हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.
खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.
ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल.
तर मग करायची सुरवात?...
चिमुरी, बरोबर आहे. चिंगी:
चिमुरी, बरोबर आहे.
चिंगी: पेट्रोफिलस टोटूलस
पेट्रिफिकस टोटॅलस?
पेट्रिफिकस टोटॅलस?
पेट्रिफिकस टोटॅलिस?
पेट्रिफिकस टोटॅलिस?
पॅट्रिफिकस टोटॅलस
पॅट्रिफिकस टोटॅलस
उत्तर लिहून पोस्टेपर्यंत बाकी
उत्तर लिहून पोस्टेपर्यंत बाकी ४ पोस्ट्स
स्टनिंग स्पेल? त्यामुळे तो
स्टनिंग स्पेल?
त्यामुळे तो पॅरलाइज होतो , सेम स्पेल डंबलडोअरने पण शेवटी त्याच्यावर वापरला होता.
अय्यो चुकलं की वो.
आता माझा प्रश्नः ग्रिफींडोरची
आता माझा प्रश्नः ग्रिफींडोरची तलवार हॉरक्रक्सना का मारु शकत असते?
थांबा, यू नो हू त्यांचा
थांबा, यू नो हू त्यांचा डेटाबेस स्कॅन करुन अचूक उत्तर इथे देतीलच. मला वाटतं पेट्रिफिकस उत्तर बरोबर आहे.
प्रश्न बरोबर आहे का चिंगी? कारण ग्रिफिंडोरची तलवारच लॉकेट आणि नगिनीचा खातमा करते.
तोच तर प्रश्न आहे असे का
तोच तर प्रश्न आहे असे का होते?
त्या तलवारीत अशी काय शक्ती असते की ज्यामुळे हॉरक्रक्स नष्ट होतात?
सॉरी! मी चुकून नसते असं
सॉरी! मी चुकून नसते असं वाचलं.
Goblin's silver repels
Goblin's silver repels mundane dirt. It absorbs what strengthens it. बॅसिलिस्कचे विष (हॉरक्रक्स नेश्ट कर्न्याचा खात्रीशीर उपाय, एकदा वापरुणच खात्री करा!!) त्या तलवारीने शोषलेले असते म्हणून हॉरक्रक्स नष्ट करू शकते.
वैद्यबुवा आणि अंगठीचा पण. ती डंबलडोरने तलवार वापरूनच नष्ट केली.
बकबीकचं दुसरं नाव काय असतं?
बकबीकचं दुसरं नाव काय असतं?
विदरविंग्ज.
विदरविंग्ज.
मँड्रेक्सची दुसर्या कुंडीत
मँड्रेक्सची दुसर्या कुंडीत लावणी(:फिदी:) करताना काय काळजी घ्यावी?
कान झाकावेत?
कान झाकावेत?
बरोबर. नाहीतर मँड्रेक्सच्या
बरोबर. नाहीतर मँड्रेक्सच्या किंचाळ्यांनी माणूस गचकू शकतो.
पुढचा प्रश्न?
आयला बरोबर आलं की!
आयला बरोबर आलं की! (लिंबुटिंबु समजून प्रश्न विचारला होता का?) मला पुस्तक वाचून १.५ वर्ष झालय त्यामुळे जरा अवघड प्रश्न विचारायची औकात नाही माझी. मी आपले लिंटिं प्रश्न दिसले की पटकन उत्तर टाकतो. प्रश्न तुम्हीच विचारा माते! बाकी यु नो हू, पिशी अबोली मंडळीही फुल्ल टाईम फ्यान दिसतायत! सटासट उत्तर येत असतात.
मला एक प्रश्न पडला आहे. हॅरी
मला एक प्रश्न पडला आहे.
हॅरी आणि त्रिकुटाने टॉटेनहॅम कोर्ट रोडवरच्या रेस्टॉरंटमध्ये डोलोहोव ला सोडून न देता मारले असते तर शेवटच्या युद्धात रीमस वाचला असता का?
सगळ्या वाईट लोकांना रशियन नावं का दिली आहेत बाईंनी?
चमन, हा प्रश्न रॉलिंगबाईंना
चमन,
हा प्रश्न रॉलिंगबाईंना इच्चारला तर जास्त योग्य हुइल.
हो ईब्लिस बरोबर आहे पण आता
हो ईब्लिस बरोबर आहे पण आता काय करणार, फॅन म्हंटलं की असे भावनिक प्रश्न पडणारच.
कुणाला रॉलिंगबाईंचे घटना आणि पात्रांमागचे विचार माहित असतील तर तेही लिहा.
ऊदा बाईंनी पहिल्याने रीमस आणि टाँक्सला जीवदान दिले होते पण आर्थर विजलीसाठी दोघांना मारावे लागले असे त्या म्हणाल्या.
ईमोशनल डोस बहूधा कमी होत असावा म्हणून की काय?
अहो वैद्यबुवा, हॅरी पॉटर जीव
अहो वैद्यबुवा, हॅरी पॉटर जीव की प्राण आहे.. माझ्या मैत्रिणी पुस्तकं लपवून ठेवायच्या माझ्या परीक्षेच्या वेळी..
चमन,रोलिंगबाई फिक्शनला फारच वास्तववादी बनवतात.. आपल्यासारख्या फॅन लोकानी फक्त वाईट वाटून घ्यायचं आवडती पात्रं मारली म्हणून..
अबोली चमन, मी तर म्हणतो मला
अबोली
चमन, मी तर म्हणतो मला त्या भनगडित पडायचच नाही! मी आपला माझ्या अविष्यात रोलिंगबाईंच्या लेखनानी दिलेल्या काही अत्यंत लै भारी आठवणी उराशी कवटाळून त्यांच्या सहाय्यानी माझं उर्वरित आयुष्य घालवेन म्हणतो!
हॅग्रिडच्या आईचे नाव सांगा.
फ्रिड्वुल्फा जायंट असते ती.
फ्रिड्वुल्फा
जायंट असते ती. तीर्थरूप विझार्ड असतात पण त्यांचे नांव नाही कुठेच.
प्रश्न- हॅरी सॉर्टिंग
प्रश्न- हॅरी सॉर्टिंग सेरेमनीला किती वेळा पोहोचू शकत नाही? न पोहोचण्याची कारणं काय काय असतात?
२र्या वर्षी. (डॉबी गेटवे सील
२र्या वर्षी. (डॉबी गेटवे सील करतो आणि हॅरी रॉन कारने येऊन व्हॉम्पिंग विलोवर आदळतात)
६व्या वर्षी. (मालफॉय त्याला पॅरलाइझ करून ट्रेनवरच अडकवून ठेवतो)
उत्तर बरोबर दिल की अनुल्लेख
उत्तर बरोबर दिल की अनुल्लेख करयची शिश्टीम हाय का हितं?
हार तुरे चालतील का इब्लिस?
हार तुरे चालतील का इब्लिस?
उत्तर पूर्णपणे बरोबर नाहिये
उत्तर पूर्णपणे बरोबर नाहिये इब्लिस..म्हणून वाट बघतेय अजून..
आणि उत्तर बरोबर आहे हे पुढचा प्रश्न विचारणार्याला कळलं की झालं..
वैद्यबुवा
तिसर्या वर्षी डेमेंटोजच्या
तिसर्या वर्षी डेमेंटोजच्या हल्ल्यानंतर हॅरीला ट्रेनमधून हॉस्पिटलमध्ये नेतात, तेव्हा सुद्धा हॅरीची सॉर्टींग सेरेमनी चुकते.
आणि स्नेप हेडमास्तर झाल्यावर तो शाळेतच जात नाही, तेव्हापण चुकलेच म्हणायचे की काय. म्हणजे नापास मुलांचे ह्यावर्षीचे गॅदरींगचे कार्यक्रम हुकले म्हणण्यासारखे झाले.
ऊत्तर बरोबर असेल तर माझा
ऊत्तर बरोबर असेल तर माझा प्रश्न
रॉन, नेविल आणि डंबलडोर ह्या तिघांना वोल्डीच्या मृत्यूशी जोडणारी समान गोष्टं कोणती?
Pages