दाग अच्छे होते हैं

Submitted by चिखलु on 24 February, 2013 - 22:15

ला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...

चिखलात प्राणी लोळतात, आंघोळ करतात, आणि अंगाला चिखल लावुन घेतात. मला आंघोळ आवडत नाही. प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात. संरक्षणवरुन आठवलं, प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने स्वत:ला चिखल लावून घेतला म्हणून तो प्रिडेटर त्याला पाहू नाही शकला. पण लोकांनी अर्नोल्ड शिवाजीनगरला लक्षात ठेवला आणि चिखलाला विसरले. मग चिखल उतरल्यावर अर्नोल्ड शिवाजीनगरची धुलाई झाली. असो चिखलामुळे असे रक्षण होते. पण तोच चिखल आपल्या अंगाला लागला की आईचा मार मिळतो. आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत. म्हणुन मला देवपण नाय आवडत. पण मी मंदिरात जातो, तिथे प्रसाद मिळतो आणि घंटा पण वाजवायला मिळते. घंटेचा आवाज मस्त येतो. पण कानाखाली आवाज आला की कान लाल होतो. लाल रंग मला आवडतो. मला रंग खेळायलाही आवडतं. मला होळीही आवडते. होळीत चिखलात माखायला आवडतं. पण मग डाग पडतात कपड्यांवर. आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेल आवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही. आईला कोणीतरी सांगा रे की दाग अच्छे होते हैं

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने स्वत:ला चिखल लावून घेतला >>>>

आपला देसी 'नायक' विसरला भौ

छान लिहिलंयत. चिखलाची महती सर्व जगाला कळायलाच हवी.

हल्ली तर स्पा मध्ये भरपूर पैसे देऊन अंगाला चिखल थापून बसवतात. मृत समुद्रातला चिखल अतिशय गुणकारी आहे म्हणे. त्याचे तर दामदुप्पट पैसे मोजावे लागतात.

अक्षयकुमार, आणि मिस रेखा गणेशन, यांनी सबसे बडा खिलाडी ( किंवा असेच काहितरी ) नावाच्या चित्रपटात, चिखलात लोळणफुगडी नामक नाच केला होता... ते नै आठवलं ?

थोडक्यात काय तर चिखल्याला गर्लफ्रेंड नाही खो खो
>>> Wink

<<<<पण जर्रा अजुन वाढवले असते तर अजुन मझा आला असता

>>>म्हणजे अगदी गढूळ पाणी होईतोवर नाही पण चिखलात अजून पाणी घाला की (लेख लांबवा अजून)
>>> >>> वॉव... Happy

आयशॉटची आठवण आली स्मित
>> म्हण्जे काय?

आपला देसी 'नायक' विसरला भौ
चिखलात लोळणफुगडी नामक नाच केला होता... ते नै आठवलं ?
>>> ह्म्म, सगळे वाक्य एका साखळीसारखे आहेत, जेवढे लिंक करता आले तेवढे केले....

चिखलाची महती सर्व जगाला कळायलाच हवी.
>> Happy आणि चिखल्याचीही

चिखल्या, भारी जमलाय संज्ञाप्रवाह! हाहा
>>> धन्स

Rofl Rofl

Rofl Rofl

Rofl Rofl

वाह चिखल्या वाह
मनापासून लिहिलय्स अत्युत्तम लिहिलय्स

अजून येवूद्या !!!!

पु.ले. .... खूप खूप शु. मित्रा
Happy
खूप हसलो अगदी डोळ्यात पाणी आलय................

चिखल्या
मी "गुंतागुंत" मध्ये चिखल वापरला म्हणून तू चिखलाचीच गुंतागुंत केलीस? Wink

बादवे.. मजा आली वाचताना Lol

अवांतर : यह आयशॉट नही जानता? (PSPO च्या चालीवर) Wink

मस्त लिहिलंय !

हे माझे अजून तिन पैसे ....

चिखलातून वेगाने गाडी गेली की बाजूने चालणार्‍या पादचार्‍यांच्या कपड्यांवर नक्षी उठते. Proud
चिखलात उठलेली गाडीच्या टायरांची नक्षी मला आवडते. Happy
पाउस निघून गेल्यावर उन्हाने वाळलेल्या चिखलाच्या भेगांमुळे जमिनीवर मस्त अ‍ॅब्स्टॅक्ट चित्र बनते. Lol

लिखाण मस्तच ! एक ऑगस्ट हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस आम्ही " जस चिखलात कमळ उगवत तस चिखली या गावात लोकमान्य जन्मले" हा घिसापिटा वाक्यप्रयोग २५ भाषणांपैकी १५ मुलांच्या भाषणात असायचाच. त्याशिवाय शेंगा आणि टरफले.