नळातून पडणारं थेंब थेंब पाणी.. त्या थेंबा-थेंबाचा आवाज.. 'ट्रिप्.. टप्..' मला तर फार आवडतो. एक वेगळाच गोडवा जाणवतो त्या आवाजात. पण किती वेळ ? १५-२० मिनिटं.. अर्धा तास.. नंतर मात्र तोच आवाज त्रास द्यायला लागतो. कंटाळा येतो.. च्यायला ! बादली पण भरत नाही, आवाज पण थांबत नाही ! किंवा... एखाद्या अत्यंत गोड बोलणाऱ्या व्यक्तीचं घ्या. सुरुवातीस त्याचं ते मधाळ बोलणं खूप छान वाटतं.. मग मात्र त्या 'गोडबोले'गिरीचा कंटाळा येतो, जरासा रागही.. येतो ना ? तो खोटेपणाही वाटायला लागतो.. हो ना ?
'प्रेमाची गोष्ट' मधली पात्रंही अशीच 'थेंबुडी गोग्गोssड' आहेत. ही पात्रं शेजारच्यांच्या सुनेच्या भावाच्या मुलाला गणितात अपेक्षेपेक्षा २ गुण कमी मिळाले, ह्या कारणासाठीही चिंताक्रांत होतील, इतकी हळवी आहेत. सिनेमाची कहाणी स्वत: दिग्दर्शकाने/ पटकथाकारानेच एकाच दृश्यात सांगितली आहे. कसं असतं... 'A' चं 'C' वर प्रेम असतं.. 'C' मात्र 'A' ला सोडून जातेय. 'B' चं 'A' वर प्रेम आहे. पण 'A' ला ते कळत नाहीये.. आणि हे सगळं अजिबातच माहित नसलेला 'D', 'B' च्या मागे आहे. सर्वसुखकारक शेवट होण्यासाठी कोणाला कोण मिळणार, कोणाला कोण नाही मिळणार आणि कोणाला काहीच नाही मिळणार हे सगळं काही तत्क्षणी समजतं. ह्यातले A, B, C आणि D म्हणजे -
A = राम (अतुल कुलकर्णी)
B = रागिणी (सुलेखा तळवलकर
C = सोनल (सागारिका घाटगे)
D = समीत (अजय पूरकर)
आणि सोबत 'चवीपुरतं मीठ' म्हणून स्वराज (सतीश राजवाडे) - रामचा लंगोटीयार म्हणून.
किंचित सविस्तर -
'राम' हा एक चित्रपटकथा-पटकथा-संवाद लेखक. रागिणी' एक उदयोन्मुख अभिनेत्री, लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात. तसंच, सोनल आणि समीतही अयशस्वी लग्नानंतर वेगळे होतात. 'राम' नावाप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम, सरळमार्गी, समजूतदार वगैरे. त्याची खूप इच्छा असते की तुटणाऱ्या नात्याला अजून एक संधी द्यावी, पण रागिणी मात्र ठाम असते. तसंच, समीतचीही इच्छा असते की सोनलशी सगळं पूर्ववत व्हावं, पण सोनल कंटाळलेली असते. घर सोडून बाहेर पडलेल्या सोनलला 'राम' स्वत:कडे त्याची लेखन सहाय्यक म्हणून नोकरी देतो आणि rest is something OBVIOUS!
सपक संवाद आणि कमजोर पटकथा असल्याने चित्रपट विशेष पकड घेतच नाही. त्यात सागारिका घाटगे तर सहनशक्तीचा अंत पाहते. तिच्या मराठीला 'दिव्य' म्हटलं तर एखादं वृत्तपत्र माझ्यावर अब्रूनुकसानीचा डावा ठोकेल. पण ह्या मेमसाहेब चित्रपटभर पडलेली जिवणी आणि ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा 'ण', 'ण'चा 'न', 'श'चा 'स', 'स'चा श', 'द'चा 'ध', 'ध'चा द', 'म्ह'चा 'म', 'म'चा 'म्ह' करून अत्याचार करतात आणि राग येतो सतीश राजवाडेचा. त्याला तरी कळायला हवं होतं ना? की हिला सरळ दुसऱ्या कुणाचा आवाज तरी देऊन टाकावा. पण त्यापेक्षा सतीशभाऊंवर चित्रपटाच्या रटाळ गतीसाठी चिडायला हवं. अतुल कुलकर्णी स्वत:च्या नावाला जागून, जीव तोडून काम करतो, म्हणून ठीक. जर त्याच्याजागी दुसरा कुणी असता तर ही गोष्ट संपायच्या आधीच, शंभर जणांच्या चित्रपटगृहात बसलेले मोजून १८ जण माझ्यासह उठून बाहेर पडले असते नक्कीच.
