फॉल २०१२ - शॅननडोह व्हॅली आणि व्हर्जिनीया कंट्रीसाइड

Submitted by तन्मय शेंडे on 7 February, 2013 - 23:33

२०१२च्या ऑटम सीझन मध्ये फॉल कलर बघायला कुठे जायच, हा खरच मोठा प्रश्न होता. बराच कीस पाडला यावर कारण
- बरेच पर्याय होते फॉल कलर बघायचे (त्यात मला सगळेच बघावेसे वाटत होते Happy )
- बॉस सुट्टी देतोय का नाही.
- आणि बदलणारं फॉल कॅलेंडर (एक-दोन दिवस मागे- पुढे झाले तर झाडांचे खराटे बघायला मिळणार याची भीती)

मग बराच उहापोह करुन हा प्लॅन ठरवला. फॉल उत्तरे कडून दक्षिणे कडे सरकतो, तसच त्याच्या बरोबर आम्ही पण सरकायच ठरवलं. पहिल्या वीकएंडला उत्तरे कडच लेच वर्थ स्टेट पार्क बघायच ठरवलं. हे नायगरा पासुन एक-दिड तासावर आहे.या पार्कला पूर्वेकडची ग्रँड कॅनिअन असं म्हणतात. हे पार्क पण खूप सुंदर आहे. (या बद्द्ल पुढच्या लेखात लिहीन.) दुसर्‍या वीकएंडला 'न्यू जर्सी' मधला फॉल कॅच करायचा आणि तीसर्‍या वीकएंडला खाली म्हणजे दक्षिणे कडची 'शॅननडोह व्हॅली बघायची.

प्रची १: शॅननडोह व्हॅली
SNP_1.jpgप्रची २: शॅननडोह व्हॅलीत प्रवेश केल्या केल्याच टूमदार वेलकम सेंटर लक्ष वेधुन घेतं. इथे जरुर भेट द्यावी...आजुबाजुची आकर्षणं, ट्रेकचे नकाशे इ. माहिती मिळते.
SNP_2.jpgप्रची ३: शॅननडोह व्हॅली १५० मैल उत्तर-दक्षिण अशी पसरली आहे. डोंगर रांगा, घनदाट जंगल,विपुल वन्य संपदा, उत्तम हवामान आणि सगळे डोंगर माथे जोडणारा साधारण १०० मैलाचा sky line drive. या कारणामुळेच National Geographic ने या पार्कचा अमेरिकेतील पहिल्या दहात समावेश केला आहे.
SNP_3.jpgप्रची ४: शॅननडोह व्हॅली ही Great Appalachian Valley चा एक छोटा भाग आहे. Appalachian Valley ही अफाट अशी उत्तर-दक्षिण पसरली आहे. हि इतकी मोठी आहे की या ग्रेट व्हॅलीची सुरवात अप्पर न्यू यॉर्कच्या अ‍ॅंडीरॉक पर्वत रांगांपासुन ते थेट दक्षिणे कडच्या स्मोकीज माऊंटन पर्यन्त.
SNP_4.jpgप्रची ५: ह्या व्हॅलीची निर्मिती हिमालयासारखीच भूगर्भीय प्लेट एकमेकांवर आदळून झालीये पण हिमालयाएवढी उंची गाठली नाही Happy
SNP_5.jpg

शॅननडोह व्हॅली ऐतिहासीकदृष्ट्या महत्वाची आहे. पूर्वी रेड इंडीयन लोकांच्या इथे वस्त्या होत्या. साधारण १६०० साली इंग्रज पहिल्यादा इथे आले. त्याच्या स्थानिकांशी चकमकी झाल्या आणि भारतात केल तस नंतर इंग्रजांनी आपल्या वसाहती वाढवल्या....आणि हो अमेरीकन इंग्लिशचा जन्म इथल्याच दर्‍याखोर्‍यात झालाय.

