कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे ठरवणारी मंडळी ह्युज हेफ्नरच्या 'पे-रोल' वर असावीत असा माझा मराठी संशय आहे. चवीला बर्यापैकी असणार्या या बहुतांश पेयांची नावे मात्र भलतीच अब्रह्मण्यम असतात. 'से.. ऑन द बीच' काय (गरजूंनी गाळलेल्या जागा मनात भराव्यात), 'बे ऑफ पॅशन' काय किंवा 'क्लायमॅक्स' काय, सगळाच विचित्र मामला. चार चौघांत मोठ्याने उच्चारायचीसुद्धा लाज वाटावी अशी नावे देऊन काय साध्य होते ते त्यांनाच माहीत. बरं भारी हॉटेलात (सॉरी रेस्तराँमध्ये) ही पेयं पिऊन फक्त खिशाला चाट बसते आणि नावातून सुचवलेली अनुभूती अजिबात मिळत नाही हे माहित असतानाही अशी नावे ठेवण्याचा अट्टाहास कळत नाही. आताशा एकूणच खाण्या-पिण्याला 'ग्लॅमर' आले असल्याने यांची चलती आहे हे खरे पण पुढेमागे मराठी अस्मितेचा उद्रेक होऊन आपल्या थोर परंपरेत बसणार्या ह्या गोष्टी नाहीत असा साक्षात्कार एखाद्या नेत्याला होणारच नाही, आणि अशा आगाऊ नावांचे पेयपदार्थ विकणार्या पब-संस्कृतीच्या मुसक्या बांधल्या जाणारच नाहीत याची काय खात्री? तेव्हा -ज्यांनी अजून 'घेतली' नसेल त्यांनी - असे काही व्हायच्या आत या शीतोष्ण पेयांची चव घेऊन ठेवावी असा माझा आपला प्रेमाचा सल्ला आहे.
त्यामानाने देशी पेयांबद्दल आपण अजून अशा काही घोटाळ्यात पडलेलो नाही. आपण उगाचच आले-लिंबू सरबताला 'मदनबाण' किंवा कोकम सोड्याला 'रतिशलाका' म्हणत नाही तर सरबतच म्हणतो याचा मला अभिमान वाटतो. नाही म्हणायला आपल्या आयुर्वेदाचार्यांनी औषधांसाठी संस्कृत-प्रचुर शब्द वापरून प्रयत्न केलेत पण मुळात संस्कृतशी (आणि संस्कृतीशी) सामान्य माणसाला देणं- घेणं कमीच असल्याने त्याचा फारसा गाजावाजा झालेला नाही.
आज लिहीत असलेल्या मॉकटेलचे नाव मात्र असले काही नाही (मला अजून मा.बो. वर राह्यचे आहे). सरळ-सुधे 'सिंडरेला' नावाचे हे मॉकटेल संपूर्ण नॉन अल्कोहोलिक आणि केवळ चढत्या उन्हाळ्याची तहान भागवायच्या उद्देशानेच प्यायले जाते हे आवर्जून सांगावेसे वाटते.
प्रमाण : दोन ग्लाससाठी
साहित्य :
पायनॅपल ज्यूस : १२० मि.ली.
ऑरेंज ज्यूस : २४० मि.ली.
लेमन ज्यूस : ३० मि.ली.
ग्रेनेडीन सिरप : ३० मि.ली. (यात अल्कोहोल अजिबात नाही)
क्लब सोडा
बर्फ, मीठ, सजावटीसाठी संत्र्याची काप ई.
कृती:
ग्लासच्या कडेला संत्रे फिरवून ओलसर करून घ्या आणि त्यावरून मीठ लावून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून 'चिल' करत ठेवा.
सगळे ज्यूस आणि ग्रेनेडीन बर्फाच्या खड्यांसोबत शेकरमध्ये चांगले मिक्स करा.
ग्लासमध्ये अर्धे मिक्स ओता, बाकी सोड्याने टॉप-अप करा.
संत्राची चकती / काप सजावट करा.
कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे
कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे ठरवणारी मंडळी ह्युज हेफ्नरच्या 'पे-रोल' वर असावीत असा माझा मराठी संशय आहे. चवीला बर्यापैकी असणार्या या बहुतांश पेयांची नावे मात्र भलतीच अब्रह्मण्यम असतात. 'से.. ऑन द बीच' काय (गरजूंनी गाळलेल्या जागा मनात भराव्यात), 'बे ऑफ पॅशन' काय किंवा 'क्लायमॅक्स' काय, सगळाच विचित्र मामला. चार चौघांत मोठ्याने उच्चारायचीसुद्धा लाज वाटावी अशी नावे देऊन काय साध्य होते ते त्यांनाच माहीत. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगदी अगदी...
मॉकटेल टेम्प्टींग आहेच.... पण सजावटीला एखादा चांगला ग्लास घ्यायचा ना...... हा अगदीच चम्मच-गोळा वाल्याकडील ग्लासटाईप वाटतोय.... असो.
करुन बघतोच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बढीया. पार्टीसाठी हे नक्की
बढीया. पार्टीसाठी हे नक्की करण्यात येईल. अननसाची चव असलेली सर्व पेये आवडती आहेतच.
ग्लासाला मीठ कमी लावलय की मला दिसत नाहीये.
मस्त! रंगही मस्त दिसतोय...
मस्त!
