हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा, धाग्याबद्दल धन्यवाद. या निमित्ताने पुन्हा एकदा हॅपॉ वाचायला घ्यावसं वाटतंय. तुम्हा सगळ्यांचा व्यासंग किती दांडगा आहे हे मला माहित आहे. मी लिंबूटिंबू म्हणून इथे येत जाईन.

माझा प्रश्न : ग्रॅफिंडर टॉवरचा (पुस्तकात आलेला) सर्वात पहिला पासवर्ड कोणता?

कॅप्युट ड्रॅकोनिस.

माझा प्रश्नः
(थोडा टिपा लिहा स्वरूपाचा असल्याने सविस्तर उत्तर अपेक्षित आहे. :फिदी:)
सिक्रीट कीपर्सची संकल्पना स्पष्ट करा. ऑर्डरला त्याचे कोणत्या वेळी आणि काय दुष्परिणाम भोगावे लागले?

सिक्रेट कीपर म्हणजे फिडेलस चार्म वापरून प्रोटेक्शन देणारा माणूस .
तो जाणते /अजाणते पणी इतर लोकाना घराचे लोकेशन सांगू शकतो .

ऑर्डरला त्याचे कोणत्या वेळी आणि काय दुष्परिणाम भोगावे लागले?

१. पेटीग्रू पॉटर्स चा सिक्रेट कीपर असताना त्याने ते वॉल्डेमॉर्टला सांगितल्याने त्यांचा म्रूत्यू
२ . हर्मायनीने आपल्या बरोबर एका डेथ ईटर ला आणल्याने त्याना ते घर सोडावे लागले

हॅरीला निषिद्धजंगलातलं पहिलं डिटेंशन कशामुळे मिळतं. त्याच्यासोबत आणखी कोण असतं?
>>> हॅरी, नेविल आणि ड्रॅको मालफॉय. दोघंही पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असूनही भांडणात एकमेकांवर वर्गाबाहेर कर्स टाकत असतात, म्हणून.

हॅरीला निषिद्धजंगलातलं पहिलं डिटेंशन कशामुळे मिळतं. त्याच्यासोबत आणखी कोण असतं?
नेव्हिल, ड्रॅको, हर्मायनी तसेच हॅग्रिड आणि फँग
डिटेंशनचे कारण : रात्री भटकण्याबद्दल
हॅरी आणि हर्मायनी ड्रॅगनच्या पिलाला चार्लीला सोपविण्यासाठी अ‍ॅस्ट्रोनॉमी टॉवरवर जातात. हे गुपित ड्रॅकोला माहीत असल्याने तो त्यांच्या मागावर असतो. हॅरी-हर्मायनीला ड्रॅकोबद्दल वॉर करण्यासाठी नेव्हिल बाहेर येतो. प्रो मॅक्गुनगल ड्रॅको आणि नेव्हिलला पकडतात, तर फिल्च हॅरी आणि हर्मायनीला.

पुस्तकांमधे हॅरीच्या बॅचमधील कोण कोण थेस्ट्राल्स बघू शकत असल्याचा उल्लेख आहे? >>
नेव्हिल लाँगबॉटम.
लूना लवगुड बघू शकायची, पण ती हॅरीच्या बॅचची नव्हती.

हॅपॉचे पंखे त्याच-त्याच प्रश्नांमध्ये गोल-गोल घुमू नयेत म्हणून एक रिकामा उद्योग केलाय Proud
२० प्रश्नांचे संच बनवायचे आणि ती पोस्ट ज्या पानावर असेल त्या पानाचा क्रमांक हेडरमध्ये द्यायचा.
चालेल का ? नको असेल तर उडवून टाकते Happy
(प्रश्न कोणी विचारला त्याचं नाव कंसात लिहिलंय. प्रश्नाचं उत्तर म्हणून ते नाव वाचताना भारी मजा येतेय Lol

