Submitted by मी मुक्ता.. on 25 October, 2012 - 11:24
हडप्पन, मेसोपोटॅमिअन, सुमेरिअन, मायन..
सिव्हिलायजेशन्स... संस्कृती....
अवशेष गाडले जातात जमिनीत..
काहीच राहत नाही कालातीत...
सगळे जीव भाग बनून राहतात एका संस्कृतीचा..
स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी धडपडणारे,
संस्कृतीचा भाग म्हणून अस्तित्व जपणारे,
काहीच न जाणता जगत जाणारे...
जाणिवपूर्वक संस्कृती जोपासणारे,
आणि तितक्याच जाणिवपूर्वक ती नाकारणारे..
संस्कृतीने पोळलेली आयुष्यं..
संस्कृतीने उजळलेली आयुष्यं..
सगळी तोलली जातात एकाच तराजूत..
तिला नाकारणारे,
झिडकारणारे..
विद्रोही,
त्रासलेले..
अट्टहासाने स्वतःला वेगळे केलेले..
सगळेच नष्ट होतात काळासोबत..
आणि आपण सगळ्यांना ओळखतो
त्या एका संस्कृतीचा भाग म्हणूनच...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
thanks Shumpi...
thanks Shumpi...
सगळी तोलली जातात एकाच
सगळी तोलली जातात एकाच तराजूत..
>>
ह्म्म असे होते खरे.
वा ! सहीये !
वा ! सहीये !
छान अजून जरा खोलवर भाष्य
छान
अजून जरा खोलवर भाष्य करणारी ,अजून जरा चिंतनीय झाली असती
अवल, वैभव... प्रतिसादाबद्दल
अवल, वैभव...
प्रतिसादाबद्दल आभार..
छान.
छान.