पाखराना कोणतीही जात नाही

Submitted by SADANAND BENDRE on 3 March, 2013 - 08:30

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही

पाडल्या भिंती मठाच्या काल कोणी
खंत एकच, त्यात माझा हात नाही

घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही

मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही

कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही

हात हाती घेउनी चालू जरासे
मंझिलावर पोचणे हातात नाही

खंजिराला पाठ द्यावी मी खुषीने
एवढा विश्वास या नात्यात नाही

दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही

पाळतो बेशिस्तही शिस्तीत थोडी
वर्ज्य जे त्याच्याविना मी गात नाही

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही>>> मस्त

स्वागत आहे सदानंद... येत रहा , लिहीत रहा.

पाडल्या भिंती मठाच्या काल कोणी
खंत एकच, त्यात माझा हात नाही<<< सुंदर >>>

घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही << व्वा ! >>

खूप आवडली गझल

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही

मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही

कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही

खंजिराला पाठ द्यावी मी खुषीने
एवढा विश्वास या नात्यात नाही

पाळतो बेशिस्तही शिस्तीत थोडी
वर्ज्य जे त्याच्याविना मी गात नाही

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही

>>>> ह्यांपैकी कुठला शेर सर्वाधिक आवडला, हे ठरवणे अशक्य आहे !!

____/\____

हॅट्स ऑफ सदा भाऊ ! अ‍ॅण्ड वेल्कम टू द क्लब !!

--------------------------------

अनामिक गझलवेडांचा देवपूरकरी तडका दुर्लक्षित करावा.

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही kay lihilay aratim

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही ha sher tar out of.......shabd nahit....dole panavalet maze

कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही sundar
हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही kya bat hai

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही...भन्नाट मतला

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही..... वा वा !

दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही...क्या बात!

सुस्वागतम! Happy

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही

कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही

<< क्या बात !!

वा.....मस्तच !!
संपूर्ण गझल आवडली !
खात, गात, बात......... हे तीन शेर सगळ्यात जास्त आवडले !!

पूर्ण गझल आवडली पण त्यातलाही

मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही... >>> हा शेर आवडला. Happy

Pages