Submitted by SADANAND BENDRE on 3 March, 2013 - 08:30
पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही
वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही
पाडल्या भिंती मठाच्या काल कोणी
खंत एकच, त्यात माझा हात नाही
घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही
मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही
कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही
हात हाती घेउनी चालू जरासे
मंझिलावर पोचणे हातात नाही
खंजिराला पाठ द्यावी मी खुषीने
एवढा विश्वास या नात्यात नाही
दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही
पाळतो बेशिस्तही शिस्तीत थोडी
वर्ज्य जे त्याच्याविना मी गात नाही
हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
क्लास
क्लास
भरत मयेकर | 4 March, 2013 -
भरत मयेकर | 4 March, 2013 - 07:23
छान आहे, आवडली
<<<
आणि
भरत मयेकर | 22 December, 2013 - 11:25
क्लास
<<<
नऊ महिन्यात पडलेला अभिरुची फरक कशाला अॅट्रिब्यूट करता येईल?

वा, वा, वा! You always
वा, वा, वा!
You always excel....!
सहीच्......जबरि आहे
सहीच्......जबरि आहे अगदी........आवडली
पुन्हा वाचली. फार आवडली !
पुन्हा वाचली. फार आवडली !
पाखरांना कोणतीही जात
पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही
घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही
कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही
दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही
व्वा!
अप्रतिम !
अप्रतिम !
पाखरांना कोणतीही जात
पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही
वा! सुंदर मत्ला. 'जातीचे कुंपण' कुठवर असू शकते?
वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही
वा! देव दगडात नाही तर अंतःकरणात असतो. छान.
पाडल्या भिंती मठाच्या काल कोणी
खंत एकच, त्यात माझा हात नाही
कशाला मठ आणि मठाधिपती हवेत?
घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही
द्वीपदी फारशी समजलीच नाही.
मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही
वा! शेवटी स्वर्ग पाहिलायच कुणी? जो काही स्वर्ग नरक आहे तो इथेच आहे.
कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही
खयाल चांगला आहे. शब्दयोजना थोडी बोचली. 'दे नवे' नंतर स्वल्पविराम हवा. 'काही शिळे' जरा विचित्र वाटले.
हात हाती घेउनी चालू जरासे
मंझिलावर पोचणे हातात नाही
मंझिलावर? प्रथमच ऐकतोय हा शब्द. दुसरा चपखल मराठी शब्द जास्त भावला असता.
खंजिराला पाठ द्यावी मी खुषीने
एवढा विश्वास या नात्यात नाही
कमालीची नाट्यमयता. खूप आवडला!
दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही
व्वा! खूप चांगला खयाल आणि शब्दसुद्धा!
पाळतो बेशिस्तही शिस्तीत थोडी
वर्ज्य जे त्याच्याविना मी गात नाही
समजला नाही!
हुंदका ऐकून माझा ते म्हणाले
छान आहे पण तरी ती बात नाही
कदाचित असे हवे...
हुंदका ऐकून माझा ते म्हणाले,
'छान आहे; पण तरी ती बात नाही'!
द्वीपदी आवडली!
एकंदरीत गज़ल खूप आवडली!
अफलातून गझल!! नेहमी प्रमाणेच
अफलातून गझल!! नेहमी प्रमाणेच .... प्रत्येक शेर ... अक्षरश: प्रत्येक शेर अस्सल आहे. नेहमीच इतकं कसं अफाट लिहू शकता यावर संशोधन व्हायला पाहिजे ...

Pages