Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 24 March, 2013 - 07:36

गझल
शिक्षा जगायची काटली जराशी
आशा मरायची वाटली जराशी

मी सोडला जसा उच्छवास थोडा
त्यांची हवा म्हणे बाटली जराशी

होकार ना दिला, ना नकार आला
भाषाचमत्कृती थाटली जराशी

हिसकावली वही वाचण्या मला तू
पाने मनातली फाटली जराशी

दारात भीक ज्या मागण्यास गेलो
त्यानेच भीक ही लाटली जराशी

आता पुरे करा भाषणे उपाशी
पोटापुढे धरा ताटली जराशी

नाकारले 'अरुण' मृत्युनेच जेव्हा
डोळ्यात आसवे दाटली जराशी
-'अरुण' (शुभानन चिंचकर)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सोडला जसा उच्छवास थोडा
त्यांची हवा म्हणे बाटली जराशी

होकार ना दिला, ना नकार आला
भाषाचमत्कृती थाटली जराशी

हिसकावली वही वाचण्या मला तू
पाने मनातली फाटली जराशी

दारात भीक ज्या मागण्यास गेलो
त्यानेच भीक ही लाटली जराशी

शेरांचा आशय, अभिव्यक्ती आवडली!
मात्रांचा हिशेब कुठे कुठे चुकतो आहे कुठे १९, कुठे २० तर कुठे २१ मात्रा झाल्या आहेत!
२० मात्रा पकडून वृत्तदोष काढता यावा! आश्वासक गझल! अभिनंदन!

..............गझलप्रेमी

मात्रा मी सहसा मोजत नाही मला कंटाळा येतो पण देवसर व यात्रीजी म्हणताय्त म्हणजे बरोबरच असणार

हिसकावली वही वाचण्या मला तू>>>>इथे भाषा जरा गडबडलीये बहुतेक (वैयक्तिक मत )
हिसकावली वही वाचता मी तुझी .. तू ..असे वाचले ....अर्थातच ; तुमच्या मनातील मात्रांचे अपेक्षित गणित विचारात न घेता Happy

पोतापुढे= पोटापुढे असे वाचले चुकत असल्यास क्षमस्व

बाकी एकंदर गझल फारशी आवडली नाही .....हे ही वैयक्तिक मत राग नसावा

गझलप्रेमीजी, आनंदयात्रीजी
'आशा मारायची वाटली जराशी' इथे typing mistake आहे, त्यामुळे १ मात्रा वाढली आहे
'आशा मरायची वाटली जराशी' असे वाचावे (पोस्ट अपडेट केली आहे)
>>>मात्रांचा हिशेब कुठे कुठे चुकतो आहे कुठे १९, कुठे २० तर कुठे २१ मात्रा झाल्या आहेत!<<<
गझलप्रेमीजी, तुमच्याबद्दल आदर आहे .... पण माफ करा, तुमची काहीतरी गल्लत होत आहे.
मी वापरलेले वृत्त अप्रचलित आहे
हे अक्षरगण वृत्तच आहे (२० मात्रांचे)
याची लगावली - गा गा ल गा ल गा , गा ल गा ल गा गा - अशी आहे
यानुसार जर आपण परत गझल वाचली तर तुम्हाला कुठेच वृत्तदोष आढळणार नाही
तरीही कुठे चुकत असल्यास जरूर कळवावे ... खुल्या मानाने स्वीकारण्यात येईल :):):)
आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार !!!

