Submitted by मिल्या on 1 February, 2013 - 01:38
तरही लेखनाचा माझाही एक प्रयत्न
डॉ. नी दिलेली ओळ बदलून घेतल्याबद्दल आधी त्यांची माफी मागतो
काल तर झालो मला माहीत मी
आज का आलो पुन्हा शुद्धीत मी?
शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी
कुवत नसताना भरारी घेउनी
लोटले आहे मला खाईत मी
सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)
रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावलीने साथ देणे सोडले अन्
सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी<<<
व्वा व्वा
मस्त गझल
आज रस्ता संपता संपेचना आज आहे
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
मस्त शेर आहे.
फार आवडला.
रोज क्षितिजे नवनवी
रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी >>>> क्या बात है....
सर्वच शेर सुंदर .... मस्त गजल....
मस्त आहे गझल मिलिंद. सगळे शेर
मस्त आहे गझल मिलिंद. सगळे शेर भारी.
गझल आवडली. सावलीने साथ देणे
गझल आवडली.
सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
हे दोन शेर खूप आवडले.
मस्त गझल नवनीतचा योग्य अर्थ
मस्त गझल नवनीतचा योग्य अर्थ त्या शेरात आला आवडली.
शक्य नाही आपले जमणे कधी आग तू
शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी
>>>>>>>>.
हा विचार
अनेकदा मांडलेला आहे , पण तरी हा शेर खुप सहज वाटला !!
>>>>>>>
गझल आवडली !!
व्वा मिल्या ! >>सावलीने साथ
व्वा मिल्या !
>>सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)
रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी
<<
हे शेर त्यातल्या विरोधाभासामुळे फार आवडले.
वा वा वा....सगळेच शेर एका
वा वा वा....सगळेच शेर एका वरचढ एक !
केवढे सहज आले आहेत एक एक मिसरे...
खयालही थेट!
जियो !
धन्यवाद!
शेवटचे चार फार आवडले घाईचा
शेवटचे चार फार आवडले घाईचा शेर सर्वात जास्त !
जियो !
आवडली.... खुप दिवसांनी ?
आवडली.... खुप दिवसांनी ?
प्रचंड आवडली . सर्वच शेर
प्रचंड आवडली .
सर्वच शेर जबदस्त !
सावलीने साथ देणे सोडले अन्
सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी
आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी
जबरी...
सुरेख गझल..
शुभेच्छा
खूप सारे धन्यवाद सर्वांना शाम
खूप सारे धन्यवाद सर्वांना
शाम - हो खूप दिवसांनी काही तरी लिहिले... सुचायला पाहिजे ना...
मस्त रे.......खूप दिवसांनी
मस्त रे.......खूप दिवसांनी दिसलास
घाईत, शुद्धीत, वाळीत..........जबरी !!
मतला सोडून उर्वरीत गझल आवडली!
मतला सोडून उर्वरीत गझल आवडली!
मस्त मस्त.
मस्त मस्त.
धन्यवाद परत एकदा.. सतिशजी :
धन्यवाद परत एकदा..
सतिशजी : मतला कुणाला भावणार नाही ह्याची कल्पना होतीच बर्यापैकी पण तरी पण मला तो पटला म्हणून तसाच ठेवला ... मी तो उलगडत बसणार नाही पण.. त्यापेक्षा फसला आहे असेच म्हणेन
मतल्यासहीत सर्वच शेर
मतल्यासहीत सर्वच शेर आवडलेत.
बढिया गझल.
--------------------------------------------
<<< मी तो उलगडत बसणार नाही पण.. त्यापेक्षा फसला आहे असेच म्हणेन >>>
प्रचंड सहमत.
सुंदर
सुंदर