संगीत श्रवणीय आहे. खासकरून 'कधी तू..' चा दुसरा भाग 'ओल्या सांजवेळी..'
खरं सांगायचं तर कुणालाच काही विशेष छाप सोडण्याएव्हढा वावच नाहीये, तरी सुलेखा तळवलकर सहज वावरते. सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी अप टू द मार्क.
थोडक्यात, एक प्रचंड लांबवलेली आणि उगाचच (कन्या राशीचे असल्यासारखं) घोळ घालत राहून सांगितलेली अगदीच छोटीशी गोष्ट, म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' अशी एक व्याख्या मी माझ्यापुरती मांडतो.
रेटिंग - २
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-premachi-gosht.html
मला आवडला बुवा हा
मला आवडला बुवा हा सिनेमा
सागरिका इतकीही वाईट नव्हती.... म्हणजे मला विचार करूनही तिला रिप्लेसमेन्ट सुचली नाही ( नुसता विचार च करणार होते तरीही )
रसप भावड्या जर दमादमाने घ्याल
रसप भावड्या जर दमादमाने घ्याल कि नाही? . दर शनिवारी माबो वर तुमचे चित्रपट परीक्षण वाचायला मिळणार बहुतेक
मी फक्त गाणी ऐकली पण ते दुसरे
मी फक्त गाणी ऐकली पण ते दुसरे एक गाणे आहे ना.. बोल आठवत नाही आता.. पण ते एकदम गजनी मधल्या 'कैसे मुझे तुम मिल गई' च्या चालीवर बसवल्यासारखे वाटते! हो ना?
मराठी चित्रपटाबद्दल तुम्हाला
मराठी चित्रपटाबद्दल तुम्हाला आकस वगैरे आहे का हो? >>> मंजुडी +१ , बर्याच माबोकरांना मराठी चित्रपटांबद्दल आकस जाणवतो. नेहमी फक्त निगेटिव्ह पाँईंट्स शोधत असतात असं वाटतं.
नेहमी फक्त निगेटिव्ह पाँईंट्स
नेहमी फक्त निगेटिव्ह पाँईंट्स शोधत असतात असं वाटतं.
>>>>>>>>>>>>>>
हे चित्रपटाला नाही सगळ्यालाच लागू होते श्री
बाकी, आवडण्यासारखे चित्रपट फार थोडे येतात मराठीत हेही कटू सत्य आहेच.
रसप, तुझे माझ्यासारखे झालेय
रसप, तुझे माझ्यासारखे झालेय बहुतेक. मी चित्रपट पैसे नी वेळ खर्च करुन बघते आणि तरी त्यात काहीना काही खटकतच असते आवडला असेल तरी. बाकी छान लिहिलयस
आवडण्यासारखे चित्रपट फार थोडे
आवडण्यासारखे चित्रपट फार थोडे येतात मराठीत हेही कटू सत्य आहेच.
+१००
मंजुडी + १ करण्याआधी तिचे त्या वाक्यापुढचेच वाक्यही कृपया वाचा.
साधना.... जी, काही लोक
साधना.... जी,
काही लोक 'सिलेक्टिव्ह लिसनर' असतात, काही 'सिलेक्टिव्ह रिडर'ही !!
मला तरी आवडला हा हलका फुलका
मला तरी आवडला हा हलका फुलका सिनेमा, खास करुन अतुल खुप आवडला
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=Iutd-Z3I6bI&list=PLT_8kUbi9C7zlKHextMcxlP...
सतीश राजवाडेचं " प्रेमाची गोष्ट" बनवण्यामागचं मनोगत
हा सिनेमा म्हणुन का काढला ,
हा सिनेमा म्हणुन का काढला , त्याचे नाटक का नाही केले?
सिनेमा ह्या माध्यमाच्या काय शक्यता वापरल्या ह्यात दिग्दर्शकानी?
हेही वाचाच
हेही वाचाच -
http://www.madaboutmoviez.com/2013/02/premachi-goshta-movie-review/
रसप, इथल्यासारखे चांगले
रसप, इथल्यासारखे चांगले रिव्ह्युज देखील आहेतच.
