निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
तमालपत्राच्या पानात थोडा
तमालपत्राच्या पानात थोडा दालचिनीचा वास येतो, >>
भारतीय तमालपत्र हे दालचिनीच्या कुळातलेच झाड आहे .( लॉरेल ट्रीज)
युरोपात वापरेले जाणारे बे लीफ हे सुद्धा लॉरेल कुळातले असले तरी त्याची पाने तेजपानापेक्षा वेगळी असतात.
इथे चित्र आहेत त्यावरुन फरक स्पष्ट होइल
दालचिनीची पाने http://en.wikipedia.org/wiki/File:Cinnamomum_verum_-_K%C3%B6hler%E2%80%9...
लॉरेल अथवा इंग्रजी बे लीफ http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%...
भारतीय तेज पाने
http://en.wikipedia.org/wiki/File:Cinnamomum_tamala_W_IMG_2433.jpg
वर्षू - मार्जोरम म्हणजे मरव्याची पाने .
आभार मेधा, मी माझ्या "मीठ
आभार मेधा, मी माझ्या "मीठ आणि मसाले " या लेखमालेतही हेच लिहिले होते.
आपल्याकडे खरी दालचिनी फारच क्वचित आणि ती सुद्धा हल्लीच बाजारात मिळायला लागलीय. आतापर्यंत तमालपत्राच्या झाडाची सालच बाजारात विकत असत. तशी ती दालचिनीसारखीच लागते पण किंचित तिखट असते. हिच्या जाड जाड साली असतात. खरी दालचिनी श्रीलंकेत होते. ती पातळ असते आणि गोल वळकटीच्या रुपात बाजारात येते. ती चवीला जरा सौम्य असते. कॉफी मधे वगैरे ती जास्त चांगली लागते. पण तिची पूड सहज होत नाही.
तमालपत्राची झाडे आपल्याकडे नैसर्गिक रित्याही वाढतात. आंबा घाट आणि विशाळगडावर खुप आहेत.
@दिनेशदा माहितीबद्दल धन्यवाद!
@दिनेशदा
माहितीबद्दल धन्यवाद! या पावसाळ्यात ओवा पेरून पाहातो रोप येते का ते पाहाण्यासाठी!
पण माज्याकडील ओव्याला कधीही तुरे आले नाहीत. पाने मात्र फारच सुंदर असतात. त्याची फांदी लावली तरी सहजगत्या दुसरे रोप तयार होते.
पानओव्याला लाग खुप आहे, एकदा
पानओव्याला लाग खुप आहे, एकदा का एखादे रोप आणले की मग आजुबाजूच्या कुंड्यांवर आक्रमण झालेच समजा. माझ्याकडे तर तण माजलेले. मी शेवटी काढुन टाकले सगळे.
मी लहानपणी खाल्लेली ढवसे आणि पॅ,फ्रुटमध्ये खुप साम्य आहे. अजुनही आंबोलीला ढवसे आहेत. फक्त त्या सिजनमध्ये जाऊन एकदा त्यांना कॅमेराबंद केल्याशिवाय बालपणीच्या आठवणींवरचा पडदा उठणार नाही
तमालपत्रे तमाम सह्याद्रीत विपुल आहेत. आंबोलीला तर ढिगानी आहेतच पण मी गोवा नी कर्नाटकाच्या जंगलात फिरलेले त्यातही जमिनीवर तमालपत्राची पानेच पाने पडलेली. आमच्या गावी या आणि मे महिन्यात मुले जंगलात फिरुन तमालपत्रे गोळा करतात आणि मग पिशव्या=पिशव्या भरुन ती मुंबईच्या पाहुण्याना ५०-१०० रुपयांना विकतात.
पण तेजपत्ता, बे लिफ आणी तमालपत्रात फरक आहे हे मात्र माहित नव्हते. मी वरची बे लिफ सोडुन बाकीची दोन्ही पाने पाहिलेली आहेत.
