Submitted by मुग्धमानसी on 22 January, 2013 - 23:42
मी क्षणा क्षणावर कोरत जाते एक गाणं...
शब्द कुणीतरी कानात सांगत जातं. चालही कुणीतरी आधीच ठरवलेली.
ताल, सूर, लय, ठेका... माझ्या मालकीचं काहीच नाही!
मी फक्त लिहीत जाते...
एक एक क्षण... भिरभिरत निसटणारा...
शिताफीनं पकडते अन् कोवळ्या नाजूक नखांनी एक एक शब्द त्यावर कोरत जाते.
काही क्षण निसटून जातात...
काही क्षण तुटतात, फाटतात, मिटतात, नासतात..
एवढं नुकसान गृहीत धरलंच पाहीजे नाही का?
पण तरिही... न थकता...
मी माझं गाणं पुरं करायच्या मागे लागते.
किंवा कुणीतरी त्याचं गाणं माझ्यामार्फत पुरं करायच्या मागे लागतो.
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर आहे!!
अर्थाचं बंधन नसलेले शब्द... अन् शब्दांचं बंधन नसलेलं गाणं....!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती छान! खूप आवडलं!
किती छान! खूप आवडलं!
आवडली
आवडली
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर आहे!!
अर्थाचं बंधन नसलेले शब्द... अन् शब्दांचं बंधन नसलेलं गाणं....!!! +१!!
विचार सुंदर आहेत.... मांडणी
विचार सुंदर आहेत.... मांडणी थोडी विस्कळीत वाटली.... अजून सुसूत्रता येऊ शकेल. (चु.भु.द्या.घ्या.)
हे वरचंही कोणीतरी भराभरा लिहून घेतलेय की काय असंच वाटतंय.... !!!!
थोडा ठेहराव येऊ द्या अजून....
शुभेच्छा.
खूप छान
खूप छान
मस्त...मस्त...वाटलय वाचुन
मस्त...मस्त...वाटलय वाचुन
धन्यवाद! भुंगा, तुम्ही
धन्यवाद!
भुंगा, तुम्ही सुचवलेले विचार पटले. अमलात आणायचा जरूर प्रयत्न करेन,
वाह!
वाह!
छान छान! असं होतं खरं!
छान छान! असं होतं खरं!
अगदी सुंदर !
अगदी सुंदर !
धन्यवाद!
धन्यवाद!
वाह!
वाह!
धन्यवाद!
धन्यवाद!