२०१२च्या ऑटम सीझन मध्ये फॉल कलर बघायला कुठे जायच, हा खरच मोठा प्रश्न होता. बराच कीस पाडला यावर कारण
- बरेच पर्याय होते फॉल कलर बघायचे (त्यात मला सगळेच बघावेसे वाटत होते )
- बॉस सुट्टी देतोय का नाही.
- आणि बदलणारं फॉल कॅलेंडर (एक-दोन दिवस मागे- पुढे झाले तर झाडांचे खराटे बघायला मिळणार याची भीती)
मग बराच उहापोह करुन हा प्लॅन ठरवला. फॉल उत्तरे कडून दक्षिणे कडे सरकतो, तसच त्याच्या बरोबर आम्ही पण सरकायच ठरवलं. पहिल्या वीकएंडला उत्तरे कडच लेच वर्थ स्टेट पार्क बघायच ठरवलं. हे नायगरा पासुन एक-दिड तासावर आहे.या पार्कला पूर्वेकडची ग्रँड कॅनिअन असं म्हणतात. हे पार्क पण खूप सुंदर आहे. (या बद्द्ल पुढच्या लेखात लिहीन.) दुसर्या वीकएंडला 'न्यू जर्सी' मधला फॉल कॅच करायचा आणि तीसर्या वीकएंडला खाली म्हणजे दक्षिणे कडची 'शॅननडोह व्हॅली बघायची.
प्रची १: शॅननडोह व्हॅलीप्रची २: शॅननडोह व्हॅलीत प्रवेश केल्या केल्याच टूमदार वेलकम सेंटर लक्ष वेधुन घेतं. इथे जरुर भेट द्यावी...आजुबाजुची आकर्षणं, ट्रेकचे नकाशे इ. माहिती मिळते.
प्रची ३: शॅननडोह व्हॅली १५० मैल उत्तर-दक्षिण अशी पसरली आहे. डोंगर रांगा, घनदाट जंगल,विपुल वन्य संपदा, उत्तम हवामान आणि सगळे डोंगर माथे जोडणारा साधारण १०० मैलाचा sky line drive. या कारणामुळेच National Geographic ने या पार्कचा अमेरिकेतील पहिल्या दहात समावेश केला आहे.
प्रची ४: शॅननडोह व्हॅली ही Great Appalachian Valley चा एक छोटा भाग आहे. Appalachian Valley ही अफाट अशी उत्तर-दक्षिण पसरली आहे. हि इतकी मोठी आहे की या ग्रेट व्हॅलीची सुरवात अप्पर न्यू यॉर्कच्या अॅंडीरॉक पर्वत रांगांपासुन ते थेट दक्षिणे कडच्या स्मोकीज माऊंटन पर्यन्त.
प्रची ५: ह्या व्हॅलीची निर्मिती हिमालयासारखीच भूगर्भीय प्लेट एकमेकांवर आदळून झालीये पण हिमालयाएवढी उंची गाठली नाही
शॅननडोह व्हॅली ऐतिहासीकदृष्ट्या महत्वाची आहे. पूर्वी रेड इंडीयन लोकांच्या इथे वस्त्या होत्या. साधारण १६०० साली इंग्रज पहिल्यादा इथे आले. त्याच्या स्थानिकांशी चकमकी झाल्या आणि भारतात केल तस नंतर इंग्रजांनी आपल्या वसाहती वाढवल्या....आणि हो अमेरीकन इंग्लिशचा जन्म इथल्याच दर्याखोर्यात झालाय.
प्रची ६: The Journey is where Road Never Ends, Feet never stops & eyes never shut.प्रची ७: जैविकदृष्ट्या देखिल शॅननडोह व्हॅलीला फार महत्व आहे. ६००-७०० वर्षे जुनी १००० फूट उंचीची दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात. अनेक किटक, फुलपाखरे येथे नव्याने सापडली आहेत. बिग मेडोज भागात जैविक प्रयोग शाळा आहे.
प्रची ८: या व्हॅलीत, निसर्गाची हानी न करता राहण्यासाठी सुंदर असे केबिन्स बांधले आहेत, त्यातलेच हे लेव्हिस माऊंटन केबीन. ही स्वस्त असल्याने २-३ महिने आधी बुक करावी लागतात.
प्रची ९: 'स्काय लाईन ड्राईव्ह' म्हणजे क्या बात है !! ताशी ४०-५० कि.मी ने सावकाश गाडी चालवायची, भोवताली सगळीकडेचं निसर्गाची लयलूट बघत जायचं...बराच रस्ता डोंगराच्या कडेकडेने जात असल्याने छानच नेत्रसुख मिळत.