तेजपत्ता, बे लिफ आणी
तेजपत्ता, बे लिफ आणी तमालपत्रात फरक आहे हे मात्र माहित नव्हते. >>>>>>>>>> मलाही.
हं हे सगळं एकच असा समज. तसंच सुमंगलच्या फोटोतली ओव्याच्या वाळलेल्य पानांचा चुरा म्हणजे ओरेगॅनो आणि वाळलेली तुळस म्हणजे बेसील हा समज खरा आहे का?
माझ्या मैत्रिणीने श्रीलंकेहून आणलेली दालचिनी मला दिली आहे. पण आपल्या दालचिनीसारखा आजिबातच वास नाही. बाकी वर्णन दिनेशदांनी केल्याप्रमाणे. वळकटी वगैरे.
म्हणून मी ती दालचिनी वापरत नाही. आपल्या केरळातून आणलेली दालचिनी खूपच मस्त आहे.
मेधा धन्स.. ओवा,
मेधा धन्स..
ओवा, तमालपत्र,तेजपत्ती,बे लीफ.. बाप्रे.. काय काय माहिती मिळाली..
इंडोनेशिया ला ही अशीच वळकटी मिळायची दालचिनी ची पण पातळ नाही ,चांगली जाडीजुडी.. वास भरपूर पण आपल्याला न आवडणारा..
खरंतर लवंग्-दालचिनी इंडोनेशिया खूप मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट करत आहे..पूर्वीच्या काळापासून
ही ती श्रीलंकन
ही ती श्रीलंकन दालचिनी.
सुप्रभात वर्षू !
सुपभात मानुषी... तुझ्या नि ग
सुपभात मानुषी... तुझ्या नि ग वरच्या गप्पा कारणीभूत ठरणारेत तुझ्याकडे यायला .. सावधान!!!
दिनेश दा चा पराठा एकदम सुपर हिट्ट आहे.. मी काल केला आणी टाकला फोटो तिकडे.. अवांतर्हे बर्का..
वर्षू ..........यू आर ऑल्वेज
वर्षू ..........यू आर ऑल्वेज वेल्कमच गं! कधी येत्येस बोल!
वर्षू - मार्जोरम म्हणजे
वर्षू - मार्जोरम म्हणजे मरव्याची पाने . >>>> आपल्याकडे मिळतो तोच मरवा का? हे माहितंच नव्हतं. धन्स मेधा.
ओरेगॅनो म्हणजे काय नक्की ते ही सांगा.
सध्या घरी छोटी छोटी बेसिलची झाडं आली आहेत. मागे दोनदा लावण्याचा प्रयत्न केला होता पण जगलीच नव्हती. माझी ही झाडी मोठी होऊन माझ्यावर बेसिलच्या असंख्य पानांचा अखंड वर्षाव होऊ देत असा सगळ्यांनी आशिर्वाद द्या प्लीज.
घरी बेसिल आणि ओरेगॅनो असावं या इच्छेतली अर्धी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
सुमंगल, अगदि खरं आहे तुझ
सुमंगल, अगदि खरं आहे तुझ म्हणण . आपल्याला दोन दिवस जरी ईथे यायला सवड मिळाली नाही तर हे नि.ग.वाले ट्रेकर्स दोन-चार पाने सहज पुढे निघून जातात. मग त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी फार धावपळ करावी लागते. व वेळ निघून गेल्यामुळे प्रतिसाद ही देता येत नाही .
कोणी आपल्यासाठी थांबत नाहीत. :रडणारी बाहुली:
बेसिल, स्वीट बेसिल हे जरी
बेसिल, स्वीट बेसिल हे जरी तूळशीच्या नात्यातलेच असले तरी फार वेगळे झाड आहे. याची माने हिरवीगार, मोठी असतात आणि स्पर्शाला मुलायम लागतात. किंचीत चमकदार असतात. याला पांढरे तुरे येतात.
