Submitted by श्यामली on 18 January, 2013 - 03:46
इथे न यमुना इथे न गोकुळ
गोपसुतांची इथे न वर्दळ
कसा राहिला भरून अजुनही
वैजयंती ग, तुझाच दरवळ?
कृष्ण कुठे का आता उरला ?
कुणीच नाही त्यास पाहिला
सांग सानिके सूर तुझे हे
आजही असती निर्मळ मंजुळ?
वैजयंती वा असो सानिका
जगा भुलविते तुझी राधिका
युगे लोटली अजुन तरीही
चराचरातुन कृष्णच केवळ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशक्य सुंदर...
अशक्य सुंदर...
अतिशय सुंदर. पहिल्यांदा ऐकली
अतिशय सुंदर. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच फार आवडली होती
( भारतीताईंच्या शब्दांत ) कृष्ण नावाचे कोडे जन्मभर पुरणारे आहे !
सुंदर खूप आवडली.
सुंदर खूप आवडली.
धन्यवाद लोकहो अगो
धन्यवाद लोकहो
अगो
क्या बात है! आवडलीच!
क्या बात है! आवडलीच!
खूपच छान!
खूपच छान!
मस्त कविता दुसर्या कडव्यात
मस्त कविता
दुसर्या कडव्यात "निर्मळ मंजुळ" असा क्रम न घेता, "मंजुळ निर्मळ" असा केल्यास दरवळ, केवळ याच्याशी यमकही होतो तेवढं बदलता आलं तर पहा
सुंदर
सुंदर
सुरेख!
सुरेख!
छान
छान कविता.
-------------------------------------------------------------
अवांतर :
श्यामली,
तुमची ही कविता याआधी ऐकली होती.
ती लिंक इथे देणं शक्य आहे का ?
छान कविता
छान कविता
मस्त !
मस्त !
अहा ! मस्तच.
अहा ! मस्तच.
मस्तच
मस्तच
खूप दिवसांनी एक नवंकोरं
खूप दिवसांनी एक नवंकोरं सुंदरसं कृष्णगीत वाचलं.
पु.ले.शु. श्यामली.
@ अगो, होय,न संपणारा विषय माझ्यासाठी..
श्यामली, अप्रतिम काव्य!
श्यामली, अप्रतिम काव्य!
कृष्णगीत!! >>> वीकनेस !!
कृष्णगीत!!
>>>
वीकनेस !!
व्वा फार आवडली
व्वा
फार आवडली
आवडली .
आवडली .
नाजूक, अलवार. फार्रच आवडली.
नाजूक, अलवार. फार्रच आवडली.
सुंदर कविता, आवडली. मागच्याच
सुंदर कविता, आवडली.
मागच्याच आठवड्यात मथुरा वृंदावन पहाण्याचा योग आला. कृष्णभक्तांची संख्या, इतर कृष्णमंदिरे ( इस्काॅन वालीच नव्हे, देशी), इतर देवीदेवतांची मंदिरे, तेथील स्वच्छता व टापटीपपणा नेहमीच भावलेला असल्याने या दोन ठिकाणातील बकालपणा मनाला खूपच टोचला. तेथील पुजारी केवळ व केवळ salesman ते काम करतात. 'देणगीसाठी सक्ती नाही पण तुम्ही द्याल ही खात्री आहे तर नाव सांगा, लिहून घेतोय' असेच सांगतात. माझ्याबरोबरचे निस्सिम कृष्णभक्तही म्हणाले की येथे येऊन वाईट वाटले व ज्या जागांचे सुंदर रूप वाचन व कल्पनांमुळे मनात बसले होते ते पुसले गेले.
'इथे न यमुना इथे न गोकुळ' वाचल्यावर 'हे नसतानाही दरवळ आहे' हा कवितेतील अर्थ न भासता 'हे नाही म्हणूनच दरवळ आहे' असे वाटले.
आवडली.
आवडली.
मनःपूर्वक धन्यवाद लोकहो
मनःपूर्वक धन्यवाद लोकहो
भिडेकाका, नाही माहित
सोनू, कवितेचा जन्म सार्थकी लागला, तुम्हाला विशेष धन्यवाद
सुंदर कविता
सुंदर कविता
फार म्हणजे फारच छान
फार म्हणजे फारच छान
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम ! सांग सानिके सूर
अप्रतिम !
सांग सानिके सूर तुझे हे (हे च्या जागी का कसा वाटेल ? )