Submitted by हर्षल_चव्हाण on 22 February, 2013 - 03:44
ह्या गझलेचा तिसरा शेर 'आनंदयात्री'च्या सल्ल्याने वृत्त सांभाळून, बदलून लिहिला, त्यामुळे त्याचे धन्यवाद
निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...
सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)
छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...
सुकेल बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...
जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...
पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना? हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा
वा वा
अहाहा मस्त एकेक शेर मस्त
अहाहा मस्त एकेक शेर मस्त
सुने तुझ्याविना>>> व ....इथेच यायचेय ना>>> या ओळीं मुळे ते ते शेर जरा कमी आवडले
बाकी भन्नाट आवडले
एक बदल सुचलाय.... ....पण नकोच !!!
(देवपूरकरांमुळे सवय लागलीये हो ...बाकी काही नाही :अरेरे:)
इथेच यायचेय ना>>> या वरून माझा एक शेर आठवला......
रडूच वाटतेय ना ....हसून का बघायचे
सरळ निघून जायचे वळून का बघायचे
पुनःप्रत्ययाबद्दल धन्स
फार छान गझल केलीत त्यासाठीही धन्स
पुरे मनात आसवांस ढाळणे, इथेच
पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना? हसून जा...
हर्षलः प्रोग्रेस जाणवतोय.
गझल आवडली.
सुंदर
सुंदर
Waa! Progress ahe.. Keep it
Waa! Progress ahe.. Keep it up
छान जमलेय. शेवटचे दोन शेर
छान जमलेय.
शेवटचे दोन शेर सर्वात आवडले.
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद
मस्त...
मस्त...
एकदम मस्त...........
एकदम मस्त...........
धन्स कैलासजी आणि झंकार
धन्स कैलासजी आणि झंकार
मस्त मस्त ! संपूर्ण गझल आवडली
मस्त मस्त !
संपूर्ण गझल आवडली .
धन्स राजीव
धन्स राजीव
सुकेल बाग ही तुझ्या विना,
सुकेल बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा.......... हा शेर खूप आवडला
देवपूरकरांमुळे सवय लागलीये हो
देवपूरकरांमुळे सवय लागलीये हो ...बाकी काही नाही<
<<<<<<<<<<<<<
वैभ्या, आता समजले तुला अशी अवधाने रोज का येतात ते!
आमच्या जुन्नरच्या आजीच्या तोंडात नेहमी एक म्हण असायची.........काय माहिती आहे?
नग नग म्हण अन् पायलीच लाग!
तसे तुझे आहे बघ!
नाव आमचे घेतोस आणि तुझे फुटकळ शेर(थट्टेने म्हणतोय रे बाबा.....तू छान लिहितोस) पुढे सरकवतोस काय रे?
आवडते तर सगळे मग नाक का मुरडतोस असा?
हर्षल छान गझल
हर्षल छान गझल आहे!
अभिनंदन!
आमचाही चिंतनात्मक प्रतिसाद (सुझाव) लवकरच येत आहे तुझ्या या गझलेवर.......
जयश्रीजी, सतिशजी :
जयश्रीजी, सतिशजी : प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सतिशजी : प्रतिसाद म्हणून नवीन पर्यायी गझल सुचवणार असाल तर, ती नवीन पोस्ट म्हणूनच टाका माबोवर. मी वाचेन
८व्यां दा वाचलीच...........
८व्यां दा वाचलीच........... ८व्यां दा आवडलीच................ आधीपेक्षा जास्तच
धन्यवाद वैभव
धन्यवाद वैभव