खरं तर बाजारात ताजी बेसिल मिळाली तर अगदी तळाचा ( काळा पडलेला ) देठ कापून ती फांदी ग्लासभर पाण्यात ठेवायची. ३/४ तासात पाने ताठ झाली तर आणखी १/२ दिवस ठेवायचे. त्याला मूळे फुटतात आणि मग ती फांदी सहज रुजते. तुरे येण्यापुर्वीच शेंडे खुडत राहिले तर भरपूर पाने येतात. ( माझा हा प्रयोग गोव्यात यशस्वी झाला होता, त्यामूळे मुंबईत व्हावा. त्यामूळे मामी, थोडा प्रयत्न वाढवायला हवा. )
हि पाने पिझ्झावर, पास्ता मधे, पेस्टो मधे खुप छान लागतात. गोडसर चव आणि सुगंध असतो.
वर्षू.. बघतोच फोटो आता !
साधना, या पावसाळ्यात पण जाऊया का अंबोलीला ?
आले. आले. आले. मी आले. काय
आले. आले. आले. मी आले.
काय उचकी लागली म्हणून सांगू? पण धन्यवाद हा माझी आठवण काढल्याबद्दल.
तर मित्र-मैत्रिणींनो, मी दिनांक ८ ते १४ काशी यात्रेला गेले होते. घाबरऊ नका. आले परत.
याचे सारे श्रेय 'आर्या' ला. ती सहकुटुंब (सख्खे + चुलत) काशीला जाणार गेली, आणि मलाही तिने काशी यात्रा घडवली. आर्ये, धन्यवाद!
त्यानंतर १५ ते १८ नेट चालू नसल्यामुळे सगळ वाचायच राहिलं होतं. ते आता पूर्ण झालं.
वरचे सर्व उतारे, फोटो, माहिती, चर्चा, वर्णनं सुंदरच. दिनेशदा, आकाशातील रंगांची उधळण तर अप्रतिम. तुम्ही खरच गेल्या जन्मी खूप पुण्य केलेल आहे.
आता माझ्या अज्ञानावर प्रकाश टाका. ही झाडे कसली आहेत सांगा.
१.
२.
साधना, या पावसाळ्यात पण जाऊया
साधना, या पावसाळ्यात पण जाऊया का अंबोलीला ?>>>>>>>>>>>>>दिनेशदा, आम्ही पण येणार. (एक हट्टी बाहुली)
हा फोटो बघा आवडतोय का?
हा फोटो बघा आवडतोय का?
माझा हा प्रयोग गोव्यात यशस्वी
माझा हा प्रयोग गोव्यात यशस्वी झाला होता, त्यामूळे मुंबईत व्हावा. त्यामूळे मामी, थोडा प्रयत्न वाढवायला हवा. >>>>> नक्कीच वाढवीन दिनेशदा. मला ताजी बेसिल हवीये.
शोभे, प्रज्ञाला पण माहित
शोभे, प्रज्ञाला पण माहित नव्हतं ? तीपण आमच्यासारखीच अंधारात.
पहिले झाड पांढर्या शिरिषाचे आहे. दुसरे करंजाचे !
मामी, सिटीलाईट मार्केट्मधे मिळू शकेल. किंवा ग्रांट रोडला, भाजी गल्लीत.
आणि शोभा, साधनाच्या अंबोलीला
आणि शोभा, साधनाच्या अंबोलीला जायला मला आमंत्रण लागत नाही, बाकि लोकांनी साधनाला विचारावे आणि रितसर आमंत्रण मिळवावे
रच्याकने, साधना त्या टोपली कारवीला पण अनेक वर्षांनी निळी फुले येतात असे वाचले होते. गाववाल्यांनी बघितली का कधी ?
मामी, सिटीलाईट मार्केट्मधे
मामी, सिटीलाईट मार्केट्मधे मिळू शकेल. किंवा ग्रांट रोडला, भाजी गल्लीत.
