गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
>>बाहेर जाऊन टेनिस चे बॉल उंच
>>बाहेर जाऊन टेनिस चे बॉल उंच फेकत रहातात तो आला की
एम्टी आमच्या या आधीच्या घरात
एम्टी
आमच्या या आधीच्या घरात चिपमंक्स/खारी यायच्या कौलातून - आणि चिमणीतूनही!
एकदा भाजून गार होत ठेवलेले दाणे रात्रभर अव्हनमधे राहिले. दुसर्या दिवशी सकाळी ट्रे चाटून पुसून रिकामा झाला होता. नवर्याला भाजलेले दाणे आवडतात खायला, पण इतके एकदम खाणार नाही. (आणि सालं तरी ठेवेलच!)
मग मला शंका आली.
त्यासाठी अॅटिकमधे कोल्ह्याची लघवी शिंपडायचा उपाय कोणीतरी सुचवला होता. सुचवणारा वेडा तरी असावा किंवा आपली वाइट्ट मस्करी करत असावा असंच मला आधी वाटलं. पण वर उल्लेख आलाय त्याप्रमाणे होम डेपोत खरंच ती मिळते. पण त्याचा फार उपयोग झाला नाही. पुढे आम्ही ते घरच बदललं.
पण त्याचा फार उपयोग झाला
पण त्याचा फार उपयोग झाला नाही. पुढे आम्ही ते घरच बदललं<<<
बाई, कोल्हा आणि खारी एकाच कंपूतले असतील
पुन्हा एकदा झक्की आणि रॉबीन
पुन्हा एकदा झक्की आणि रॉबीन पक्षाचा त्रास वाचून हसायला आलं
स्वाती, आमच्याकडे त्या काळ्या मुंग्या उन्हाळ्यात बाहेर पडतात.
बेफी, शक्य आहे.मुंग्या त्या
बेफी, शक्य आहे.मुंग्या त्या कंपूत सामील न होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
सायो, हो. तोवर घरी एकमेकांना (अ)स्वच्छतेच्या सवयींवरून बरीच दूषणं देऊन होतात. माणसाने प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधावं.
हा आमचा शत्रूपक्ष... परवा
हा आमचा शत्रूपक्ष...
परवा घराजवळच्या हमरस्त्यावर यांच्या क्रॉसकरण्यामुळे एक अॅक्सिडेंट झाला. गाड्या ५० मैलाच्या स्पीडमधे. आणि हे पक्षी शांतपणे चालत रस्ता क्रॉस करतात. (नागपुरातल्या म्हशी परवडल्या. हाँक केलं तर पळतात तरी.)
(नागपुरातल्या म्हशी परवडल्या.
(नागपुरातल्या म्हशी परवडल्या. हाँक केलं तर पळतात तरी>>> अकोल्यात म्हशींना धै केलं की त्या पळतात!
ह्या बीबीचा एक सुंदर ललित झाला आहे
सिरिय्सली पण या खारींना
सिरिय्सली पण या खारींना काहीही अडवू शकत नाही. अतिशय इवॉल्व्ड अन हुश्शार असतात त्या. बर्ड फीडर मधला पक्ष्यांचा खाऊ त्यांनी खाऊ नये म्हणून जे काही उपाय करू ते सगळे हुषारीने फोल ठरवतात त्या. काही वेळा क्रीपी वाटावे इतक्या इन्टेलिजन्टपणे खाऊपर्यन्त पोहोचतात !
मृ हे कोणते पक्षी ?
मृ हे कोणते पक्षी ?>> हे करडे
मृ हे कोणते पक्षी ?>> हे करडे बगळे आहेत.
नागपुरातल्या म्हशी << इथे
नागपुरातल्या म्हशी << इथे कुठे आल्या..
मृ हे कोणते पक्षी ?>> हे करडे
मृ हे कोणते पक्षी ?>> हे करडे बगळे आहेत.<<<
त्यातला एक दा आणि एक पा या नावानेही ओळखला जातो
नागपुरातल्या म्हशी << इथे
नागपुरातल्या म्हशी << इथे कुठे आल्या.. << बापरे कुणाला म्हैस समजलास तू
एकीकडे आपल्याला हा अनुभव का
एकीकडे आपल्याला हा अनुभव का येत नाही म्हणून दु:ख आणि आनंद पण वाटतोय +१
प्रत्येकाने शक्य असेल तर आपापल्या क्युट क्युट शत्रुपक्षाचे फोटो टाका ना इकडे...
मै, व्हूपिंग क्रेन्स किंवा
मै, व्हूपिंग क्रेन्स किंवा सँडहिल क्रेन्स.
देसाई,
सिरिय्सली पण या खारींना
सिरिय्सली पण या खारींना काहीही अडवू शकत नाही. अतिशय इवॉल्व्ड अन हुश्शार असतात त्या. बर्ड फीडर मधला पक्ष्यांचा खाऊ त्यांनी खाऊ नये म्हणून जे काही उपाय करू ते सगळे हुषारीने फोल ठरवतात त्या. >> मै, squirrel proof bird feeders मिळतात ती वापर. मस्त काम होतेय.