प्रची ६: The Journey is where Road Never Ends, Feet never stops & eyes never shut.
SNP_6.jpgप्रची ७: जैविकदृष्ट्या देखिल शॅननडोह व्हॅलीला फार महत्व आहे. ६००-७०० वर्षे जुनी १००० फूट उंचीची दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात. अनेक किटक, फुलपाखरे येथे नव्याने सापडली आहेत. बिग मेडोज भागात जैविक प्रयोग शाळा आहे.
SNP_7.jpgप्रची ८: या व्हॅलीत, निसर्गाची हानी न करता राहण्यासाठी सुंदर असे केबिन्स बांधले आहेत, त्यातलेच हे लेव्हिस माऊंटन केबीन. ही स्वस्त असल्याने २-३ महिने आधी बुक करावी लागतात.
SNP_8.jpgप्रची ९: 'स्काय लाईन ड्राईव्ह' म्हणजे क्या बात है !! ताशी ४०-५० कि.मी ने सावकाश गाडी चालवायची, भोवताली सगळीकडेचं निसर्गाची लयलूट बघत जायचं...बराच रस्ता डोंगराच्या कडेकडेने जात असल्याने छानच नेत्रसुख मिळत.
SNP_9.jpgप्रची १०: गाडी चालवताना स्काय लाईनच एक वैशिष्ट्य जाणवलं, सगळ्या दिशांना बरेच व्ह्यु पॉईंट आहेत, त्यामुळे सगळा परिसर बघता येतो. हा रस्ता दोन शहारांना जोडतोच पण निसर्गाला कुशीत घेउन.
SNP_10.jpgप्रची ११: १९३०-३१ साली आलेल्या मंदीची परीणती म्हणजे 'स्काय लाईन ड्राईव्ह'. त्यावेळचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी बेरोजगारांना कामाची संधी म्हणून स्वित्झरलॅण्डच्या धर्तीवर शॅननडोह व्हॅलीत स्काय लाईन ड्राइव्ह बांधण्याचा नारळ फोडला.त्यामुळे हजारो लो़कांना रोजगार मिळाला, रस्ता बांधणार्‍यांत बरेचं सैनिक होते.
SNP_11.jpgप्रची १२ : स्काय लाईन ड्राईव्हवर छोटा बोगदा आहे...माळशेजच्या बोगद्याची आठवण देउन गेला.
SNP_12.jpgप्रची १३ : शॅननडोह व्हॅली आणि स्काय लाईन ड्राइव्ह परिसर बर्‍यापैकी बघुन झाला होता. व्हर्जीनीया कंट्री साईड बघायला खाली उतरलो.
SNP_13.jpgप्रची १४ : "Take Me Home, West Virginia" हे गाण खरोखरच अनुभवलं.... Happy
SNP_14.jpgप्रची १५ : वाटेत बरीच कुरणं होती, त्यावर छान पैकी मशिनने कापलेले सम आकाराचे गवताचे रोल सर्वदूर पसरले होते.
SNP_15.jpgप्रची १६ : Roll Of Hay चा क्लोझअप घेतल्या वाचुन रहावलं नाही....
SNP_16.jpgप्रची १७ : काही कुरणांवर गाई चरत होत्या.
SNP_17.jpgप्रची १८: आजुबाजुला दिसणारी घरं देखिल अगदी चित्रातली वाटतात.
SNP_18.jpgप्रची १९ : असच शॅननडोह व्हॅलीच्या कुशीत असलेलं अजुन एक घर.
SNP_19.jpgप्रची २० :
ट्रिप संपल्यानंतर स्वप्नात परत एकदा शॅननडोह व्हॅलीत जाउन आलो, आपल एक घर आहे, पुढे हिरवगार लॉन, मागे छोटेखानी फार्म आणि अंगणात एक पांढरा घोडा.
SNP_20.jpg

शॅननडोह व्हॅलीतल्या दुसर्‍या दिवशी "ओल्ड रॅग माउंटन ट्रेक" केला होता. त्याची माहिती आनि प्रची माबोवर प्रकाशित केलीये.
http://www.maayboli.com/node/40544

धन्यवाद,
तन्मय शेंडे

फेसबूकचं पान- https://www.facebook.com/Tanmay.Photography
फ्लिकर - http://www.flickr.com/photos/tanmay_photography/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खत्तरनाकच Happy सगळेच प्रचि एकसे एक आहेत. १४ आणि २० फार आवडले.
काय सुंदर कलर्स आहेत, वर्जिनिया, कुरणं, शॅननडोह व्हॅली... धन्यवाद तन्मय.

मस्त, सुबक, आखीव्-रेखीव निसर्गचित्रे....४, १३, १४, १६ विशेष आवडले...शेवट्चे कॉम्पोझिशन चांगले आहे, पोस्ट प्रोसेसिंगमधे गंडलंय असे वाटते...:)

अजून निसर्गचित्रण बघायला आवडेल...:)

आहाहा!!किती पिक्चरस्क!!!!!!!!!!!! खरंच अमेझिंग निसर्ग!!

दे ख णं! आणि काही बोलायला शब्दच नाहीत. >>>> +१०००...

फोटोग्राफी व शब्दलाघव मस्त आहे रे तुझे ......

तन्मय.. फोटो छानच आहेत.

हा ११० मैलांचा स्कायलाइन ड्राइव्ह तु असाच दक्षिणेकडे पुढे चालु ठेवलास तर तु ब्लु रिज पार्कवे वर आला असतास. २००९ च्या फॉल मधे आम्ही गॅटलिनबर्ग टेनेसी पासुन स्मोकि माउंटन नॅशनल पार्क मधुन ..चेरकी नॉर्थ कॅरोलायना ला गेलो व तिथुन हा ब्लु रिज पार्कवे सुरु होतो. तिथुन जवळजळ ३९४ मैल हा रस्ता संपुर्ण अ‍ॅपेलेशियन माउंटन रेंजचा भाग असलेल्या ब्लु रिज माउंटन रेंजच्या रिज वरुन उत्तरेला जातो व शॅननडोहा नॅशनल पार्कमधुन जाणार्‍या स्कायलाइन ड्राइव्हला जाउन मिळतो.. आम्ही २ दिवस या अप्रतिम रस्त्यावर निसर्गाचा आनंद लुटत ड्राइव्ह केले. काय त्या रस्त्यावरच्या दोन्ही बाजुच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करावे?व काय त्या फॉल कलर्सची उधळण.. एक अविस्मरणिय अनुभव!