>> ते तर आहेच. पण घरची हवीये - एटीबी - एनी टाईम बेसिल!
प्लाझाशेजारच्या मार्केटात १० रुपयालाही चिक्कार बेसिल मिळते, खरंतर. पण.........
त्याच फांद्या
त्याच फांद्या लावायच्या.
आपल्याकडे सुपरमार्केट्मधे अजून मातीतल्या कुंडीत लावलेल्या हर्ब्ज नाही मिळत का ? त्या तर अगदी मस्त. हव्या तेवढ्याच खुडायच्या आणि बाकीच्या तश्याच वाढू द्यायच्या.
न्यू झीलंडला तर हॉटेलच्या टेबलवर अशा हर्ब्ज ठेवलेल्या बघितल्या.
बाप्रे!! एक दिवस नाही आले तर
बाप्रे!! एक दिवस नाही आले तर गप्पा कित्तीतरी पुढे गेल्या!!............
मेधा, मस्त माहिती आहे गं.
दा, बेसिलच्या लागवडीबद्दल छान माहिती दिलीत. प्रयोग करून बघायला पाहिजे.
नव नवीन माहीतीचा खजिना
नव नवीन माहीतीचा खजिना लुटायचा असेल तर ईथे रोजच यायला हवे. एक दिवस चुकता कामा नये. ४-५ दिवसांनी आले. आत्ता सगळे वाचून झाले. सगळेच छान.
आज गरम मसाल्यांचा तास चालू
आज गरम मसाल्यांचा तास चालू आहे का? छान माहीती येतेय.
मेधा छान माहीती.
या शोभाताई तुमची वाटच पहात होतो.
आमची पण ओव्याची पाने भरपूर झाली आहेत. आता काढून भजी करायला हवी. हया ओव्याच्या फांद्या कुठेही पटकन जगतात.
हे पण वाचताहेत माबोच्या गप्पा.
ईथे रोजच यायला हवे. एक दिवस
ईथे रोजच यायला हवे. एक दिवस चुकता कामा नये. <<
खरं आहे. एका दिवसातच अनेक पाने बहुमोल माहितीने भरतात.
वा जागुताई प्रचि छान आहे
वा जागुताई प्रचि छान आहे .
कुणीतरी मला या पॅशनफ्रुट च्या बीया द्या रे याला प्रचि पाहुन जीव जळतोय (पॅशनफ्रुट दिल तर जास्तच आभार ).
दिनेशदा, मला शोभा
दिनेशदा, मला शोभा काशीयात्रेला गेली, परत आली ते माहित होते, पण नि.ग. वर का येत नाही ते माहित नव्हते. (माझी पण अजून प्रत्यक्ष भेट व्हायचीच आहे.)
जागू, <<<हे पण वाचताहेत माबोच्या गप्पा.>>>> हे वाचून मला वाटले तू तुझ्या "ह्यांचा " फोटो टाकणार आहेस.
स्वीट बेसिलच्या बिया मिळतात
स्वीट बेसिलच्या बिया मिळतात इथे, अगदि सहज रुजतात आमच्या इथे तरी. मी अंगणात लावते - तर चार पाच रोपांमधे भरभरून बेसिलचि पाने मिळतात सिझनमधे. थंडीत घरात बेसिलचे रोप जगवायचे सगळे प्रयत्न अयशस्वी आजपर्यंत
ओरेगानो ग्रीक, मेक्सिकन, इटालियन पदार्थात वापरतात. स्वाद बेसिलापेक्षा खूप माइल्ड असतो.
आमच्या इथे ( यू एस झोन ६) हिवाळ्यात सुकतं रोप पण परत वसंतात पालवी फुटते. या दिवसात गार्डन सेंटरमधे रोपं मिळतात. मी कधी बिया लावून पाहिल्या नाहीत.
दिनेश, पावसाळ्यात नक्कीच
दिनेश, पावसाळ्यात नक्कीच जाऊया. जिप्स्यालाही कधीचे यायचेय...