देसाई
स्वाती ताई, काळ्या मुंग्यांना
स्वाती ताई,
काळ्या मुंग्यांना हळदकुंकू वाहून पहा..
हो हो. पन्हं पाजून ओट्या
हो हो. पन्हं पाजून ओट्या भरूनच पाठवेन पुढच्या खेपेस.
सुतार पक्ष्याने मागच्या वर्षी
सुतार पक्ष्याने मागच्या वर्षी आमच्या चिमणी (धुराडं) ला असंच टॉकून (टॉक टॉक करून) भोकं पाडली होती .. भोकं कसली, चिमणी च्या वरच्या भागाचं अजंठा - वेरूळ झालं होतं (काही हजार वर्षांनी उत्खननात सापडलं असतं तर 'त्या काळी लोकं घरावर असं कोरीवकाम करायचे असा निष्कर्ष निघाला असता).. आम्ही एका कॉन्ट्रॅक्टर ला ते दुरुस्त करायला बोलावलं. त्याने काहीतरी असं मटेरियल वापरलय म्हणे (नाव नाही सांगितलं .. प्रोफेशनल सिक्रेट?) की ज्यावर सुतार पक्षी त्यांची कलाकूसर करू शकत नाहीत (बहुदा मेटल असावं हा माझा अन्दाज आहे. पण खालून बघताना काहीच वेगळं जाणवत नाही .. किंबहूना त्या चिमणीला काही डागडुजी केल्यासारखं पण नाही वाटत .. अर्थात लेणी नाहीयेत)
...
...
मृ. ,'(नागपुरातल्या म्हशी
मृ. ,'(नागपुरातल्या म्हशी परवडल्या. हाँक केलं तर पळतात तरी,''
स्वाती.. ,'पन्ह,ओटी'
अशक्य विनोदी होत चाल्लाय धागा..
तुम्हा सर्वांच्या क्यूट शत्रुपक्षांना जर कळलं कि त्यांना इथे इंस्टंट स्टारडम मिळालेलंय ते ऐकून त्यांना आधिकच चेव न चढो
कुत्रे पाळा, उपद्रव
कुत्रे पाळा, उपद्रव टाळा.
कुत्रे हे पक्षी, हरणे, ससे, खारी, उंदीर, घूस, कोल्हे, माणसे सर्वांना पळवून लावतात. पक्ष्यांनी आमच्या हद्दीत गवतावर, झाडावर बसायचे नाही. आवाज न करता चुपचाप बसले तर कदाचित लक्ष जात नाही. हरणे कुंपणापलिकडे असली तरी हे त्यांना जाब विचारतात पण ती हरणे आता लक्ष देत नाहीत. तसा हरणांचा काही उपदव नाही. एकदा घुशीने बीळ केले होते ते रोज बाहेर बोलावून देऊन दाखवायचे आणि त्याच्या तोंडाशी भुंकायचे असे चालू होते. बीळ बुजवल्यावर समाधान झाले.
मुंग्याना काही इलाज नाही, ट्रॅप आणला तरी काय उपयोग नाही, त्या काळ्या असतात आणि टेबलावरच्या साखरेऐवजी मिठाकडेच जातात.
लालु, माणसां बद्दल नक्की
लालु,
माणसां बद्दल नक्की अनुमोदन
लोकहो, जर तुम्ही सामिष
लोकहो,
जर तुम्ही सामिष खाणार्यांपैकी असाल तर एक-एक पकडुन त्यांचा फडशा पाडणे चालु करा.
सग्गळं वाचलं. मजा आली
सग्गळं वाचलं. मजा आली एकेकाच्या गमती, झालेले त्रासेस आणि त्यावरचे उपाय वाचून. कल्पना आहे की गमंत फक्त वाचणारांनाच येते.
एकदम इन्टेरेस्टींग आहे हा
एकदम इन्टेरेस्टींग आहे हा धागा
एकदम इन्टेरेस्टींग आहे हा
एकदम इन्टेरेस्टींग आहे हा धागा>>> खरचं. वाचायला गम्मत वाटतीये पण भोगणार्यांचे हाल आहेत.
साखरेऐवजी मिठाकडेच जातात <<
साखरेऐवजी मिठाकडेच जातात << डायबेटीक असतील
अशक्य गोड त्रास
अशक्य गोड त्रास वाचणार्यासाठी.
हो हो. पन्हं पाजून ओट्या
हो हो. पन्हं पाजून ओट्या भरूनच पाठवेन पुढच्या खेपेस>>>
मुंग्याना काही इलाज नाही,
मुंग्याना काही इलाज नाही, ट्रॅप आणला तरी काय उपयोग नाही,
>>>
मुंग्यांसाठी खवल्यामांजर पाळा
Pages