Submitted by पुरंदरे शशांक on 3 March, 2013 - 22:12
तगमग
देणे पावसाचे कसे
वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे
गेले पार बिथरून
मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार
पडे पाऊस जोरात,
आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही,
मन काळोखी नहात
पडे पाऊस पाऊस
जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत,
डोह पुरा डहुळला........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे अवांतर : पाऊस हा
छान आहे
अवांतर : पाऊस हा तुमचा आवडता विषय दिसतोय .............
कविता आवडली.
कविता आवडली.
मस्त एकदम डहुळला शब्दाचा अर्थ
मस्त एकदम
डहुळला शब्दाचा अर्थ कळु शकेल काय?
सुंदर वातावरण
सुंदर वातावरण निर्मीती.
आवडली.
आवडली . पावसात होणारी वाताहत
आवडली . पावसात होणारी वाताहत आणि त्यातून व्यक्त झालेलं कारूण्य स्पर्शून गेलं .
डहुळला शब्दाचा अर्थ कळु शकेल
डहुळला शब्दाचा अर्थ कळु शकेल काय? >>> ढवळला जाणे, ढवळून निघणे...
पाऊस एक निमित्त आहे, पावसाने मन प्रफुल्लित होण्याऐवजी मन डोह ढवळुन निघालाय - त्याचं वर्णन चितारायचा प्रयत्न केलाय.....
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर कविता,दोन्ही बाजू छान .
सुंदर कविता,दोन्ही बाजू छान .
साधारणतः वॄक्ष डहुळला म्हणता
साधारणतः वॄक्ष डहुळला म्हणता येईल. असे मला वाटते डोहासाठी ओथंबुन वाहु लागला असे होऊ शकते !
सुंदर कविता,पण या ऋतूची नाही
सुंदर कविता,पण या ऋतूची नाही हे जाणवलं ही पुनः आषाढात वर काढली पाहिजे..
सुन्दर कविता
सुन्दर कविता
शशांक, मी कालपासून बरेचदा
शशांक,
मी कालपासून बरेचदा वाचली ही कविता.... आवडत गेली... सुंदर जमलीये!!
शेवट खास झालाय... पाऊस पडून गेल्यावर, ती रिपरिप सर्वशांत झाल्यावरही कोठलीतरी रूखरूख नेहमीच अनुभवली आहे, ती तू अगदी चिमटीत पकडलीस शेवटाच्या दोन ओळींमध्ये....
परिणामकारक कविता... फील खास!!!
मजा आया....
वाह..
वाह..
अरे.. काय मस्तं कविता. अगदी
अरे.. काय मस्तं कविता.
अगदी सुरुवातीपासून भिनत गेली.... पान पान आठवांचे गेले पार बिथरून... सुंदर.
पडे पाऊस पाऊस जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत, डोह पुरा डहुळला...
अगदी तीरासारखा येऊन खोलवर घुसणारी सर नाही... खरतर पाऊसच किंचित थिरावलाय. हे मनाच्या डोहाचं हल्लकपण.. हळूवार थेंबाथेंबानं शिरशिरणार्या पावसानंही ढवळून निघालेला मनाचा डोह....
बहोत खूब, शशांक.. खरच खूप सुंदर.
थेंब थेंब रुते आत, डोह पुरा
थेंब थेंब रुते आत, डोह पुरा डहुळला>>>> क्या ब्बात
अष्टाक्षरीच्या नेहमीच्या फॉर्ममध्ये का नाही पोस्ट केली... ?
लवकर लय सापडते त्याने असा अनुभव आहे.
पु.ले.शु
थेंब थेंब रुते आत..डोह पुरा
थेंब थेंब रुते आत..डोह पुरा डहुळला
व्वा!, कविता आवडली.
व्वा! अगदी डोळ्यासमोर उभा
व्वा! अगदी डोळ्यासमोर उभा राहिला पाऊस.
छान कविता. "मेघ गर्जती
छान कविता.
"मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार" >>>> या ओळी विशेष
शशांकजी, पावसाचा आनंद देणारी
शशांकजी,
पावसाचा आनंद देणारी कविता आवडली !
'तगमग ' वाचून सध्याच्या
'तगमग ' वाचून सध्याच्या हवामानाने होणारी तगमग खू----प कमी झाली
फारच छान वाटले.
कविता खूप आवडली, भिनत गेली.
कविता खूप आवडली, भिनत गेली.
वाह वा! आवडली कविता
वाह वा!
आवडली कविता
सर्वांचे मनापासून आभार ....
सर्वांचे मनापासून आभार ....