कोल्हापूर जिल्ह्यात 'खिद्रापूर' या ठिकाणाबद्दल ऐकले होते. ऐतिहासिक लेणी आणि महादेवाचे मंदिर 'श्री कोपेश्वर' असलेले हे ठिकाण पर्यटन विभागाच्या नकाशावर नुकतेच आले. अगदी लहानपणापासून जायचे जायचे असं ठरवत या वर्षी मुहूर्त आला.
खिद्रापूरला जाण्यासाठी एक रस्ता कोल्हापूरमधून जातो, तो मला माहिती नाही आम्ही नरसोबाची वाडी-कुरुंदवाड-सैनिक टाकळी मार्गे गेलो होतो. वाडीपासून ३२ कि.मी. आहे. नुकतेच MTDC ने दिशाफलक लावल्यामुळे रस्ता सापडतो. गावात गेल्यावर हे मंदिर असे लगेच दिसत नाही. अनोळखी माणसे २-३ चकरा मारल्यावरच सरळ स्थानिकांना विचारण्याचा सोपा मार्ग अवलंबवतात. ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळच हे मंदिर आहे आणि कसलीही भव्यता अथवा उठून दिसेल असे काही नसल्यामुळे प्रवेशदारापाशी निराशा झाली. पण एकदा का आत प्रवेश केला की मग किती वेळ आत घालवला जातो हे कळतच नाही. अतिशय सुंदर आणि मोहक कलाकुसर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे
असे मानण्यात येते की इ.स. ११०९-११७८ दरम्यान गांधारादित्य. विक्रमादित्य व भोज-२ या शिलाहार राजांच्या कारकिर्दित हे मंदिर बांधण्यात आले. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान. 'कोपेश्वर' या नावामागची पौराणिक कथा रंजक आहे. शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही आणि म्हणून एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी महादेवास या ठिकाणी आणले गेले. 'कोप्'+'इश्वर' अर्थात महादेव
भग्नावस्थेत असले तरी मंदिर बर्यापैकी टिकून आहे, हत्ती, नक्षीदार खांब व रामायण, महाभारतातील प्रसंग, बारा राशींची चिन्हे, निसर्ग यांच्या कलाकुसरतेने अक्षरशः मढले आहे. प्रवेशद्वारातच वर्तुळाकार मोकळे छत आहे आणि त्याला आधाराला असलेल्या खांबांवर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नंतर सभामंडप, गाभारा लागतो जो अंधुक आहे आणि शिवलिंगाचे दर्शन होइल इतपतच प्रकाशमय आहे.
असं म्हणतात की मोगलांच्या नासधुसीमुळे मंदिराला अशी अवस्था आली आहे. ही अवस्था बघून वाईट वाटतं तसेच पर्यटन विभागाच्या कारभाराचा राग येतो.
काही प्रचि
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
तळटीप : वॉटरमार्क कसेही पडलेत, तेव्हढं सांभाळून घ्या ही विनंती
मस्तच..
मस्तच..
भारी कोरीवकाम! ...........
भारी कोरीवकाम! ...........
धन्यवाद , हो PostProcessing
धन्यवाद , हो PostProcessing मुळे काही ठिकाणी जास्त बदल (Drastic change) दिसतोय. मुळात भर दुपारी उन्हात फोटो काढल्यामुळेपण प्रचिंमध्ये भडकपणा दिसत असेल.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
खासच. मंदीर आणि फोटॉग्राफी.
खासच. मंदीर आणि फोटॉग्राफी.
रंगासेठ मस्त फोटोग्राफी.
रंगासेठ मस्त फोटोग्राफी. मंदिराचा प्रश्नच नाही, अतीशय कोरीव व भव्य बांधकाम.
बाय द वे, या वेळेसच्या म्हणजे २०१२ सालच्या ग्रहसंकेत या दिवाळी अंकात कर्नाटक आणी बाकी महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांविषयी सुंदर माहिती आलीय्.उदा. हंपीचे विजयविठ्ठल मंदिर तसेच मुंबई चेन्नई मार्गावरील अणूमंत्रालय येथील गांधाल पंचमुखी मंदिर म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर ( अहिरावण महीरावणाचा काळ ).