वैभवजी,
पोतापुढे .... typing mistake .... पोटापुढे असेच आहे (पोस्ट अपडेट केली आहे)
बाकी तुमची वैयक्तिक मते असल्यामुळे त्याबाबत खुलासा करणे चुकीचे आहे ...
कारण मला जसा अनुभव येतो तसाच तुम्हालाही यावा ही अपेक्षा करणे बरोबर नाही ...
जे कवीच्या अनुभवाशी तादात्म्य पावतात, त्यांना ती रचना आवडते ... इतरांना नाही ...
वैयक्तिक मतच आहे ते ... आणि तुमच्या मताचा आदर आहे मला ! Happy

वैयक्तिक मते असल्यामुळे त्याबाबत खुलासा करणे चुकीचे आहे ...>>>>>>>>

याचा अर्थ .."मलातरी खुलासा काय द्यावा हे सुचत नाहीये "...असा होतो (हे माझे सार्वत्रिक मत आहे !!)
स्वत:ची चूक तुम्हाला मान्य करायचीच नसेल तर राहिले ....मला काय त्याचे !
हाय काय अन नाय काय !!
__________________________________________

<<<<<कारण मला जसा अनुभव येतो तसाच तुम्हालाही यावा ही अपेक्षा करणे बरोबर नाही ...
जे कवीच्या अनुभवाशी तादात्म्य पावतात, त्यांना ती रचना आवडते ... इतरांना नाही ...>>>>>

पा-ल्हा-ळ !!!!!! नाही आवडले क्षमस्व

असे दिसत आहे की सगळ्यांना ही गझल लयीत म्हणता येत आहे. मला ती लयीत म्हणता येत नसल्यामुळे माझ्या प्रतिसादाला काही अर्थच उरणार नाही.

शुभाननजी,
मी वापरलेले वृत्त अप्रचलित आहे
हे अक्षरगण वृत्तच आहे (२० मात्रांचे)
याची लगावली - गा गा ल गा ल गा , गा ल गा ल गा गा - अशी आहे
<<<<<<<

अजूनही मत्रांची संख्या व लघुगुरूक्रम चुकत आहे! नीट तपासून पहावी गझल!

खालील ओळी तपासाव्यात......

मी सोडला जसा उच्छवास थोडा

नाकारले 'अरुण' मृत्युनेच जेव्हा

एखाद्या कवीची ओळ मला कळली नाही तर ती ओळ चुकीचीच आहे हे म्हणणे म्हणजे मीच एकमेव विद्वान ...
लिहिणाराही चुकीचा ... कारण त्याची ओळ 'मला' समजली नाही ...
मग त्याने 'मला' गोंजारण्यासाठी खुलासा केलाच पाहिजे ...
नाही केला खुलासा तर >>>> याचा अर्थ .."मलातरी खुलासा काय द्यावा हे सुचत नाहीये "...असा होतो <<<<<
हे सार्वत्रिक मत सार्वजनिकरित्या त्या कवीवर थुंकायला मी तयार ...
सुरेश भटांचा शेर आठवला -
स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता
(आता असा अर्थ काढू नका की मी सुरेश भटांची बरोबरी करतोय !!!)
... खुलासा न देण्याची कारणमीमांसा कवीने केली तर ते पा-ल्हा-ळ !!!!!!
.....
>>>>
स्वत:ची चूक तुम्हाला मान्य करायचीच नसेल तर राहिले ....मला काय त्याचे !
हाय काय अन नाय काय !! <<<<<
वैभव कुलकर्णी .... मान्य ... स्वतःची चूक एकदम मान्य ....
अहो, 'तुम्हाला' (साक्षात तुम्हाला) समजणार नाही अशी ओळ लिहून मी अक्षम्य चूक केली आहे
z copy.jpg
आणि हे बाकीचे प्रतिसाद देणारेही चूक आहेत .... कारण ती साधी माणसे आहेत ...
पुन्हा एकदा सुरेश भटांचा शेर -
साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी
यांच्यात मी पाहे तुका, यांच्यात मी पाहे जनी !
- इति लेखनसीमा.

मी सोडला जसा उच्छवास थोडा
त्यांची हवा म्हणे बाटली जराशी

हिसकावली वही वाचण्या मला तू
पाने मनातली फाटली जराशी

<< क्या बात !