हा संपुर्ण स्कायलाइन ड्राइव्ह व ब्लु रिज पार्कवे (टोटल जवळजवळ ५०० मैल) असा बांधला आहे की त्यावर ड्राइव्ह करत असताना तुम्हाला सिव्हिलायझेशनची चाहुलही लागणार नाही! रस्त्याच्या दोन्ही बाजुला डोंगरांच्या रांगा व त्यात तरंगणारे ढग! ते कमी की काय म्हणुन सबंध ४०० मैलभर आजुबाजुला ब्लु स्मोकि हेज!( म्हणुन तर या रस्त्याच्या दोन्ही बाजुला पसरलेल्या पर्वतराशीला ब्लु रिज माउंटन्स असे म्हणतात व या रस्त्याला ब्लु रिज पार्कवे असे म्हणतात)

या अप्रतिम ५०० मैलाच्या रस्ताबांधणीबद्दल अजुन एक दोन रंजक गोष्टी...

तु म्हणालास ते बरोबर आहे की हा रस्ता १९३० च्या मंदी च्या वेळेला लोकांना रोजगार मिळावा म्हणुन बांधायचा ठरवले. पण डोंगर राशीच्या रिजवरुन.. वर खाली जाणारा हा ५०० मैलांचा रस्ता पुर्ण करायला १९८४ साल उजाडले ! बहुतेक भाग पुर्ण कधीच झाला होता पण नॉर्थ कॅरोलायना मधला ग्रँड फादर माउंटन मधला एक टप्पा एवढा अवघड होता की तिथे एक व्हायाडक्ट बांधला तरच त्या डोंगरातुन रस्ता शक्य होता पण तसा व्हायडक्ट बांधायची टेक्नॉलॉजी १९८४ मधे अस्तित्वात आली व १९८४ मधे या रस्त्यावरचा फेमस "लिनकोव्ह व्हायाडक्ट" बांधला गेला व हा रस्ता उत्तर दक्षिण पुर्ण झाला.

दुसरी व अतिशय जाणुन घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या रस्त्याचे काम ज्या अभियंत्याकडे सोपवले त्याने हा प्रॉजेक्ट सुरु करताना त्याच्या हाताखाली या रस्त्यावर काम करणार्‍या सगळ्या माणसांना काम सुरु करायच्या आधी खालील गोष्ट समजावुन सांगीतली की...

" आपल्याला हे काम करताना याचे भान ठेवले पाहीजे की आपण नुसता एक रस्ता बांधायचे काम करत नाही आहोत तर असा रस्ता बांधणार आहोत की जो रस्ता एका अप्रतिम निसर्गातुन जाणार आहे. या रस्त्यावर आपल्याच पिढीतले नाही तर आपल्या पुढे येणार्‍या अगणित पिढीतली .. निसर्गावर प्रेम करणारी माणसे या निसर्गाचा आनंद लुटायलाच नाही तर निसर्गदेवाने निर्माण केलेल्या या अप्रतिम निसर्गसौंदर्यासमोर नतमस्तक व्हायला या हायवे वरुन येणार आहेत. म्हणुन आपल्यावर एक नैतीक जबाबदारी आहे की आपण हा रस्ता बांधताना असा बांधला पाहीजे की इट मस्ट बि वर्दी ऑफ द कॉ़ज व्हिच पिपल आर गोइंग टु कम टु धिस रोड! आपण असा रस्ता बांधला पाहीजे की या रस्त्यावरुन लोकांना ड्राइव्ह करताना असच वाटल पाहीजे की ते खरोखरच निसर्गदेवालाच साक्षात भेटायलाच चालले आहेत.. चला तर.. सुरु करुयात हा सुंदर रस्ता बांधायला!....:)"

शेवगा, श्री, उदयन , शैलजा , रंगासेठ, लंपन, स_सा, नंद्या, हर्पेन, वर्षू नील, मानुषी , कांदेपोहे, पुरंदरे शशांक, मामी, अनघा, सॅम ,शापित गंधर्व , चिंगी... सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !!

हर्पेन >> अजून निसर्गचित्रण बघायला आवडेल >> नक्की !!

धन्यावाद मुकुंद.

छान माहीती !! स्मोकीज - ब्लु रिज पार्कवे लीस्ट मध्ये टाकलय...स्मोकीज मध्ये उत्तम ट्रेक्स पण आहेत...
बघूया आता कधी जमतय...हे बघायला आठवडा पण पूरणार नाही.

"आपल्याला हे काम करताना याचे भान ठेवले पाहीजे की आपण नुसता एक रस्ता बांधायचे काम करत नाही आहोत तर असा रस्ता बांधणार आहोत की जो रस्ता एका अप्रतिम निसर्गातुन जाणार आहे">> खरय, म्हनूनच हे रस्ते असे बांधले आहेत की सगळ्या दिशांचा व्ह्यू बघायला मिळतो.

सुं द र Happy

Pages