह
मै पण तू असा भेदभाव का करतेस? पक्षांना अगदी प्रेमाने बर्ड फीडर आणून खाउ ठेवायचा आणि खारींना हिडिस फिडिस करायचं? अशानेच त्या खार खाउन अजून त्रास देतात.
खारी मैच्या नावाने खार
खारी मैच्या नावाने खार खातात..
आमच्या कडे पण खारींनी हैदोस
आमच्या कडे पण खारींनी हैदोस घातला आहे. आणि भारतात कशी इटुकली पिटुकली वाटते ना खार. इथे खार म्हणजे ढब्बू ढोल खारटोबा असतो.
स्प्रिंग सुरु झाल्यापासून पक्ष्यांची लगबग चालू झालीये. आम्ही हमिंगबर्डसाठी साखरेचं रंगीत पाणी, पक्षांसाठी त्यांचं खाणं भरून ठेवतो. आता या खारींसाठी काहीतरी आणून ठेवावं असा विचार आहे. शेंगदाणे ठेवले तर त्या शहाण्या पुढच्या दोन पायांत एक दोन दाणे घेऊन पळून जातात. तुरुतुरु चालत अंगणातच कुठेतरी लपवून ठेवतात. हिवाळ्याची सोय करत असतील कदाचित. पण ते पाहणं फार मस्त असतं.
अलीकडेच कोणतेतरी पिवळ्या रंगाचे पिटुकले पक्षी येताहेत. खूप सुंदर दिसतात.
हे सगळे प्राणी, पक्षी पाहून मुलगी जाम खूश असते.
धमाल येतेय वाचायला. कुणीतरी
धमाल येतेय वाचायला.
कुणीतरी मोल (याला मराठीत काय म्हणायचं?) च्या त्रासाबद्दल पण लिहा नं. लवकरच गरज पडणार आहे
बरेच दिवसापासून या बाफचं नाव
बरेच दिवसापासून या बाफचं नाव इतकं खटकतंय... "पक्षाचा त्रास" ? पक्ष्याचा त्रास असं हवं ना ते!
मैत्रेयी +१ तसंच ते
मैत्रेयी +१
तसंच ते 'पक्ष्यामुळे होणारा' असं हवं नाहीतर सुतार पक्ष्याला काहीतरी त्रास होतोय असं वाटतंय.
वेका>> 'मोले' घातले रडाया,
वेका>> 'मोले' घातले रडाया, नाही आसू नाही माया ह्या म्हणीचा अर्थ आता समजला
धमाल धागा आहे.
धमाल धागा आहे.
मनिमाऊला बोलवा.. तिला कबुतरांबरोबर रोमान्स करायला जाम आवडतो.
सिम्स यावर दोन "मोला"चे
सिम्स यावर दोन "मोला"चे सल्ले पण देऊन टाका की
>>बरेच दिवसापासून या बाफचं
>>बरेच दिवसापासून या बाफचं नाव इतकं खटकतंय... "पक्षाचा त्रास" ? पक्ष्याचा त्रास असं हवं ना ते!>> त्या पक्ष्याच्या त्रासामुळे शुद्धलेखनाचं लक्षात आलं नाही अजयच्या. तेव्हा समजून घ्या
>>>त्या पक्ष्याच्या
>>>त्या पक्ष्याच्या त्रासामुळे शुद्धलेखनाचं लक्षात आलं नाही अजयच्या. तेव्हा समजून घ्या
ह्यावर अजय म्हणतीलच की मला शब्दांपेक्षा 'भावना' महत्वाच्या वाटतात म्हणुन...
मी पहिल्याच पानावर केलं होतं
मी पहिल्याच पानावर केलं होतं मुशो!
अजय, शोनाहो!
अजून "पक्षाचा"च त्रास आहे
अजून "पक्षाचा"च त्रास आहे का??
वेका>> आधी 'मोल'करीण व्हा तर.
वेका>> आधी 'मोल'करीण व्हा तर. .. आलेत का मोल?
मोल साठी म्हणे पिंजरा लावतात. मला प्रत्यक्ष अनुभव नाहीये.
सर्व सुतारांतर्फे या बाफचा
सर्व सुतारांतर्फे या बाफचा णिशेद.. 'सुतार पक्ष' जिंदाबाद..
(No subject)
मामु ( माबो मुक्तपिठीय)
मामु ( माबो मुक्तपिठीय) प्रतिसाद भारी आहेत.
