इथे न यमुना इथे न गोकुळ

Submitted by श्यामली on 18 January, 2013 - 03:46

इथे न यमुना इथे न गोकुळ
गोपसुतांची इथे न वर्दळ
कसा राहिला भरून अजुनही
वैजयंती ग, तुझाच दरवळ?

कृष्ण कुठे का आता उरला ?
कुणीच नाही त्यास पाहिला
सांग सानिके सूर तुझे हे
आजही असती निर्मळ मंजुळ?

वैजयंती वा असो सानिका
जगा भुलविते तुझी राधिका
युगे लोटली अजुन तरीही
चराचरातुन कृष्णच केवळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच फार आवडली होती Happy
( भारतीताईंच्या शब्दांत ) कृष्ण नावाचे कोडे जन्मभर पुरणारे आहे !

मस्त कविता Happy

दुसर्‍या कडव्यात "निर्मळ मंजुळ" असा क्रम न घेता, "मंजुळ निर्मळ" असा केल्यास दरवळ, केवळ याच्याशी यमकही होतो Happy तेवढं बदलता आलं तर पहा Happy

छान कविता.
-------------------------------------------------------------
अवांतर :
श्यामली,
तुमची ही कविता याआधी ऐकली होती.
ती लिंक इथे देणं शक्य आहे का ?

खूप दिवसांनी एक नवंकोरं सुंदरसं कृष्णगीत वाचलं.
पु.ले.शु. श्यामली.
@ अगो, होय,न संपणारा विषय माझ्यासाठी..

आवडली .

सुंदर कविता, आवडली.
मागच्याच आठवड्यात मथुरा वृंदावन पहाण्याचा योग आला. कृष्णभक्तांची संख्या, इतर कृष्णमंदिरे ( इस्काॅन वालीच नव्हे, देशी), इतर देवीदेवतांची मंदिरे, तेथील स्वच्छता व टापटीपपणा नेहमीच भावलेला असल्याने या दोन ठिकाणातील बकालपणा मनाला खूपच टोचला. तेथील पुजारी केवळ व केवळ salesman ते काम करतात. 'देणगीसाठी सक्ती नाही पण तुम्ही द्याल ही खात्री आहे तर नाव सांगा, लिहून घेतोय' असेच सांगतात. माझ्याबरोबरचे निस्सिम कृष्णभक्तही म्हणाले की येथे येऊन वाईट वाटले व ज्या जागांचे सुंदर रूप वाचन व कल्पनांमुळे मनात बसले होते ते पुसले गेले.
'इथे न यमुना इथे न गोकुळ' वाचल्यावर 'हे नसतानाही दरवळ आहे' हा कवितेतील अर्थ न भासता 'हे नाही म्हणूनच दरवळ आहे' असे वाटले.

मनःपूर्वक धन्यवाद लोकहो Happy
भिडेकाका, नाही माहित Uhoh

सोनू, कवितेचा जन्म सार्थकी लागला, तुम्हाला विशेष धन्यवाद Happy