वऱ्हाडी बोली भाषेत लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न.......
वारे देवा तुया न्याय बडा न्यारा
गरीब तुले टोचे अन पैसेवाला प्यारा
गरीबाले खायले अन्न नाही पुरे
अन थो आपली तिजोरी सोन्यानं भरे
गरीबाच पोरगं शेतामंदी राबे
श्रीमंताच पोर पाय एसी मंदी झोपे
गरीबाची झोळी.. दिली गड्डे करून
अन पैसेवाल्यापाशी झोळ्याच झोळ्या भरून
गरीब बिच्चारा काट्यात बिना पायताणं फिरे
पैसेवाल्याच्या गळ्यात सोनसाखळी अन हिरे
देवा तुले असा लय पुळका त्याईचा
गरीबांकडं लक्ष द्यायले वेळ न्हाई जरासा
त्यायले दे भरून मले न्हाई वाद
पण इकडे बी मरेपर्यंत पाहू नको वाट
खूप नाही मांगत आर स्वाभिमानानं जगतो
हाथ ठेव डोक्शावर बसं एवढंच तुले मागतो
त्यायले दिले भरून मले दे वरून
पाउस पाड बेताचा अन पिकं दे भरून
पोट भरण लोकायचं अन मी पोटान खाईन
इतकं दिलं तरी देवा मी सुखानं र्हाइन
इतकं दिलं तरी देवा मी सुखानं रहाइन !!
खुप दिवसान्नी ही भाषा वाचलि.
खुप दिवसान्नी ही भाषा वाचलि. गाड्गेबाबा आठवले.मस्त मयी
Thnx
Thnx![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
मस्त
मस्त
तृष्णा, डॉ.कैलास गायकवाड
तृष्णा, डॉ.कैलास गायकवाड ...धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काही कडवी खूपच आवडलीत.
काही कडवी खूपच आवडलीत.
एकंदर प्रभावी आहे
एकंदर प्रभावी आहे कविता
आवडली
खूप सूंदर बहीणाबाई ची आथवण
खूप सूंदर
बहीणाबाई ची आथवण झाली.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहीणाबाई म्हणजे वर्हाडातलं
बहीणाबाई म्हणजे वर्हाडातलं दैवतच ...त्यांची सर शक्यच नाही...पण हा छोटासा प्रयत्न...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर...
सुंदर...
अगदी मनापासून आलेली रचना...
अगदी मनापासून आलेली रचना... आवडेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान!
खूप छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
खूप सुंदर
खूप सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी लिवली कविता. राजेतुम्ही
भारी लिवली कविता. राजेतुम्ही 7