ऑगस्टच्य पहिल्या आठवड्यात आम्ही दोघेही बीझी असु (तुम्हाला माहित असेलच गंम्मत.. ) त्याच्याआधी किंवा नंतर कधीही.
आणि सगळ्या निगकरांनाही आग्रहाचे आमंत्रण... मला किनै घर भरुन मित्रमंडळी बोलवायला, त्यांच्या हातुन त्यांचे स्पेशल पदार्थ आवर्जुन बनवुन घ्यायला आणि त्या सगळ्यांबरोबर अगदी अगत्याने त्या पदार्थांचा, गप्पागोष्टी करत, आस्वाद घ्यायला खुपच आवडते तर सगळ्यांनी हेच छापिल आमंत्रण समजुन नक्कीच येणे करावे. तुम्हाला मला काय खायला घालायला आव्डेल ते आधीच कळवा म्ह्णजे मी तशी तय्यारी करुन ठेवते..
मागच्या रविवारी नर्सरीतून ७-८
मागच्या रविवारी नर्सरीतून ७-८ फूट उंचीची झाडं आणली. बहावा, गोल्डन बांबू , चिकू, रायआवळा पेरू आणि जांभळी तामण.
सगळी झाडं छान हेल्दी आहेत. मोठ्या पोलीथीन बॅग मधे होती.मातीच्या वजनामुळे एकेक झाड चांगलच जड होतं. टेंपोवाल्यानी कशीबशी गेट्च्या आत आणून ठेवली. त्यांना बागेत खड्डा घेऊन लावायला माळीबुवांना बोलावलं पण ते तर रामनवमीसाठी गावी गेलेत.
मग एक तरी झाड स्वतःच लावावं म्हणूनसंध्याकाळी पेरूच झाड लावायचं ठरवलं. त्याची बॅग काढली आणि हलक्या हातानी थोडी थोडी माती काढून मातीचं वजन कमी केलं. वाफ्यामधे खड्डा करून खाली थोडं शेणखत टाकून झाड लावलं.झाडाला पाणी दिलं. एकवार प्रेमानी त्याच्याकडे बघून आमच्या बागेत त्याचं स्वागत आहे असं त्याला सांगितलं.
सकाळी कामावर जाताना मात्र त्याला पाणी द्यायला पाहिजे हे मी साफ विसरून गेले. ५ वाजता घरी आल्यावर आधी त्याला भेटायला बागेत गेले.....आणि बघते तर सगळी पानं मलूल झालेली....माझ्या डोळ्यात पाणीच आलं........लगेच त्याला पाणी पाजलं आणि सारखं त्याच्याकडे बघत २ तास बागेतच बसून होते.पण त्याच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता.अगदी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत..पुन्हा त्याला थोडं पाणी दिलं ..घरातलं कोणी सलाईनवर असावं असा मूड झाला होता माझा.....
सूर्याच्या पहिल्या किरणांमधे त्याला पाहिलं आणि त्याच्या तजेलदार पानाकडे बघून माझाही चेहेरा खुलला....
घरचे म्हणताहेत.......निसर्गाच्या गप्पांमुळे हिची गॉन केस झालीय........
निसर्गाच्या गप्पांमुळे हिची
निसर्गाच्या गप्पांमुळे हिची गॉन केस झालीय........>>>>>>>>>>:स्मित:
पण अवनी, निसर्गामुळे, त्याच्या प्रेमामुळे सगळ्यांची अशीच अवस्था होते हे खरंय. बाय द वे, तुला आणि तुझ्या नव्या पाहुण्यांना खूप सार्या शुभेच्छा!! सर्व मंडळी तुझ्या बागेत रमून राहूदेत ही सदिच्छा.. त्यांच्या पाठोपाठ निरनिराळे पक्षी पण येऊंदेत.. आणि तुमचा परिसर आनंदाने भरून जाऊंदे........:स्मित:
Pages