Submitted by शिवम् on 6 February, 2013 - 15:01
रान भाबडे रडु लागले,
देत आठवणींचे हुंदके,
हिरवीगार काया सरली
रुक्ष या समया आगे ..
काळचक्रे फिरली अशी की,
अगतिक झाले पाखरु,
असुनही माता जवळी,
रडू लागले गोंडल वासरु .!
हिरवे पातेही नाही रानी,
हतबल झाला बळीराजा,
दुष्काळ समयी नमले सगळे,
"काय देव आणि काय ख्वाजा?"
जनावरांच्या दिमतीला नाही ,
कोवळा पिवळा चारा,
निसर्गाचे अमानुष तांडव,
आहे आपुलाच दोष सारा .!
रान म्हणाले,"हे दुष्काळा
काय केलीस आमुची थट्टा?"
तो निर्दयी म्हणतो असा की,
"खेळा 'जीवन' मरणाचा सट्टा...!"
-शिवम् पिंपळे,औरंगाबाद.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रान म्हणाले,"हे दुष्काळा ककाय
रान म्हणाले,"हे दुष्काळा
ककाय केलीस आमुची थट्टा?"
आर्तता जाणवली.
शुभेच्छा
Dhanyavad Sameerji..... dev
Dhanyavad Sameerji.....
dev Karo punha ashi sthiti na yevo ....
वरील कवितेत 'जीवन' चा अर्थ
वरील कवितेत 'जीवन' चा अर्थ 'पाणी' आहे बरे!!!
दुष्काळ समयी नमले सगळे काय
दुष्काळ समयी नमले सगळे
काय देव आणि काय ख्वाजा !
विशेष आवडले ..
आता हीच स्थिती येणार वाटतेय..
धन्यवाद सुशांतभौ...
धन्यवाद सुशांतभौ...
दै.दिव्य मराठी औरंगाबाद
दै.दिव्य मराठी औरंगाबाद आवृत्तीत ही कविता प्रकाशित झाली ......
अभिनन्दन, दुष्काळसमयी नमले
अभिनन्दन,
दुष्काळसमयी नमले सगळे
""काय देव काय ख्वाजा"
.....हे विशेष आवडले
धन्यवाद विजयाताई...
धन्यवाद विजयाताई...
दुष्काळी स्थिती मांडण्याचा
दुष्काळी स्थिती मांडण्याचा चांगला प्रयत्न.
पण काही ठिकाणचे शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष/टायपो खटकले.
स्वागत आणि शुभेच्छा
स्वागत आणि शुभेच्छा शिवम.
उल्हासजींशी सहमत.
धन्यवाद उल्हासदादा अन्
धन्यवाद उल्हासदादा अन् भारतीताई!!
करतो टायपो दुरुस्त...
टायपो केलाय दुरुस्त... त्रुटी
टायपो केलाय दुरुस्त...
त्रुटी आढळल्यास सांगावे...
दै.दिव्य मराठी औरंगाबाद
दै.दिव्य मराठी औरंगाबाद आवृत्तीत ही कविता प्रकाशित झाली ......
पेपेरात द्यायची होती तर अजून चांगली हवी होती (माझे वै म)
याहून चांगली करण्याचा प्रयत्न
याहून चांगली करण्याचा प्रयत्न अवश्य करु...
सुधारणा मनात असतील तर सांगाव्यात...
धन्यवाद वै.व.कु...
एक शेर आपल्या
एक शेर आपल्या कवितेसाठी,
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो.
धन्यवाद, कन्सर्न पोहोचतोय आपला.
धन्स ,विदिपा !! आपला शेर
धन्स ,विदिपा !!
आपला शेर आवडलाच !
माबोकर सुशांतरावांचा एक दुष्काळी शेर आठवला...
धरणीस पाहुनीया बिजलीस मोह होतो
पण मोल मातीचे या मेघा कसे कळेना ?