( माझी बेछूट सम'शेर')

Submitted by प्राजु on 19 February, 2013 - 02:45

तुला पाहता गोठ्यामध्ये म्हैस कशी रे हंबरते
तुला ढोसण्या शिंगानी ती जणू अंतरी थरथरते

शब्द शब्द उमलून अचानक तुझी गझल ही फ़ुरफ़ुरते
असे वाटते अहंपणाचे मूर्ख स्तुती-वन दरवळते
.........................................................................

नकोनकोत्या शुंभपणाच्या खुणा वाहती वार्‍यावर
पान पान थरथरे वहीचे, तरिहि लिहितो कोर्‍यावर
.........................................................................

अजूनही 'माबो'त येथल्या वास तुझा बघ भळभळतो
अजूनही का हरेक व्यक्ती अशाचसाठी हळहळतो??
.........................................................................

असाच केव्हा गझलकार मग जातो तुजला सांगाया
जिथे चालले 'मी-मी' केवळ, स्वत:स जातो टांगाया
.........................................................................

--------प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्स्फुर्ततेमुळे ?????????

अजून एक दरिद्री विनोद!<<< Rofl

सर्व स्मायलीज <<< Rofl Rofl

प्राजक्ता,
केव्हातरी असं व्यक्त व्हायला हरकत नाही.
कितीही नाही म्हटलं तरी बर्‍याचदा बरेच लोक कुठल्या ना कुठल्या मार्गाने असंतोष व्यक्त करतातच.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
“जे केलं ते माझ्या खर्याखुर्या आय्डी ने केलं.. उगाच वेगळे बुरखे पांघरुन नाही केलं.” >>>
बरोबर आहे. पूर्ण अनुमोदन. तुमच्या हिम्मतीला दाद.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तरीही एक सांगावसं वाटतं :
कुठेतरी हे थांबलं पाहिजे.
अनुल्लेख हा मार्ग सर्वात चांगला वाटतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

कुणी? कुणाचा? हसावे की रडावे ते कळेना!>>>>
तसेही रतिबातून रडतच असता तुम्ही. फॉर अ चेंज हसून घ्या. Wink


mall दिसला, ज्यामुळेच अनावर झालेली दिसतेय ही काव्याची(?) उलटी!

ओफ्फो.... मराठी सुद्धा वाचता येईना नीट तुम्हाला.

समशेर......सव्वाशेर.......पावशेर............अरे वा छान आहेत की, यमके.............
येस्स !! लागा कामाला. उद्या पर्यंत तयार करुन ठेवा.

@ उल्हास काका,
नेहमीच अनुल्लेख कामी येत नाही. अश्याने त्या माणसाला आपण करतो तेच बरोबर असे वाटू लागते. आणि ते इतरांच्यासाठी घातक असते.. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे मायबोली गझल विभागात.

>>अगदी अवांतर...

डॉक.नी 'कवयत्री' लिहिलं आहे..
वैभूने 'कवियत्री' लिहिलं आहे..
मी 'कवयित्री' असेही वाचलेले आहे

बरोबर कुठले?<<

काय फरक पडतो?? मात्रा ६ च आहेत

पहा मी प्राजुचे समर्थन केले त्यात माझी दूरदृष्टी किती कामी आली ते !!

आता हळूहळू का होईना मी देवसरांशी वागतो ते बरोबरच आहे ते पटेल सर्वाना

(समीरजी विशेष्तः तुम्हाला Happy )

उंदराला मांजर साक्षी!
विनोद कळायलाही बुद्धी लागते हेच खरे!

पहा समीरजी, काय खिलाडू वृत्तीचे झाले मायबोलीकर!

एकेकाची प्रज्ञा व प्रतिभा कशी उचंबळून येते ते!

एकी म्हणाल तर काही विचारायला नको!
आता हळूहळू का होईना मी देवसरांशी वागतो ते बरोबरच आहे ते पटेल सर्वाना <<<<<<<<,
अरे वैभ्या, एकदा म्हणतोस वैभवा म्हणा व एकदा म्हणतोस की तू आमच्याशी वागतोस ते बरोबरच आहे!
असे काय?
तुला अनुमोदने हवीत काय रे, बेट्या?
आपल्या पायावर उभे रहायाला शीक प्रथम म्हणजे अशा दुतोंडी कुबड्या लागायच्या नाहीत तुला!

पहा समीरजी, काय खिलाडू वृत्तीचे झाले मायबोलीकर!>>>>>

अहो मायबोलीकर आहेतच तसे... तुमच्याच उशिरा लक्षात आलं आणि तुमच्याकडे ती वृत्ती नाही म्हणून तुम्ही असे आहात. बरे व्हा बरं लवकर! Proud

आमच्याकडे फक्त गझलवृत्ती आहे बुवा!
आम्ही खरेच बरे झालो तर अनेकांना ते सोसणार नाही!
त्यामुळे आम्ही आहोत तसेच ठीक आहोत!
आम्हाला कुणासारखे वगैरे व्हायचे नाही!
त्यामुळे.............चालले ते ठीक आहे! छान आहे!

कोणत्याही पिंज-याचे भय न मजला;
मज भरारी घ्यायचे वरदान आहे!

आजवर मी फक्त डोळेझाक केली!
पाहिले ना मान की, अवमान आहे!

कोण मी? कोठून आलो? अन् कसा मी?
एक मी अद्यापही अनुमान आहे!

माझियासम फक्त येथे मीच आहे!
मीच उपमा, मीच अन् उपमान आहे!!

............प्रा.सतीश देवपूरकर

उमेश कोठीकर,

काय दोरा, काय कागद, काय रे आवड तुझी?
गझल म्हणजे काय याची सांग व्याख्या तर तुझी!

गंध गझलेचा तुला कळणार कैसा रे कधी?
पहिली ना वाचली तू गझल अस्सलशी कधी!

सारखा अतिसार होतो, काय तू चरतोस रे?
तू तुला सांभाळ आधी, काळजी सोडून दे!

...........प्रा.सतीश देवपूरकर

आम्ही खरेच बरे झालो तर अनेकांना ते सोसणार नाही!>>>>

छे हो... तुम्ही बरे झालात तर खरंच चांगल्या गझला लिहायला लागाल आणि मग मा बो करांची एन्टरटेन्मेंट कशी होणार? सो.. प्लिज प्लिज कीप डुईंग धीस! Proud

@ उमेश.. असं बोलतात का? नाक बंद कर बघू तुझं! Wink

परवाच्या मुशाय-यात चांगल्या गझला ऐकायला मिळाल्या!
अस्सल प्रत्यकारी गझला कशाला म्हणतात हे अनेकांकडून शिकायला मिळाले!
प्रेक्षकांमधे बसलो असल्याने प्रेक्षकांची दाद व चर्चा दोन्ही जवळून ऐकता आल्या व मायबोलीच्या प्रतिसादांची आठवण झाली व फरकही जाणवला!

Pages

Back to top