प्रची १०: गाडी चालवताना स्काय लाईनच एक वैशिष्ट्य जाणवलं, सगळ्या दिशांना बरेच व्ह्यु पॉईंट आहेत, त्यामुळे सगळा परिसर बघता येतो. हा रस्ता दोन शहारांना जोडतोच पण निसर्गाला कुशीत घेउन.
प्रची ११: १९३०-३१ साली आलेल्या मंदीची परीणती म्हणजे 'स्काय लाईन ड्राईव्ह'. त्यावेळचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी बेरोजगारांना कामाची संधी म्हणून स्वित्झरलॅण्डच्या धर्तीवर शॅननडोह व्हॅलीत स्काय लाईन ड्राइव्ह बांधण्याचा नारळ फोडला.त्यामुळे हजारो लो़कांना रोजगार मिळाला, रस्ता बांधणार्यांत बरेचं सैनिक होते.
प्रची १२ : स्काय लाईन ड्राईव्हवर छोटा बोगदा आहे...माळशेजच्या बोगद्याची आठवण देउन गेला.
प्रची १३ : शॅननडोह व्हॅली आणि स्काय लाईन ड्राइव्ह परिसर बर्यापैकी बघुन झाला होता. व्हर्जीनीया कंट्री साईड बघायला खाली उतरलो.
प्रची १४ : "Take Me Home, West Virginia" हे गाण खरोखरच अनुभवलं....
प्रची १५ : वाटेत बरीच कुरणं होती, त्यावर छान पैकी मशिनने कापलेले सम आकाराचे गवताचे रोल सर्वदूर पसरले होते.
प्रची १६ : Roll Of Hay चा क्लोझअप घेतल्या वाचुन रहावलं नाही....
प्रची १७ : काही कुरणांवर गाई चरत होत्या.
प्रची १८: आजुबाजुला दिसणारी घरं देखिल अगदी चित्रातली वाटतात.
प्रची १९ : असच शॅननडोह व्हॅलीच्या कुशीत असलेलं अजुन एक घर.
प्रची २० :
ट्रिप संपल्यानंतर स्वप्नात परत एकदा शॅननडोह व्हॅलीत जाउन आलो, आपल एक घर आहे, पुढे हिरवगार लॉन, मागे छोटेखानी फार्म आणि अंगणात एक पांढरा घोडा.
शॅननडोह व्हॅलीतल्या दुसर्या दिवशी "ओल्ड रॅग माउंटन ट्रेक" केला होता. त्याची माहिती आनि प्रची माबोवर प्रकाशित केलीये.
http://www.maayboli.com/node/40544
धन्यवाद,
तन्मय शेंडे
फेसबूकचं पान- https://www.facebook.com/Tanmay.Photography
फ्लिकर - http://www.flickr.com/photos/tanmay_photography/
अहा ! काय अप्रतिम फोटो आहेत.
अहा ! काय अप्रतिम फोटो आहेत. मार्को ने म्हटल्या प्रमाणे खरंच पर्यांच्या राज्यातले. मला तो आभाळाच्या कुशितल्या रस्त्याचा आणि स्वप्नातल्या घराचा.. पांढरा घोडा असलेला फोटो फार आवडला.
खुप मस्त फोटोज !! डीसी ला
खुप मस्त फोटोज !! डीसी ला असताना बरेचवेळा या भागात भटकंती केली आहे त्याची आठवण झाली.. फॉल मध्ये शॅननडोहची जास्त मजा येते
मनःपुर्वक धन्यवाद प्रज्ञा,
मनःपुर्वक धन्यवाद प्रज्ञा, कंसराज,सिंडरेला, रोहित, डॅफोडिल्स आणि पारु
फोटोंचं कौतुक करायला शब्दच
फोटोंचं कौतुक करायला शब्दच नाहीत.
वॉव, मस्त फोटो.
वॉव, मस्त फोटो.
दिनेशदा, आऊटडोअर्स
दिनेशदा, आऊटडोअर्स प्रतीक्रियेवद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद !!
कडक आहे यार मस्तच खुप
कडक आहे यार मस्तच खुप आवडल.
फोटोग्राफी जबरदस्त.
फोटोज मस्त मस्त आणि मस्तच...
फोटोज मस्त मस्त आणि मस्तच...
"Take Me Home, West Virginia"
"Take Me Home, West Virginia" हे गाण खरोखरच अनुभवलं...
धन्यवाद मनीष,मंदार आणि
धन्यवाद मनीष,मंदार आणि Yo.Rocks !!
अप्रतिम !!
अप्रतिम !!
मस्त!
मस्त!
Pages