Submitted by प्राजु on 19 February, 2013 - 02:45
तुला पाहता गोठ्यामध्ये म्हैस कशी रे हंबरते
तुला ढोसण्या शिंगानी ती जणू अंतरी थरथरते
शब्द शब्द उमलून अचानक तुझी गझल ही फ़ुरफ़ुरते
असे वाटते अहंपणाचे मूर्ख स्तुती-वन दरवळते
.........................................................................
नकोनकोत्या शुंभपणाच्या खुणा वाहती वार्यावर
पान पान थरथरे वहीचे, तरिहि लिहितो कोर्यावर
.........................................................................
अजूनही 'माबो'त येथल्या वास तुझा बघ भळभळतो
अजूनही का हरेक व्यक्ती अशाचसाठी हळहळतो??
.........................................................................
असाच केव्हा गझलकार मग जातो तुजला सांगाया
जिथे चालले 'मी-मी' केवळ, स्वत:स जातो टांगाया
.........................................................................
--------प्राजु
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कंडा.........................
कंडा................................!!
(हात-पाय झाडत गडाबडा लोळत हसणारा 'कुप्रसिद्ध' स्मायली!)
बापरे मस्तच
बापरे

मस्तच
प्राजु, हे असले काव्य करु
प्राजु,
हे असले काव्य करु नका प्लीज.
काव्यात त्रागा अथवा थयथयाट नसावा हे सत्य मला बर्याच उशीराने समजले आहे....आणि मराठी साहित्य क्षेत्र ज्या होतकरु कवयत्रींकडे आशेने पहात आहे..त्यात आपणही आहात.... या असल्या काव्याने काहीच साध्य होणार नाही. अनुल्लेख हे हत्यार वापरावे ही नम्र विनंती.
कैलासरावांशी सहमत आहेच, पण
कैलासरावांशी सहमत आहेच, पण उत्स्फुर्ततेमुळे हसूही आले
व्यक्त व्हायच्या तुमच्या
व्यक्त व्हायच्या तुमच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा आदर करून असं म्हणावसं वाटतं की, तुम्ही हे लिहायला जो वेळ घालवलात त्या वेळात काहीतरी बेटर करू शकला असतात.
एकंदरीतच एका व्यक्ति/आयडी/त्याचे प्रतिसाद यांवर कथा, कविता, शेर, ललित लिहून आपण विनाकारण अवास्तव प्रसिद्धी देत आहोत... (त्यायोगे स्वतःही प्रसिद्ध व्हायचा विचार असल्यास भाग निराळा!!)
every publicity is a good publicity म्हणतात.. ते इथे दुर्दैवाने खरं होतंय!! त्यापेक्षा चांगल्याला अधिकाधिक वर कसं आणता येईल हा विचार केलेला बरा!!
क्षमा असावी, पण काही वेळी
क्षमा असावी, पण काही वेळी अत्रे-ष्टाईल अवलंबण्यात वावगे वाटत नाही.
आपल्याला तर आवडले आणि 'पटले'सुद्धा.
आम्ही कोण म्हणूनी काय पुससी?
आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
- केशवसुत
'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?
ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!
काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!
आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!
कवी - प्र. के. अत्रे
ह्म्न! कैलासरावांशी सहमत
ह्म्न!
कैलासरावांशी सहमत प्राजु
-सुप्रिया.
@ नचिकेत, आज खरंच माझ्याकडे
@ नचिकेत,
आज खरंच माझ्याकडे खूप वेळ होता टीपी करायला.. आणि मग "माल' दिसला. सॉरी कुड्न्ट कन्ट्रोल.
@ कैलासदादा,
असं आहे की, ' म्हातारी मेल्याचं दु:ख नाहीये.. काळ सोकावतोय!"
आपल्या अनुल्लेख करण्याला जर चिंतन ,मनन ब्लाह ब्लाह नावे देऊन, त्याला समोरच्याची कमजोरी कोणी समजत असेल तर.. कधीतरी हे असं होणारच ना.
मी जे केलं ते माझ्या खर्याखुर्या आय्डी ने केलं.. उगाच वेगळे बुरखे पांघरुन नाही केलं. आणि मला याबद्दल अजिबात खंत नाहीये.. आय मीन इट!
डॉ. साहेबांशी सहमत पण मलातरी
डॉ. साहेबांशी सहमत
पण मलातरी प्राजुने असे काव्य केले करायला नको होते अस्से काहीच वाटत नाहीये
करू द्या तिला जे करायच्ए ते जे केले ते मनापासून करतेय ना मग असूद्यात
फक्त काय देवपूरकरांनीच हवे ते घाणेरडे शेर प्राजुच्या गझलेवर स्फूट शेर बिनबोभाट करायचे ....प्राजूने का नाही करायचे??
एखाद्दुसरा असा प्रयत्न केलाच तरी तिचे ....तिच्यातील कवियत्रीचे.....तिच्या कवितेचे कवितेचे ...एकूणच मराठी कवितेचे काही नुकसान बिकसान होत नै कै !!
अगदी अवांतर... डॉक.नी
अगदी अवांतर...
डॉक.नी 'कवयत्री' लिहिलं आहे..
वैभूने 'कवियत्री' लिहिलं आहे..
मी 'कवयित्री' असेही वाचलेले आहे
बरोबर कुठले?
कै च्या कै !
कै च्या कै !

