पांढर्‍यावरचं काळं...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एक काळं पेन आणि एक पांढरा गोल बॉक्स, आणि एक कंटाळवाणी दुपार... त्यातला अर्धा तास Happy

मग काम सुरू .. टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग..

niddle_box (800x600).jpg

मग बनला हा सुंदर बॉक्स.
त्याचा टिकाउपणा वाढवायला त्यावर एका रुंद सेलोटेपचे कव्हर चढवले.
झालं माझ्या क्रोशाच्या हुक्स चं नवं घर तय्यार !

black_white.jpg

माझ्याकडे क्रोशाचे हुक्स सध्या वाढत आहेत म्हणून मी तेच ठेवले आहेत.

पण तुम्ही पेन्सिल बॉक्स म्हणून वापरु शकाल. किंवा आजकाल ते चाळीशीचे नाजुक चष्मे मिळतात ते ठेवायलाही छान आहे ना हा बॉक्स ? Happy

मस्त !
टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग.. >>> असा पण आवाज येतो का ? Proud

टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग.. >>> असा पण आवाज येतो का ?

श्री अरे... पार्ल्याच्या बसची घंटी ऐकु येत होती होती... बाकी मायबोलीवर कुठे काही वाचायला नव्ह्तं.. म्हटलं ना.. कंटाळवाणी दुपार Lol

ज्ञाती त्यापेक्षा सू न घाल Proud

शैलजा >> तिकडे आले की नक्की देइन.. अजुन एक गोष्ट पण द्यायचीये तुला. माझ्या लक्षात आहे. Happy

डॅफोडिल्स्,तो पांढरा गोल पेपर टॉवेल्सची ट्यूब आहे असं समजून विचारतेय्,की तो रंगवलास की कागद चिकट्वलास्,कारण तो खूपच स्मूथ वाटतोय.मलाही ते करून बघायची अगदि अनिवार इच्छा होतेय्,पण पेपर टॉवेल्स च्या ट्युब ला कसं तयार करावं ते कळेना..

डॅफोडिल्स्,तो पांढरा गोल पेपर टॉवेल्सची ट्यूब आहे असं समजून विचारतेय्>>> नाही नाही पेपर नॅपकिन्स चा रोल नाहिये तो. त्याला झाकणही नसते.

मुलांच्या पार्टी चे काहितरी होते त्या बॉक्स मध्ये. वर एक प्लॅस्टीक चे कव्हर होते. ते बॉक्स ओपन करताना फाडावेच लागले. आतला बॉक्स पांढरा शुभ्र होता. आणि त्याला वर खाली झाकणही होते म्हणून माझ्या डोक्यात तो बॉक्स वापरावा असं आलं. डिझाईन काढल्यावर ते फार आवडलं आणि छानही दिसत होतं. मग ते खराब होउ नये म्हणून मी त्यावर एका रुंद ट्रान्सपरन्ट अ‍ॅडेसिव्ह टेप ने एक राऊड चिकटवुन टाकले. मग आपोआप ग्लोसी फिनिश आले. Happy

वॉव.

Pages