वेडे नाते
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
19
टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत
बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
कामात गुंतलेले सारेच क्षण
तुझ्या विचारांत हरवायला लागतात
स्वप्नात भेटणं जुनं झालं कधीच
आता प्रत्यक्षात पण तुझा भास होतो
केसांशी खेळणारा वार्याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो
तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
तुझी नसूनही तुझी होऊन जाते मी
तुझ्यामाझ्यातले निनावीच बंध
उरी तरी जपते हे वेडे नाते मी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे. केसांशी खेळणारा
छान आहे.
केसांशी खेळणारा वार्याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो
>>>>> हे भारी!
रूपा.. जाणवली कविता....!!
रूपा.. जाणवली कविता....!!
आवडली .. मस्तच
आवडली .. मस्तच
क्लास... सुपर... !!!
क्लास... सुपर... !!!
बुवा, बागेश्री, मउ, सत्या...
बुवा, बागेश्री, मउ, सत्या... धन्यवाद!
बुवा, तुमचा प्रतिसाद पहिला पाहून एकदम प्लेझंटली सरप्राईज्ड!
छाने
छाने
छान!
छान!
छान.... किती सहज वाटली....
छान.... किती सहज वाटली.... मस्त.
केसांशी खेळणारा वार्याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो >>> हे खासच.
जाई, राखी, उकाका... धन्यवाद!
जाई, राखी, उकाका... धन्यवाद!
खूप छान!!!! माझा प्रतिसाद
खूप छान!!!!
माझा प्रतिसाद पाहून तुला आनंद होवो!!!
हो. खरंच आनंद झाला मला, बी!
टेबलावर निरर्थक लिहीताना
टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत


बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
>>
अगदी अगदी!
मस्तच लिहिलयेस
एक अंतर्गत लय आहे. छान
एक अंतर्गत लय आहे. छान आहे
तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
ही ओळ वाचतांना मजा आली.
धन्यवाद रिया आणि किरण.
धन्यवाद रिया आणि किरण.
व्वा ! सुभानअल्ला !
व्वा ! सुभानअल्ला !
खूप सहजसुंदर..
खूप सहजसुंदर..
(No subject)
छान!
छानै
छानै