रंगही मस्त दिसतोय... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॉकटेल बेस्ट आहे, ग्रेनेडीन
मॉकटेल बेस्ट आहे, ग्रेनेडीन सोडल्यास इतर सर्व गोष्टी घरात आहेत. पण हे ग्रेनेडीन कुठे मिळेल ?
एक तर ते ह्यू हेफनर आहे.
एक तर ते ह्यू हेफनर आहे. मिक्स फ्रूट ज्युस प्यायला ग्रेनेडिन घालून तरी चालेल की मग. ट्रॉपिकाना मस्त असतोय.
मस्त मालिका आहे ही अमेय! चालू
मस्त मालिका आहे ही अमेय! चालू ठेवाच. हे मॉकटेलही आवडले. सिंडरेला मॉकटेल हे नांवही आवडले.
धन्यवाद.
सही!! पार्टीसाठी बेस्ट आहे.
सही!! पार्टीसाठी बेस्ट आहे.
>>>>>एक तर ते ह्यू हेफनर
>>>>>एक तर ते ह्यू हेफनर आहे<<<<<< मी पण तेच सांगणार होते. GH सायलेंट आहे. रेसिपी सोपी आणि मस्त एकदम.
मस्त. खरंच कुठल्याही
मस्त. खरंच कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये २००-३०० रु ला विकण्यासारखं काय आहे यात? पण प्रचंड आवडतं म्हणून घेतल्या जातं. आता कधीतरी घरी ट्राय करीन.
हे (मॉकटेल्स) पण टाका:
वर्जिन पिनाकोलाडा, वर्जिन मेरी, बेलिनी, Alcohol-free Sangria..
सर्वांना धन्स. अश्विनीमामी :
सर्वांना धन्स.
अश्विनीमामी : ह्यू हेफनरची चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल विशेष धन्स. पण 'एकतर' अशी प्रतिसादाची सुरूवात का ते कळले नाही. मिक्स फ्रुट घालून जरूर करून पहा व सांगा म्हणजे आम्हालाही कळेल कशी चव लागते ते
.
नताशा, जरूर प्रयत्न करेन. वर्जिन मेरीचे सामान आहे घरी, तेव्हा आगामी आकर्षण नक्कीच वर्जिन मेरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी सोपं करून समोर मांडलंत.
अगदी सोपं करून समोर मांडलंत. नामकरणांवरच्या भाष्याशी सहमत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंड्रेला..अगदी बालवाडीपासून सुरुवात केलीत आमच्यासाठी हे बरं केलंत अमेय
मस्तच रे अमेय.. रंग खूप
मस्तच रे अमेय.. रंग खूप टेंम्प्टिंग दिसतोय.. ऑरेंज + पायनापल बेस्ट काँबी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग मस्त दिसतोय. लेमन ज्यूस
रंग मस्त दिसतोय.
लेमन ज्यूस डाबरचं वापरलं आहे का? इन जनरल ते कसं लागतं? प्रिझर्वेटिवची चव जाणवते का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ताजंच लिंबू वापरेन.
भारतीताई, वर्षू नीलजी
भारतीताई, वर्षू नीलजी धन्स.
'मंजूडी' जी,
ताजी लिंबे बेस्टच. माझ्याकडची संपली होती म्हणून लेमनीझ वापरलं. थोडी प्रिझर्वेटिवची चव जाणवतेच त्यात.
छान लिहिलेय. मॉकटेल आहे
छान लिहिलेय.
मॉकटेल आहे म्हणजे मला चालेल.
ग्रेनडीन सिरप भारतात बघितले नाही. साधे डाळींबाचे दाट सरबत असते ते. स्वादापेक्षा रंगासाठी चांगले.
दिनेशदा हल्ली मिळू लागले आहे
दिनेशदा हल्ली मिळू लागले आहे बर्याच स्टोअर्समध्ये. मी वापरलेले Monin बर्याच दुकानांत पाहिलेय. यांचेच ग्रीन अॅपल एक्स्ट्रॅक्ट, आयरिश फ्लेवर कॉन्संट्रेट, ब्लु कुरास्सो सिरप (नॉन अल्कोहोलिक) वगैरेही उपलब्ध आहे.
<स्वादापेक्षा रंगासाठी चांगले.>> सहमत.
http://www.drinksmixer.com/de
http://www.drinksmixer.com/desc102.html
मॉकटेल असल्याने करणेत येइल लवकरच.
malA kOkaTel karAyace asel
malA kOkaTel karAyace asel tar kAy vAparu? Ram ka vhodakA?
mAlA VataTe vOdkA chAngali
mAlA VataTe vOdkA chAngali Lagel![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देवान्नू.......प्लिज जरा
देवान्नू.......प्लिज जरा cocktail च्या रेसिप्या पण शेर करा कि....
टकीला घालून मार्गरिटा करा.
टकीला घालून मार्गरिटा करा. ऑरेन्ज आणि पायनॅपल ज्यूसबरोबर बेष्ट जाते. उन्हाळ्याची ऐशीतैशी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रेसिपी अमेय. ते
छान रेसिपी अमेय. ते व्हिंग्लीश नाव पाहून जरा भिती वाटतीये. अननस, संत्रे, लिंबु वगैरे सोपे आहे. पण त्या ग्रेनेडिन च्या जागी दिनेशदा म्हणतात तसे रंगासाठीच घालायचे तर आपले कोकम सरबत मिक्स केले तर? रंग तरी तस्साच येईल. करून पाहीन व नंतर सांगीन.