साजिरा- त्या साईटवरचे सगळेच
साजिरा- त्या साईटवरचे सगळेच रीव्हुज "चांगलेच" आहेत, आधिच्या मुव्हिजचे रेटीग्ज पाहिले सगळे ३ ते ४
रसप- तो रिव्ह्यु आणि माझ्या तो सिनेमा बघतानाच्या प्रतिक्रीया बहुतेक जुळणार्या. खरं म्हणजे इतर चार सिनेमासारखाच त्रिकोणी /चौकोनी प्रेम कथा आणि डिव्होर्सचा बॅकड्रॉप. कथेच्या सोईसाठी दोन्ही कपल्स ना मुलंबाळं नाही, अयशस्वी कथालेखक, त्याचे भलमोठं ऑफिस, त्यात तो असोशिएट पण नोकरिला ठेऊ शकतो, प्रोड्युसर कथा ढापतना फिमेल व्ह्यु पॉईंट ने लिहायला सांगतो, स्टोरि डेव्हलपिंगच्या सिटींग्जना डिरेक्टर कधिच नसतो /हिरो कधिच नसतो पण फिमेल लीड कॅरेक्टर येऊन चर्चा ऐकत बसते. बहुतेक यालाच सिनेमॅटीक लिबर्टी कि काही म्हणते असावेत.
बाकी फोटोग्राफी आवडली, चित्रपटातली घरं चित्रपटासाठी योग्य नसली तरी आवडली. आणि सोशल साईट्स, फोन स्क्रीन्/अपडेट्स स्क्रिन वर दाखवायची कल्पना आवडली
काल सिनेमा बघितला. रसप तुमचे
काल सिनेमा बघितला. रसप तुमचे परिक्षण आवडले पटले सुद्धा .
तरी...अतुल कुलकर्णी आणि सतिश राजवाडे आवडतात म्हणून सिनेमा बघायचाच असे ठरवले होते तसा तो बघीतला आणि आवडला. खूप काही ग्रेट नाही. प्रेडीक्टेबल पण हलकी फुलकी कथा बघायला कंटाळा नाही आला. सागरीका चा अभिनय (?) बघायची उत्सुकता होती. पण चांगलीच निराशा झाली. पुर्ण सिनेमा मधे तिच्या चेहर्यावर एकसारखेच भाव होते. सतिश राजवाडें ना हे कसे जाणवले नाही याचे आश्चर्य वाटले.
पाटील यांना अनुमोदन. बाकी
पाटील यांना अनुमोदन.
बाकी एकमेकांना आलेल्या फोनच्या स्क्रीन्स कशाला दाखवत होते काय माहित. हसूच आलं बघून ते.
लवकरच झी वर येतोय हा सिनेमा..
लवकरच झी वर येतोय हा सिनेमा..
सिनेमा पहिला..... काही खास
सिनेमा पहिला..... काही खास नव्हता.
<<ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा
<<ओढलेला चेहरा घेऊन 'न'चा 'ण', 'ण'चा 'न', 'श'चा 'स', 'स'चा श', 'द'चा 'ध', 'ध'चा द', 'म्ह'चा 'म', 'म'चा 'म्ह' करून अत्याचार करतात आणि राग येतो सतीश राजवाडेचा. त्याला तरी कळायला हवं होतं ना? की हिला सरळ दुसऱ्या कुणाचा आवाज तरी देऊन टाकावा.>> मी आपली मराठी वर पाहिला ! सागरिका नाही आवडली . दिसायला छान पण मराठी मधली कतरिना !
सुलेखाचे काम मस्त वाटले . छान लिहिला आहे रिव्हू .
मला पण आवडला. एकदा
मला पण आवडला. एकदा पाहण्यासारखा आहे. अतुलचे चेक्स शर्ट कसले मस्त आहेत किंवा त्याला ते शोभून दिसतायत.
सागरिकाचं पण काम आवडलं. ती सूट झालीये या रोलसाठी. तिच्या नवर्याचे कोण तो सारेगम मधे होता ना? काम ठिक.
ओढुन्ताणून त्यांचे वाद दाखवलेत.
या पिक्चरात एक गुफ अप सापडलाय. योग्य जागी टाकला आहे.
नॉट सो ग्रेट. टिव्हीवर पाहिला
नॉट सो ग्रेट.
टिव्हीवर पाहिला म्हणुन ठिकच आहे अन्यथा पैसे वाया गेले अशी भावना झाली असती.
प्रेडीक्टेबल पण ओके आहे एकदा
प्रेडीक्टेबल पण ओके आहे एकदा पहायला , जसा घ्डत जातो सिनेमा ते आवडलं मला!
अतुल कुलकर्णी -सुलेखा-रोहिणी हत्तंगडी यांचं काम आहेच चांगलं पण सागरिकाही आवडली मला!
भाषा सदोष नसती तर बरं झालं असतं कारण चेहरा एक्सप्रेसिव्ह आहे खरं तर (कट्रिना सारखी ठोकळी नाहीये ,) , चांगलं अॅक्टींग केलय .
तिचा स्क्रीन वरचा वावर प्लेझन्ट वाटला मला तरी !
