आज मी स्मशानात आलो जाऊन ....
पाहिले थोडा वेळ....मी त्या मुडद्यांत राहून....
शांत वाटले त्यातले काही ...
पाहिले काहींना मरूनही...इच्छांसाठी अजूनही जिवंत पाहून....
काही देह....तेथे हि हसरे होते....
जितके मिळाले त्यातच सुख त्यांचे..मागणे ना अजुनी कसले होते....
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....
काहींच्या ओठी काळजी मुलाबाळांची होती,
काहींच्या ओठी....गाणी रडकी....भूतकाळाची होती,
काहींच्या मनी अजूनही......न सुटलेले हिशोब होते,
दहाच बोटे हाताची....तरी पुन्हा तीच तीच ते मोजत होते....
काही विचारात होते,"आयुष्यात नक्की काय केले आपण?
काय काय कमावले?....काय नेमके गमावले आपण?"
काहींच्या मनी अजूनही...त्या लाथाडनाऱ्यांबद्दल प्रीती होती,
काहींच्या डोळ्यांत....मरूनही....मरणाची भीती होती.....
काही देह जिवंतपणी जळले....तरी येथे पुन्हा जळत होते,
काहींना जे जिवंतपणी ना कळले....ते अर्थ आता तेथे कळत होते...
सलणारी काही दु:खं....सैरावैरा तेथेही पळत होती...
काही भ्रूणहत्येतली बाळे...तेथे परीसोबत खेळत होती....
म्हटले मी त्यातल्या एकाला
"मी हि येईन कधीतरी तुमच्या सोबतीला....
येईल कुणीतरी दुसरा येथे मन:शांती शोधायला...
जुळवेल मग माझा चेहरा इथल्याच एका आकृतीला...
सुखदु:खाचे हे चक्र असेच फिरत राहणार....
कुणी येण्याचा..कुणी जाण्याचा सिलसिला असाच चालू राहणार..."
--आशिष राणे
कविता आवडली...चांगले लिहले
कविता आवडली...चांगले लिहले आहे....
नॉट बॅड !!! पुलेशु !!
नॉट बॅड !!!
पुलेशु !!
धन्यवाद
धन्यवाद
सलणारी काही दु:खं....सैरावैरा
सलणारी काही दु:खं....सैरावैरा तेथेही पळत होती...
काही भ्रूणहत्येतली बाळे...तेथे परीसोबत खेळत होती....
अप्रतिम ....!
तिलकधारी आला आहे. तीन ते चार
तिलकधारी आला आहे.
तीन ते चार ओळी फार आवडल्या.
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....<<<
काहींच्या डोळ्यांत....मरूनही....मरणाची भीती होती.....<<<
काही भ्रूणहत्येतली बाळे...तेथे परीसोबत खेळत होती....<<<
फक्त एक - लहान मुलांचा अंत्यविधी मोठ्या माणसांप्रमाणे केला जात नाही, त्यांचे शव पुरले जाते, काही वेळा त्याची जागाही निराळी असते.
कविता विचारयुक्त आहे.
तिलकधारी जात आहे.
सगळ्यांचे खूप खूप
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
@तिलकाधारी ....तुम्ही येउन गेलात, कविता वाचली म्हणून धन्यवाद
जीवनाचा अर्थ खरा ,स्मशानीच
जीवनाचा अर्थ खरा ,स्मशानीच कळतो .चिंतन आवडले .