ग
Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 24 March, 2013 - 07:36
गझल
शिक्षा जगायची काटली जराशी
आशा मरायची वाटली जराशी
मी सोडला जसा उच्छवास थोडा
त्यांची हवा म्हणे बाटली जराशी
होकार ना दिला, ना नकार आला
भाषाचमत्कृती थाटली जराशी
हिसकावली वही वाचण्या मला तू
पाने मनातली फाटली जराशी
दारात भीक ज्या मागण्यास गेलो
त्यानेच भीक ही लाटली जराशी
आता पुरे करा भाषणे उपाशी
पोटापुढे धरा ताटली जराशी
नाकारले 'अरुण' मृत्युनेच जेव्हा
डोळ्यात आसवे दाटली जराशी
-'अरुण' (शुभानन चिंचकर)
विषय: