प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक मन
मनात थोडं ओलं काही
बीज कुणाचे रुजेल सहजी
अशी कोवळी जमिन काही
नातं रुजणं, उमलुन येणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतो एक पाट
पुजेचं ताम्हण नी नैवेद्य ताट
रिकामा गाभारा करावा स्वच्छ
सोवळ्या आशेची तेवावी वात
देवाचं येणं, श्रद्धेचं रुजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक घर
भिंती नसल्या तरी चालेल
घरापुढच्या अंगणात
कुणीही येऊन रोप लावेल
घर भरणं, बहर फुलणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
फक्त लागतं एक आभाळ
गद्गदणारं, गुदमरणारं
फक्त एका हाकेसाठी
आतल्या आत आसुसणारं
पाउस पडणं, माती भिजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
प्रेम करणं सोपंच असतं...
सारंच आपसुक घडत असतं...
ठेवावी लागते नजर निर्मळ
फसलं काही तर इथंच फसतं!
मनाची मशागत करायला हवी
पाटाभवती विश्वासाची रांगोळी हवी
घराची कवाडे ठेवावी उघडी
आभाळाला साद तुझी पोचायला हवी
याहून वेगळं खरंच राजा काही काही लागत नसतं...
प्रेम करणं सोपंच असतं...!!!
छान ग!
छान ग!
सुंदरच..
सुंदरच..
सुंदर
सुंदर
सुरेख....
सुरेख....
धन्यवाद!
धन्यवाद!
वा किती सोप्या भाषेत नी सहज
वा किती सोप्या भाषेत नी सहज आहे कविता!
आवड्ली..सोप्पी नि सुंदर
आवड्ली..सोप्पी नि सुंदर
वाह मंत्रमुग्ध वाटले अगदी !
वाह मंत्रमुग्ध वाटले अगदी !
व्वा ! खूपच आवडली ! पण फक्त
व्वा ! खूपच आवडली !
पण फक्त फक्त म्हणता म्हणता बऱ्याच गोष्टी सांगितल्यात . त्या सांगतांना पुनरूक्त झालेलं फक्त वगळता आलं तर बघा .
आग्रह नाहीच .
सर्वांना धन्यवाद! राजीवजी,
सर्वांना धन्यवाद!
राजीवजी, तुमचे म्हणणे पटले. यापुढच्या लेखनात अंमलात आणिन नक्किच. धन्यवाद!
मस्तच!
मस्तच!
छानच... थोड अटोपशीर करता
छानच... थोड अटोपशीर करता यायला हवं फक्त.
धन्यवाद सखी... शामजी...
धन्यवाद सखी... शामजी...