चाकडा

Submitted by सुलेखा on 28 January, 2013 - 04:04

चाकडा [वॉलपीस] हे गुजरात मधील भरवाड [गवळी] जमातीच्या लो़कांचे भरतकाम आहे.याला चोकडी असेही म्हणतात.भौमितीक आकृति असते.त्यामुळे डिझाईन मधे सारखेपणा जाणवतो.सहा पदरी दोर्‍याची वेगवेगळी रंगसंगती वापरुन हे भरतकाम करतात.यात मुख्यत्वे काश्मिरी टाका,चेन/साखळी टाका ,उलटी टिप हे टाके घातले जातात.काळ्या किंवा गडद कापडावर,पांढरी खडी वापरुन केलेले छापील डिझाईन तयार मिळते.तीन पदरी दोरा वापरतात. टाका जरी साधा ,सोपा असला तरी एकुण काम "वेळखाऊ" आहे.मला अडीच महिने लागले आहेत.त्यामुळे आपल्या आवडीच्या इतर कामाबरोबर हे भरकाम चालु ठेवावे...अर्थात विविध रंगसंगतीमुळे प्रत्येक वेळी नवा रंग वापरला जातो त्यामुळे हे काम करण्याची गोडी टिकुन रहाते.वरुन सजावटीसाठी लहान कवड्या,आरसे,रंगित लोकरीचे किंवा दोर्‍यांचे गोंडे तयार करुन वापरतात.
१]/chokaDee-11.JPG.
२] chokaDee-2.28 Jan2013_0.JPG
३]chokaDee-3.28Jan  2013_0.JPG
४]chokaDee-5.28Jan 2013.JPG
५]chokaDee -4.28Jan 2013.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

सुंदर आहे. (आई हे करायची).

खूप वेळ लागतो खरंच!

तुम्ही खूपच चांगली नक्षी केलीत.

धन्यवाद

काळ्या किंवा गडद कापडावर,पांढरी खडी वापरुन केलेले छापील डिझाईन तयार मिळते>>>>>>>>
kuthe milate ase design kadhalele kapad?

खूप खूप मस्त ! एकसारखे.. सुबक... आणि रंगसंगती तर फारच छाने Happy
तुमच्या पेशन्स ला सलाम !

अहा.............कसली सफाई आहे भरतकामात......कलर्स पण एकदम ब्राईट.....मस्त दिसतंय Happy

मस्त !!

खूप आवडलं................................

Pages