शेवटचे
शेवटचे
अगदी अवांतर... डॉक.नी
अगदी अवांतर...
डॉक.नी 'कवयत्री' लिहिलं आहे..
वैभूने 'कवियत्री' लिहिलं आहे..
मी 'कवयित्री' असेही वाचलेलेआहे
बरोबर कुठले?
;-(
मासरूळकर साहेब, मी
मासरूळकर साहेब,
मी प्रामाणिकपणे विचारले होते. ह्या शब्दाची मी अनेक 'व्हर्जन्स' वाचलेली असल्याने माझा खरोखर गोंधळ उडला आहे. ह्यात थट्टा नाही.
कवि कविता तसे मी कवियत्री
कवि कविता तसे मी कवियत्री केले
मलाही नक्की माहीत नाही
हा असला गहन प्रश्न खरेतर देवसराना विचाराय्ला पाय्जेल त्यांच्याकडे तसले शब्दांचे संग्रह आहेत ज्यात एकच शब्द किमान५ प्रकारे लिहून त्याचे किमान १५ अर्थ दिलेले असतात
(अग्निहोत्रींचा )शब्दकोश की काय म्हणे ब्वॉ !!!
कवयित्री असा शब्द आहे
कवयित्री असा शब्द आहे
मला खरे हेच समजत नाही...
मला खरे हेच समजत नाही... डॉकाका, कबूल की काव्यात त्रागा थयथयाट नसावा...
काव्य वा गद्य एक प्रकार आहे मनातले विचार प्रकट करण्याचा, जबाबदार खांदे (साहित्यनिर्मितीतील) असले, म्हणून त्यांनी थोडी टवाळी करूच नये अशा अपेक्षा का... आपल्यातलं कुणी खरोकर गम्मत जम्मतीने काही लिहीत असल्यास ते निव्वळ "खेळकरपणे" न बघितले जाऊन, त्याचा परिणाम सबंध कारकिर्दीशीच कसा बरा लागतो.
नचिकेत,
मिळालेला क्षण क्षण काही चांगलं करण्यासाठी वापरावा, हे खरंय, पण त्यातून कधीतरी 'असाही' विरंगूळा का नको.
आणि हे ही बघ, त्या व्यक्तीने पिडले आहे इतके, की तू म्हणतोस तश्या प्रसिद्धीमुळे 'तो मनुष्य' प्रत्येकाच्या डिसकशन्चा भाग आहे...
तुझ्याही नकळत त्यांचं नाव तू घेतोस. अनुल्लेखाने परिणाम होणार्यातला प्रकार नाही, कधीतरी आवेग ओसरेल अन "पर्याय" (;) ) नाही म्हणून गप्प बसले तरच काहीतरी खरं!
प्राजू

