Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 10:57
मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!
मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!
मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी
मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!
दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून
बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग
तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला
नव्हते तिथे ते गुलाब
पण मखमल होती
नाजूक मनगटी तुझ्या
मोतीमाळ पण होती
पाहिले मी न तुला
न गुलाब ते दिले
पण दिसले ते मला
नेत्र दोन पाणावलेले ...!!
मी गुलाब आणले होते....!!
----------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपला अभिप्राय कळवावा...
आपला अभिप्राय कळवावा...:)
छान !
छान !
छान !
छान !
चांगला प्रयत्न आहे,थोडा
चांगला प्रयत्न आहे,थोडा वॅलेंटाईन डे परिणाम येतोय गुलाबांच्या प्रचलित प्रतिमेमुळे.
छान प्रयत्न आहे. हळू हळू
छान प्रयत्न आहे. हळू हळू शिकशील
(अवांतर : अभिप्राय कळवा असं इथं म्हणणं म्हणजे बॉटनीच्या प्रोफेसरांना धरून आणतील प्रतिसाद द्यायला. सांभाळून हलकेच घ्यावे )
धन्यवाद सर्वाना..
धन्यवाद सर्वाना..:)