ह्यावर अजय म्हणतीलच की मला
ह्यावर अजय म्हणतीलच की मला शब्दांपेक्षा 'भावना' महत्वाच्या वाटतात म्हणुन >>
मंडळी, मदत हवीय. आमच्याकडे
मंडळी, मदत हवीय. आमच्याकडे काही पक्ष्यांचा / प्राण्यांचा / कीड्यांचा त्रास सुरु झालाय. मागच्या अंगणातील चेरीचे झाड या वर्षी पहिल्यांदा बहरले. ३+ वर्षे झालीयेत पण अजून लहान होते बहुतेक. असो. तर काही दिवसांपूर्वी फुलांनी बहरले. मग छोटी छोटी फळे आली. गेल्या आठवड्यात चेरी जरा बाळसेदार दिसायला लागल्या. आणि लालसर तांबुस छटा आली. चवसुद्धा थोडी गोडसर तुरट होती. सगळी मिळून छान ७०-७५ फळे होती. पण अचानक एक - दोन दिवसांत त्यावर काय झालं माहित नाही पण सगळी फळे नाहीशी होऊन झाडाखाली बर्याच बिया पडलेल्या दिसल्या आता यावर प्रदीर्घ चर्चा झाली.
बरेच पक्षी येतात. रॉबीन, कावळे, चिमण्या एवढेच ओळखता येतात पण बाकीचे पण असतात. पण ते असे चकाचक फळ खाऊन बिया इथेच कसे टाकतील.
२-३ खारूताया येतात. त्या खायला सोकावल्या आहेत. त्यांचे काम असू शकेल. बी टणक लागली म्हणून गर खाऊन टाकला असेल. हा पर्याय जास्त बरोबर वाटतोय.
कसली कीड पडली म्हणावं तर झाड चांगलं दिसतंय. पण मला याबाबत माहिती नाही.
शेजारच्यांची टीनएजर पोरं. पण ही शक्यता कमीच. कारण अजून समर सुट्टी सुरु झाली नाही आणि चेरी खाण्याइतपत तयार झाल्या नव्हत्या.
कोण असू शकेल बरं??
धनश्री, इथे बघा काही उपाय
धनश्री, इथे बघा काही उपाय दिलेतः
http://www.ehow.com/how_7308054_keep-birds-away-cherry-trees.html
>> कोण असू शकेल बरं??
>> कोण असू शकेल बरं?? <<
कॅमेरा लावा, नाईट विजन असेल तर उत्तम. चोर निश्चित पकडला जाईल...
कोण असू शकेल बरं?? >> हल्ली
कोण असू शकेल बरं?? >> हल्ली कुणाला काय होईल सांगता येत नाही बघा. एका झाडाला त्याच्या फळांची अलर्जी झाली अस ऐकल होत. तुमच्या झाड-डॉक्टर ला दाखवून बघा.
धनश्री माझ्या कडे तर
धनश्री माझ्या कडे तर स्ट्रॉबेरी, टॉमेटो, झेंडुची,गुलाबाची फुल आणी ढ्ब्बु मिरच्यांची नासधुस केली आहे.
टॉमेटोच झाड तर मोडल होत. एकदिवस कॅमरा लाऊन ठेवल्यावर कळाल की टोमॅटो ची नासधुस खारीने केली आहे.
आणि स्टॉबेरी चिकडी(पक्षी) ने खाल्ली. स्टॉबेरी हँगिग पॉट मध्ये होती त्यावर जोरात उडी मारुन ती खारुताईनेच खाली पाडली आणि ती कुंडी फुट्ली.
आणि बदक आणी त्यांची पिल्लवळ यांनी झेंडुची वाट लावली आहे. आणि खारीनेच गुलाब्याच्या कळ्या कुरतडल्या आहेत, आणि ढ्ब्बु ससे महाशय येउन कुरतडून त्यावर उड्या मारुन गेले आहेत.
मला वाटत खारींचे उद्योग असु शकतील.
खारुट्या भयंकर बदमाश आहेत.
खारुट्या भयंकर बदमाश आहेत. ट्युलिप्स, डॅफोचे कंद तर खातातच पण इतर झाडं पण उगीच उपटून टाकतात. मी लावलेल्यातली रोपं अशीच उपटून टाकली होती.
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ फॅमिली, हरीण वगैरे येतं हे वाचूनच हरखायला होतंय. पण त्याचा त्रास काय असतो ते तुम्हालाच चांगला माहित. हे पशुपक्षी अंगणात घाण पण करतात का? तो पण एक साफ करायचा त्रास असतो. आमच्याकडे मेली ती घाणेरडी कबुतरंच येतात आणि त्यांना रिकामी कुंडी पण चालते. पण कदाचित त्या सुंदर पक्ष्यांच्या त्रासापेक्षा ह्या कबुतरांचा त्रास परवडणारा असू शकतो म्हणा!
डॅफोचे कंदा नाही खात ना म्हणे
डॅफोचे कंदा नाही खात ना म्हणे खारी ?? कारण ते कडू असतात.. ?
आम्ही फक्त ट्युलिप कंदांना जाळी लावली होती..
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ फॅमिली, हरीण, सुतारपक्षी वगैरे >>>
तेच की. कसल भारी. फोटोग्राफीला पण भरपुर स्कोप.
Pages