नळातून पडणारं थेंब थेंब पाणी.. त्या थेंबा-थेंबाचा आवाज.. 'ट्रिप्.. टप्..' मला तर फार आवडतो. एक वेगळाच गोडवा जाणवतो त्या आवाजात. पण किती वेळ ? १५-२० मिनिटं.. अर्धा तास.. नंतर मात्र तोच आवाज त्रास द्यायला लागतो. कंटाळा येतो.. च्यायला ! बादली पण भरत नाही, आवाज पण थांबत नाही ! किंवा... एखाद्या अत्यंत गोड बोलणाऱ्या व्यक्तीचं घ्या. सुरुवातीस त्याचं ते मधाळ बोलणं खूप छान वाटतं.. मग मात्र त्या 'गोडबोले'गिरीचा कंटाळा येतो, जरासा रागही.. येतो ना ? तो खोटेपणाही वाटायला लागतो.. हो ना ?
'प्रेमाची गोष्ट' मधली पात्रंही अशीच 'थेंबुडी गोग्गोssड' आहेत. ही पात्रं शेजारच्यांच्या सुनेच्या भावाच्या मुलाला गणितात अपेक्षेपेक्षा २ गुण कमी मिळाले, ह्या कारणासाठीही चिंताक्रांत होतील, इतकी हळवी आहेत. सिनेमाची कहाणी स्वत: दिग्दर्शकाने/ पटकथाकारानेच एकाच दृश्यात सांगितली आहे. कसं असतं... 'A' चं 'C' वर प्रेम असतं.. 'C' मात्र 'A' ला सोडून जातेय. 'B' चं 'A' वर प्रेम आहे. पण 'A' ला ते कळत नाहीये.. आणि हे सगळं अजिबातच माहित नसलेला 'D', 'B' च्या मागे आहे. सर्वसुखकारक शेवट होण्यासाठी कोणाला कोण मिळणार, कोणाला कोण नाही मिळणार आणि कोणाला काहीच नाही मिळणार हे सगळं काही तत्क्षणी समजतं. ह्यातले A, B, C आणि D म्हणजे -
A = राम (अतुल कुलकर्णी)
B = रागिणी (सुलेखा तळवलकर
C = सोनल (सागारिका घाटगे)
D = समीत (अजय पूरकर)
आणि सोबत 'चवीपुरतं मीठ' म्हणून स्वराज (सतीश राजवाडे) - रामचा लंगोटीयार म्हणून.
किंचित सविस्तर -
'राम' हा एक चित्रपटकथा-पटकथा-संवाद लेखक. रागिणी' एक उदयोन्मुख अभिनेत्री, लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात. तसंच, सोनल आणि समीतही अयशस्वी लग्नानंतर वेगळे होतात. 'राम' नावाप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम, सरळमार्गी, समजूतदार वगैरे. त्याची खूप इच्छा असते की तुटणाऱ्या नात्याला अजून एक संधी द्यावी, पण रागिणी मात्र ठाम असते. तसंच, समीतचीही इच्छा असते की सोनलशी सगळं पूर्ववत व्हावं, पण सोनल कंटाळलेली असते. घर सोडून बाहेर पडलेल्या सोनलला 'राम' स्वत:कडे त्याची लेखन सहाय्यक म्हणून नोकरी देतो आणि rest is something OBVIOUS!
सपक संवाद आणि कमजोर पटकथा असल्याने चित्रपट विशेष पकड घेतच नाही. त्यात सागारिका घाटगे तर सहनशक्तीचा अंत पाहते. तिच्या मराठीला 'दिव्य' म्हटलं तर एखादं वृत्तपत्र माझ्यावर अब्रूनुकसानीचा डावा ठोकेल. पण ह्या मेमसाहेब चित्रपटभर पडलेली जिवणी आणि ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा 'ण', 'ण'चा 'न', 'श'चा 'स', 'स'चा श', 'द'चा 'ध', 'ध'चा द', 'म्ह'चा 'म', 'म'चा 'म्ह' करून अत्याचार करतात आणि राग येतो सतीश राजवाडेचा. त्याला तरी कळायला हवं होतं ना? की हिला सरळ दुसऱ्या कुणाचा आवाज तरी देऊन टाकावा. पण त्यापेक्षा सतीशभाऊंवर चित्रपटाच्या रटाळ गतीसाठी चिडायला हवं. अतुल कुलकर्णी स्वत:च्या नावाला जागून, जीव तोडून काम करतो, म्हणून ठीक. जर त्याच्याजागी दुसरा कुणी असता तर ही गोष्ट संपायच्या आधीच, शंभर जणांच्या चित्रपटगृहात बसलेले मोजून १८ जण माझ्यासह उठून बाहेर पडले असते नक्कीच.
संगीत श्रवणीय आहे. खासकरून 'कधी तू..' चा दुसरा भाग 'ओल्या सांजवेळी..'
खरं सांगायचं तर कुणालाच काही विशेष छाप सोडण्याएव्हढा वावच नाहीये, तरी सुलेखा तळवलकर सहज वावरते. सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी अप टू द मार्क.