१. वुल्फ्स्बेन पोशनचा शोध कुणी लावला? ( पिशी अबोली)
२. पॉलिज्यूस पोशनची गरज नसलेलं आणि शेवटच्या युद्धात कामी आलेलं पात्र कोण? (चमन)
३. तुमचं आवडतं पात्रं कोणतं आणि का? आणि आवडती घटना/प्रसंग कोणता? (चमन)
४. मि. डडलींची कंपनी काय बनवते? (वैद्यबुवा)
५. Daily prophet मधे येणार्‍या dark arts च्या वापराबद्दल येणार्‍या column/section चे नाव काय ? (असामी)
६. ७ पॉटर्स कोण कोण होते ? (केदार जाधव)
७. हर्मायनी क्रीचरकडून कुठले पुस्तक वाचायला घेते? (श्रद्धा)
८. हॉगवर्ट्सच्या चार हाऊसच्या भुतांची नावे सांगा. (नंदिनी)
९. सॉर्टींग हॅटने ग्रिफिंडर म्हणून निवडलेला हॅरीच्या बॅचचा पहिला विद्यार्थी कोण? (युनोहु)
१०. ड्रॅको मॅल्फॉयच्या आजोबांचं नाव काय? ( पिशी अबोली)
११. डंबलडोरांनी शिक्षकाची नोकरी नाकारूनही व्होल्डमार्ट त्याचा एक हॉरक्रक्स त्याच्याच शाळेत लपवून ठेवण्यास कसा यशस्वी होतो? (युनोहु)
१२. ज्युपिटरच्या कुठ्ल्या चन्द्रावर ज्वालामुखी असल्याचं हर्मायनी रॉनला सांगते? ( पिशी अबोली)
१३. मिनिस्ट्रीतल्या घुसखोरीनंतर जखमी रॉनवर हर्मायनी काय उपाय करते? (युनोहु)
१४. बेलाट्रीक्स अझ्काबान मध्ये कुठल्या गुन्ह्यासाठी असते ? (केदार जाधव)
१५. ग्रॅफिंडर टॉवरचा (पुस्तकात आलेला) सर्वात पहिला पासवर्ड कोणता? (मामी)
१६. सिक्रीट कीपर्सची संकल्पना स्पष्ट करा. ऑर्डरला त्याचे कोणत्या वेळी आणि काय दुष्परिणाम भोगावे लागले? (युनोहु)
१७. मॉराडोर मॅप कुणी तयार केला ? त्यांची टोपणनावे सांगा (केदार जाधव)
१८. हॅग्रिड्च्या आधी 'केयर ऑफ मॅजिकल क्रीचर्स' हा विषय कोण शिकवत असे? ( पिशी अबोली)
१९. हॅरीला निषिद्धजंगलातलं पहिलं डिटेंशन कशामुळे मिळतं. त्याच्यासोबत आणखी कोण असतं? (युनोहु)
२०. पुस्तकांमधे हॅरीच्या बॅचमधील कोण कोण थेस्ट्राल्स बघू शकत असल्याचा उल्लेख आहे? ( पिशी अबोली)

माझी सहमती रुणुझुणू..

<<<(प्रश्न कोणी विचारला त्याचं नाव कंसात लिहिलंय. प्रश्नाचं उत्तर म्हणून ते नाव वाचताना भारी मजा येतेय >>> Lol Lol
हे जबरदस्त होतं...

रुणुझुणू, Lol Lol

पुस्तकांमधे हॅरीच्या बॅचमधील कोण कोण थेस्ट्राल्स बघू शकत असल्याचा उल्लेख आहे?
<<< हॅरी, नेव्हिल, थिओडर नॉट.

याव्यतिरिक्त, ल्युना, हॅग्रीड, डंबलडोर या व्यक्तिही थेस्ट्रॉल्सना बघू शकायच्या.

बेलाट्रिक्सच्या नवर्‍याचे नाव काय? (पूर्ण पुस्तकांत बेलाट्रिक्सला नवरा होता हे सांगून त्याला एकही उल्लेख न देता बाईंनी काय साध्य केलं कुणास ठाऊक? त्यापेक्षा ती सिंगल दाखवली अस्ती तर वोल्डी आणि तिचं एक गाणं तरी आलं असतं पिक्चरमधे .. सात समंदर पार मै तेरे पीछे पीछे आ गयी... Lol

Rodolphus.

कमीतकमी ५ NEWT ज्यात 'एक्सीड्स एक्स्पॅक्टेशन्स' ग्रेड असेल. त्यानंतर कॅरॅक्टर आणि अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट.
विषय- ट्रान्स्फिगरेशन, डीएडीए, चार्म्स, पोशन्स

मिसेस फिगच्या ४ मांजरांची नावं सांगा... <<< पोज्, टफी, टिबल्स, स्नोवी

माझा प्रश्न: हॅग्रीडला ड्रॅगॉनचं अंडं कोण, कोठे आणि कोणत्या उद्देशानं देतं? तो उद्देश सफल होतो का? कसा?

हॅग्रिडला ड्रॅगनचं अंडं हूड घातलेला क्विरल देतो. हॉग्ज हेडमध्ये. त्याला फ्लफीचा अडथळा कसा पार करायचा तेवढंच माहीत नसतं. तो हॅग्रिडला विचारतो की असे खतरनाक प्राणी पाळायचा त्याला काही पूर्वानुभव आहे का? त्याच्या उत्तरादाखल हॅग्रिड ते रहस्य त्याला सांगून टाकतो.

Pages