नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगलदेवाने दिली हो म्हणुन मीही दिली. कोणाला घ्यावे वाटले तर शोधायला जास्त त्रास नको ना. Wink
पुढच्या वेळी (उत्तर आलेच तर) साईट पण देते Proud

त्या चित्राचे नाव आहे : Painting of Mrs Duncan Campbell आर्टिस्ट आहे : Eliza Cooper. Eliza Cooper ही आत्ताच्या काळातील एक अंध अ‍ॅथलीटही आहे. पहिल्या चित्रात ग्रहण आहे. एवढं शोधूनही मला पुस्तकाचं नाव आठवत नाहीये. कुणाला ह्या माहितीची मदत झाली तर ओळखा Happy

व्वा....अभिनंदन भरतजी!! Happy

मी पण ब्रिटीश साम्राज्याला लागलेलं ग्रहण असं काहीसं विचार करत होते. Sad

सह्ही संकल्पना आहे. संयोजक, तुमचा हा उपक्रम अतिशयच आवडला. धन्यवाद. Happy

भरत मयेकर लै चमकत्यात! अभिनंदन, भम. Happy

काळा सूर्य व हॅट घातलेली बाई : कमल देसाई
>> जल्ला.... Happy मी ग्रहणावरून मायबोलीखरेदी फ्लिपकार्ट व तत्सम याच्यावर पुस्तकं शोधत होते. Happy

नोबल प्राईज मिळालेले आहे पुस्तकाला
युध्दावर आधारीत आहे
इंग्लंड चे युध्द अथवा लेखक इंग्लंड मधला आहे ?????????

Pages