दीपांजली, मला उलट तिचा चेहरा
दीपांजली, मला उलट तिचा चेहरा जाम एक्स्प्रेशनलेस वाटला या मुव्हीमध्ये. वावर प्लेझंट आहे वाद नाही.
मुव्ही फार येताजाता पाहीला. पण ठिक वाटला. निदान बंडल नाहीये.
बंडल होता. कथेत काही नाविन्य
बंडल होता. कथेत काही नाविन्य नाही.
चित्रपट न वाटता नाटक्/सिरियल म्हणून चालला असता.
चित्रपट सुरु न होता फक्त डायलॉग्ज सुरू होऊन संपतात असं वाटतं. (आणि सगळेजण नेमून दिलेले डायलॉग म्हणतात असंही).
हिरो आशावादी न वाटता बावळट वाटला मला. अतुल कुलकर्णी असल्यानं आणि त्याचही काम न आवडल्यानं पदरी घोर निराशा पडली.
रोहिणी हट्टंगडी सोडल्यास बाकी सगळं बंडल.
खरचं आहे, छोटीशीच गोष्ट, बडबड
खरचं आहे, छोटीशीच गोष्ट, बडबड जास्त!
फारच प्रेडिक्टेबल आहे.
>> सागरिकाही आवडली मला! भाषा
>> सागरिकाही आवडली मला!
भाषा सदोष नसती तर बरं झालं असतं कारण चेहरा एक्सप्रेसिव्ह आहे खरं तर (कट्रिना सारखी ठोकळी नाहीये ,) , चांगलं अॅक्टींग केलय .
तिचा स्क्रीन वरचा वावर प्लेझन्ट वाटला मला तरी !<<
शॉक्ड !!
पहिल्यापासून शेवटपर्यन्त ती पाडलेलं तोंड घेऊन वावरते. खान्दे पडलेले, डोळे विझलेले, वाकडी जिवणी, अत्यंन्न्न्न्न्न्न्न्त सदोष उच्चार ............ क्षमा करा पण मला औषधालाही प्लेझन्ट्पणा जाणवला नाही हो !
सुलेखा आणि सागारिकाला स्वॅप तरी करायला हवं होतं, तर जरा सुसह्य झालं असतं कदाचित ...... असं वाटलं.
मला त्यांचं अशा प्रकारे
मला त्यांचं अशा प्रकारे प्रेमात पडणंच खटकलं होतं.. म्हणजे एकदा प्रेमात पडुन लग्न करुन ते तुटल्याचा अनुभव घेतल्यावर माणुस इतक्या सहजपणे दुसर्या माणसाच्या प्रेमात पडतो हे काही पटलं नाही.. म्हणजे दुधाने तोंड पोळल्यावर ताक फुंकुन पितात तर डिव्होर्सच्या वाटेवर असताना, त्या दोघांचं असं भेटल्यावर लगेचच अशा प्रकारे एकमेकात गुंतणं हे मला रियल वाटलं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे अतुल कुलकर्णी एका ड्ब कथेवर काम करत असतो जी तो तिला समजाउन सांगतो , ती कथाही प्रेमाचा चौकोन टाइप्स असते आणि मग तो स्वतःची कथा ऐकवतो जी परत याच फॉर्म्युल्यावर आधारित असते ना.. मग अतुलच्या कथेत आणि त्या आधीच्या कथेत फक्त पात्रांची नावे बदलली आहेत असं काहीसं वाटलं. अर्थात हे मला अर्धवट आठवंतय कारण सिनेमा २-२.५ महिन्यांपुर्वी थिएटरमध्ये जाउन बघितला होता.. परत टी.व्ही.वर बघण्याचे कष्ट घेतले नाहीत.
अतुल कुलकर्णी, रोहिणी हत्तंगडी यांच्यासाठी एकदा बघितला तेव्हढा पुरे.
नानबा +++ अगदीच बकवास आहे
नानबा +++ अगदीच बकवास आहे पिक्चर. स्टार कास्ट आणि जाहीरातींमुळे खूपच अपेक्षा होत्या.
राम - बावळट
रागिणी - ओढून ताणून महत्वाकांक्षी
सोनल - अतिशय बालिश , बाकी नवर्याला सोडून मैत्रीणीकडे रहात असते तेव्हा नोकरी नसताना आणि नोकरी मिळाल्यावर सुद्धा हीचा 'खर्च' कसा काय चालत असेल अशी शंका तिचे राहणीमान बघता सतत मनात येतच रहाते.
समित - सोनल अगदी मॉडेल आणि नवरा हा असा दांडगट. ह्यांचे आधी कसे जमले असेल बरे ?
Pages