थोडक्यात, एक प्रचंड लांबवलेली आणि उगाचच (कन्या राशीचे असल्यासारखं) घोळ घालत राहून सांगितलेली अगदीच छोटीशी गोष्ट, म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' अशी एक व्याख्या मी माझ्यापुरती मांडतो.
रेटिंग - २
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-premachi-gosht.html
माई बघितला नाही??? मला
माई बघितला नाही??? मला आशामुळे खुप उत्सुकता आहे. मी बहुतेक पाहणार आहे उद्या.
सतीश राजवाडे म्हटल्यावर
सतीश राजवाडे म्हटल्यावर वाटलेच होते मला की हा सिनेमा फुसका बार असेल
पुणे ५२ आणि प्रे. गो. बघून
पुणे ५२ आणि प्रे. गो. बघून जाम नैराश्य आल्याने मी आज संध्याकाळपर्यंत कुठलाही सिनेमा पाहाणार नाही !
('विश्वरुपम' आणि 'डेव्हिड' खुणावताहेत, नाही तर 'पुढील शुक्रवारपर्यंत' म्हटलं असतं..!
बरीच हवा केली होती या
बरीच हवा केली होती या चित्रपटाची. शेवटी फसलाच म्हणायचा.
मराठी चित्रपटाबद्दल तुम्हाला
मराठी चित्रपटाबद्दल तुम्हाला आकस वगैरे आहे का हो?
पण विश्वरूपम आणि डेव्हिड बघायच्या आधी तुम्ही 'प्रेमाची गोष्ट' पहायचा ठरवलात, त्याअर्थी आकस वगैरे नसावा.
असो. श्रीखंड खायला घेताना ते संपेपर्यंत गोग्गोडच असणार आहे अशी मनाची तयारी करूनच श्रीखंडाची गोडी चाखावी. त्यात मधेमधे घाटगेबाईंच्या खवट चारोळ्या आल्या तर फारसा दोष देऊ नये, चारोळ्याच त्या, बेभरवशी!
मी बघणार आहे हा चित्रपट, सुलेखा तळवलकरसाठी, अतुल कुलकर्णीसाठी, अजय पूरकरसाठी, चकाचक फ्रेमसाठी. मकरंद अनासपुरेचे सोकॉल्ड विनोदी, टुकार आणि गंडलेल्या मराठी सिनेम्यांपेक्षा असे मराठी सिनेमे पाहणे नेहमीच आनंददायक ठरते. आणि, मटावाले लिहिताहेत की राम आणि रागिणीचं नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे, तुम्ही लिहिलंय की घटस्फोट झालाय. आता नक्की काय आहे ते पाहण्यासाठी चित्रपट बघायलाच हवा
तरीपण बघणार
तरीपण बघणार
मकरंद अनासपुरेचे सोकॉल्ड
मकरंद अनासपुरेचे सोकॉल्ड विनोदी, टुकार आणि गंडलेल्या मराठी सिनेम्यांपेक्षा असे मराठी सिनेमे पाहणे नेहमीच आनंददायक ठरते
+१००००००००००००००००००००००००००००००००००
प्रकरण दुसरे नावाचे एक नाटक
प्रकरण दुसरे नावाचे एक नाटक आलेले मध्यंतरी (माझे बघायचे राहिले छान होते असा रिपोर्ट मिळालेला). त्याचा आणि याच्या कथानकाचा काही संबंध आहे का??
मंजूडी+1 मी सुध्दा अतुल आणि
मंजूडी+1
मी सुध्दा अतुल आणि सागरीकासाठी हा चित्रपट पाहणारच
रसपा.. शिर्षक भारीय !
रसपा.. शिर्षक भारीय ! संवादाफेकीसाठी नक्कीच बघायला आवडला असता पण तू म्हटलेच आहेस.. सो
मंजूडी +१ मी मुख्यतः सरांसाठी
मंजूडी +१
मी मुख्यतः सरांसाठी पाहणार पिक्चर
मंजुडी, पुर्ण अनुमोदन. मी आज
मंजुडी, पुर्ण अनुमोदन.
मी आज हा चित्रपट पाहिला., आणी सिनेमा चक्क हाउसफुल होता. मला तर खुप चांगला वाटला. संवाद देखिल चांगले आहेत. अतुल कुलकर्णी अप्रतिम... कुणी काहीही म्हणोत," लोगोंका काम है कहना".
लोकसत्ता म्हणतोय या
लोकसत्ता म्हणतोय या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कथा, पटकथा, संवाद. आँ?