येडुर ( महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचे) कोपेश्वर मंदिर. दर फाल्गुनी पौर्णिमेस उत्सव होतो.
टुनटुन माहितीसाठी धन्यवाद .
टुनटुन माहितीसाठी धन्यवाद :-).
अतिशय सुरेख !!
अतिशय सुरेख !!
फोतो मधे दित्यस्तात तेव्हद्यच
फोतो मधे दित्यस्तात तेव्हद्यच सुन्देर आहेत का त्या मूर्त्या ?
अणूमंत्रालय येथील गांधाल
अणूमंत्रालय येथील गांधाल पंचमुखी मंदिर म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर >>> राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयम इथले मंदिर का? त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. एक दोन दिवसांत मायबोलीवर टाकेन.
होय, मूर्ती व नक्षीकाम खरच
होय, मूर्ती व नक्षीकाम खरच सुंदर आहे अजूनही.
नंदिनी, मंत्रालयम बद्दल खूप ऐकलय, फोटोंची वाट पाहतोय
सुंदर कोरीवकाम आणि उत्कृष्ट
सुंदर कोरीवकाम आणि उत्कृष्ट फोटोग्राफीमुळे प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळाले.
We met Mr Joshi, native of
We met Mr Joshi, native of Khidrapur and scholar of archeology. He spared tremendous information about every sclupture in detail. Contact him on 09421243728 for guidance request. I am uploading one photograph guided by Mr Joshi. This photograph is taken in Swarg gruh (entrance of the temple) looking towards sky.
सुमेधा जय, सुरेख फोटो!
सुमेधा जय, सुरेख फोटो!
फोटो फारच भारी. मंदिरांवरचे
फोटो फारच भारी. मंदिरांवरचे कोरीवकाम अप्रतिम आहे.
पुण्याहून स्वतःच्या वाहनाने इथे जायला किती वेळ लागेल साधारणतः?
मस्तच
मस्तच
व्वा! मस्तच फ़ोटो. कलाकुसर तर
व्वा! मस्तच फ़ोटो. कलाकुसर तर भारीच.
चान आहे, सोलिडच आहे...
चान आहे, सोलिडच आहे...
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
पुन्हा पाहिले फोटो, मस्तच
पुन्हा पाहिले फोटो, मस्तच
खिद्रापूर, भुलेश्वर, अकोले हि मंदिरे विशलिस्टवर आहेत. पाहु कधी योग येतो ते.
धन्यवाद लोक्स जिप्सी
धन्यवाद लोक्स जिप्सी उन्हाळ्यात जाऊ नकोस, जुलै-डिसेंबर एकदम मस्त कालावधी. कोल्हापूर्-पन्हाळा-जोतिबा- नरसोबाची वाडी-खिद्रापूर अशी ट्रीप एकदम मस्त होईल.
अप्रतिम !
अप्रतिम !
https://www.facebook.com/Kolh
https://www.facebook.com/KolhapuriJagatBhari.
हि प्रकाश चित्रे खुपच सुरेख
हि प्रकाश चित्रे खुपच सुरेख आहेत
दगड कोरून त्यातून निर्माण
दगड कोरून त्यातून निर्माण करणे म्हणजे खरच अप्रतिम आहे हे आणि निर्माण करणाऱ्याबद्दल काय बोलणार
श्रीनरसोबावाडीच्या एवढे जवळ
श्रीनरसोबावाडीच्या एवढे जवळ जाऊनही खिद्रापूरला जाता आले नाही.:अरेरे:
वाडीला जातांना उजव्या हातालाच मोठा बोर्ड होता खिद्रापूरचा. परत योग आला की नक्की जाणारच्.:स्मित:
बाय द वे कोल्हापूरकडे जातांना कर्हाडच्या पुढे पेठ नाका विचारावा, तिथुन पूलावरुनच डावीकडे वळुन सांगलीकडे सरळ जावे. बरेच पुढे गेल्यावर ( बहुतेक जयसिंगपूरच्या जवळ ) उजव्या हाताला हा खिद्रापूरचा बोर्ड आहे.
जितकं सुंदर मंदिर तितकीच
जितकं सुंदर मंदिर तितकीच देखणी फोटोग्राफी!!!!
जिप्सि अनुमोदन...
Pages