गझलप्रेमीजी,
मी सोडला जसा उच्छवास थोडा
मी सो ड ला ज सा , उच् छ वा स थो डा
गा गा ल गा ल गा , गा ल गा ल गा गा

भरत मयेकरजी म्हणतात त्याप्रमाणे 'उच्छवास' (गा ल गा ल ) नसून 'उच्छ्वास' (गा गा ल ) असेल तर मात्र वृत्त चुकत आहे हे मान्य (तरीही बोलीभाषेत 'उच्छवास' (गा ल गा ल ) असा उच्चार केला जातो ... त्याप्रमाणे लिहिले आहे)

नाकारले 'अरुण' मृत्युनेच जेव्हा
ना का र ले 'अ रुण' मृ त्यु ने च जे व्हा
गा गा ल गा ल गा , गा ल गा ल गा गा

नाकारले 'अरुण' मृत्युनेच जेव्हा ... या ओळीत एका गुरुऐवजी दोन लघु घेतले आहेत ...
आणि ही सवलत नियमात बसणारी आहे .
मृत्यू मधील त्यू र्हस्व (त्यु) घेतलेला आहे
ही देखील सवलत नियमात बसणारी आहे .

अरूणजी:

स्वतःची वृत्ते करणे आणि त्यात लिहिणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
मात्र हे करताना लयीची काळजी घेणे आवश्यक आहे.
लगावली मेन्टेन करूनही लयीत रचना फसू शकते, हे स्वानुभवावरून सांगत आहे.
आपल्या रचनेत लय स्वाभाविक नाही वाटली.

<बोलीभाषेत 'उच्छवास' (गा ल गा ल ) असा उच्चार केला जातो ... त्याप्रमाणे लिहिले आहे>
कुठल्या बोली भाषेत?

उत्+श्वास= उच्छ्वास.

बरेच शेर आवडले. पवित्राही.

Lol

बाण जागेवर लागला म्हणायचा !!!! Wink

असो !!

हिसकावली वही वाचण्या मला तू>>>>> चा आपल्याला अपेक्षित अर्थ सांगाल काय त्यात वाचण्या असे शब्दयोजन त्या शेरातील ..त्या ओळीतून निघणार्‍या(...मलातरी निघालेल्या ...) अर्थासाठी .....तश्या व्याकरणाने युक्त असे ... का केले आहे ते मला समजलेच नाही . महाराष्ट्रात असे कुठे बोलले जाते याबद्दलही माहीती नाही तेही माहीत असल्यास सांगाल तर आभारी राहीन !!

कवीच्या (तुमच्या) अनुभवाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न नक्कीच करीन आधी मला शब्दांचा व ओळींचा अन्वय-अर्थ तरी लावून द्याल का अशी विनंती

दुर्दैवाने भट साहेबांचे लेखन मी फरसे वाचलेलेच नाही तसा योगच नाही आला फारसा
तुम्हाला भट मुखोद्गत दिसतात आपल्याकडून त्यांचे लेखन अधिक जाणून घ्यायला आवडेल Happy

आपले पिताश्री / नात्यातील कुणी देखील गझल करीत होते का ? फेसबुकावर तुम्ही त्यांच्या प्रकाशित गझल दिल्याचे व मी त्या वाचल्याचे स्मरते. मला त्यांची त्या काळातील शायरी मला फार आवडल्याचेही स्मरते (किमान २० एक वर्षे तरी जुने संदर्भ तुम्ही दिले होते)
तुमची शायरी मला प्रस्तुत गझलेततरी त्यातुलनेत कमी वाटली (वैयक्तिक मत)

असो

तुमचे शेर मला अजिबातच समजले नाहीत /आवडले नाहीत असे मी काहीच म्हणालेलो नाही प्लीज गैरसमज करून घेऊ नये

फेसबुकावर तुम्ही फेमस आहात हे मी पाहिले आहे त्यासाठी अभिनंदन !!

आपला नम्र
~वैवकु
(=एक नवखा, गझल करू इच्छिणारा शब्दजुळव्या !!)