मी फक्त सागरिका साठी
मी फक्त सागरिका साठी बघणार्....मराठीतली कतरिना होण्याचे पॉटेंशिअल आहे तिच्यात
मराठीतली कतरिना होण्याचे
मराठीतली कतरिना होण्याचे पॉटेंशिअल आहे तिच्यात >> ह्यामागचा तिरकस विनोद समजून घेऊन
आज लोकसत्ता मध्ये
आज लोकसत्ता मध्ये राजवाड्यांचे पण पत्र आहे सिनेमाच्या वृत्तांता शेजारी. अतुल ग्रेट आहे. सागरिका पण मला चकदे पासून आवड्ते. सईपेक्षापण स्टाइलिश वाटते. प्रश्न एव्ढाच आहे सव्वा आठ चा रात्रीचा शो आहे. बुध्वार परेन्त चित्रपट राहिला तर नक्की जाणार. राजवाडे तेच लिह्त आहेत. लोकांना गोष्ट आवड्ते.
रंग दे बसंती मध्ये अतुलने देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है म्हणून दाखवितो त्या सीन मध्ये काय संवाद फेक केली आहे. कसे तरी होते आतून. रोल्स शुड बी रिटन फॉर हिम.
रसप अगदी योग्य परिक्षण.
रसप अगदी योग्य परिक्षण. त्यातही सागरिकाच्या मराठी उच्चारांबद्दल तर +१०००
तरिही अगदीच न बघण्यासारखा नाही, बरेच दिवस "एकत्र जोडीने" मोठ्या पडद्यावर काही बघायचा योग आला नसेल तर एकदा तरी बघण्यासारखा हा नक्कीच आहे. अ.कु. सु.त. एकदम मस्तच. सा.घा अवघड आहे.
मी अतुल आणि सागरिकासाठी
मी अतुल आणि सागरिकासाठी पाहणार.
रसप, कधीतरी काहीतरी चांगलेही लिहित जा की! एकपण सिनेमा तुम्हांला आवडत नाही कसा?
शै, सागरिकाचे उच्चार मायनस
शै, सागरिकाचे उच्चार मायनस करुन मगच पहा तिला
रसप, कधीतारी काहीतरी चांगलेही लिहित जा की! एकपण सिनेमा तुम्हांला आवडत नाही कसा? >>>:D त्याही पेक्षा इतके सिनेमे बघायला वेळ आणि खिसा रिकामा करणं कसं काय जमतं दरवेळी
ते पण कविन
ते पण कविन
रसप, कधीतारी काहीतरी चांगलेही
रसप, कधीतारी काहीतरी चांगलेही लिहित जा की! एकपण सिनेमा तुम्हांला आवडत नाही कसा? >> अनेक आवडलेत हो.... लिहिलंही आहे !! पण लोकांना हाणलेलं लक्षात राहतं, गोंजारलेलं नाही !!
त्याही पेक्षा इतके सिनेमे बघायला वेळ आणि खिसा रिकामा करणं कसं काय जमतं दरवेळी >> बाकी कुठलाच खर्च करत नाही मी आयुष्यात !!
>>वेळ आणि खिसा रिकामा करणं
>>वेळ आणि खिसा रिकामा करणं कसं काय जमतं दरवेळी
का डोअरकीपरशी सेटींग करुन ठेवलय?
त्या गोंजारण्यातही जर आणि तर
त्या गोंजारण्यातही जर आणि तर आहेच की! एक तरी सिनेमा तुम्हांला अगदी मनापासून पूर्णपणे आवडेल असा पहायला मिळो, म्हणजे एक कौतुकाच परीक्षण वाचायला आवडेल
तरी पुणे ५२ वरचा खर्च वाचवल्याबद्दल धन्यवाद!
आता एकदा सगळे मिळुन रसप च्या
आता एकदा सगळे मिळुन रसप च्या परीक्षणाचे परीक्षण लिहा
रसप माझ्याकडून तुला यंदाचा "देवकी पंडीत - परीक्षक ऑफ द इयर" पुरस्कार प्रदान
एक तरी सिनेमा तुम्हांला अगदी
एक तरी सिनेमा तुम्हांला अगदी मनापासून पूर्णपणे आवडेल असा पहायला मिळो >> मला 'ज.त.हैं.जा.' प्रचंsssssड आवडला होता.. पण माझ्या आधी यशजींना डेंग्युचा डास भेटला... कडकडून !!
रसप माझ्याकडून तुला यंदाचा
रसप माझ्याकडून तुला यंदाचा "देवकी पंडीत - परीक्षक ऑफ द इयर" पुरस्कार प्रदान >> मी इतक्या मख्ख चेहर्याचा नाही हो !!
लय बोरींग आसणारे हा , बर झालं
लय बोरींग आसणारे हा , बर झालं इथे लिहिलतं , पुणे ५२ पण बकवास निघाला ....
( हे.मा.व.म.)
संगीत श्रवणीय आहे. खासकरून
संगीत श्रवणीय आहे. खासकरून 'कधी तू..' चा दुसरा भाग 'ओल्या सांजवेळी..'>>>>>>> सहमत!
अरेरे! खरंच ईतकी वाईट आहे
अरेरे! खरंच ईतकी वाईट आहे सागरिका घाटगे - रसप आणि कविता.
तुम्ही मायबोलीवर परीक्षण
तुम्ही मायबोलीवर परीक्षण लिहायचंच म्हणून वेगळा चष्मा लावून वगैरे सिनेमा बघता की काय!
Pages