मी मजा घेतली...
रसपचा पहिला प्रतिसादही आवडला
बागेश्री, लिहिण्यासारखं खूप
बागेश्री, लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण राहू दे!
तुमचंही बरोबरच आहे.... यू ऑल कॅरी ऑन... माझी विरंगुळ्याची ठिकाणं वेगळी आहेत
या विषयावरचे हेमाशेपो.
आपल्यातलं कुणी खरोकर गम्मत
आपल्यातलं कुणी खरोकर गम्मत जम्मतीने काही लिहीत असल्यास ते निव्वळ "खेळकरपणे" न बघितले जाऊन, त्याचा परिणाम सबंध कारकिर्दीशीच कसा बरा लागतो.>>>>>
यू गॉट इट बागेश्री!!
बाय द वे... वै व कु.. जस्ट एफ वाय आय... मला कोणी ताई माई आक्का वगैरे काहीही म्हंटल तरी गहिवरून येणे, डोळे दाटून येणे असले काहीही अज्जिब्बात होत नाही. आणि खबरदार माझ्या बाबांचा पुन्हा असा अवमान कराल तर!
ओके सॉरी बाबा (बाबा= श्लेष )
ओके सॉरी बाबा (बाबा= श्लेष
)
मराठी साहित्य क्षेत्रातील
मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरु कवयत्रीं?????????????????
केवढा गंभीर विनोद!

उत्स्फुर्ततेमुळे ?????????
अजून एक दरिद्री विनोद!
कंडा की कंड???????????
वैभू! खबरदार आईबपांचे नाव घेशील तर कुणाच्या!

जस्ट चिलपिल देवपूरकर (आजकाल
जस्ट चिलपिल देवपूरकर (आजकाल 'सर' म्हणवत नाही)!
प्राध्यापक साहेबांचा वरील
प्राध्यापक साहेबांचा वरील प्रतिसाद अतीशय घृणास्पद आहे
आपण एका स्त्रीस असे त्रास देणे शोभत नाही
मी या सर्व प्रकाराची निंदा करतो
प्राध्यापक साहेबांच्या वर्तनाचा निषेध !!!!
प्राजक्ता पटवर्धन.... तुमचे
प्राजक्ता पटवर्धन....
तुमचे टोले चांगलेच वर्मी लागलेत की! आता मुरलेले खरे वाचक इथे आले आहेत. गझला आणि गझलकार दोघांचे यथोचित सन्मान केले जातील, याची खात्री असावी. (पण उद्या पासून कारण आमचा अजगर होण्याची वेळ आली आहे.)
>>आज खरंच माझ्याकडे खूप वेळ
>>आज खरंच माझ्याकडे खूप वेळ होता टीपी करायला.. आणि मग "माल' दिसला. सॉरी कुड्न्ट कन्ट्रोल
असं आहे की, ' म्हातारी मेल्याचं दु:ख नाहीये.. काळ सोकावतोय!"<<
सूड घेतलाय तासाभरात जरा वाचा तुमचं अभिनंदन
गझला आणि गझलकार दोघांचे
गझला आणि गझलकार दोघांचे यथोचित सन्मान केले जातील, याची खात्री असावी. >>>>>
हो ?? वाट बघतेय शाल-श्रीफळाची
गजलुमियां! सूड घेतलाय
गजलुमियां!
सूड घेतलाय तासाभरात जरा वाचा तुमचं अभिनंदन
कुणी? कुणाचा? हसावे की रडावे ते कळेना!
"माल' दिसला. सॉरी कुड्न्ट
"माल' दिसला. सॉरी कुड्न्ट कन्ट्रोल
माल दिसला की,
mall दिसला, ज्यामुळेच अनावर झालेली दिसतेय ही काव्याची(?) उलटी!
समशेर......सव्वाशेर.......पाव
समशेर......सव्वाशेर.......पावशेर............अरे वा छान आहेत की, यमके.............
पहा कुणाला अनावर होतय का?
Pages