ऑरेंज क्रोशे स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 January, 2013 - 02:01

एक फार गोड डिझाईन मिळालं नेटवर. मोह आवरता आला नाही आणि केली सुरवात Happy

DSC02181-002.JPG

हे डिझाईन कसं करायचं ते तुम्हाला इथे बघता येईल.

http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html

DSC02186-001.JPGDSC02190-002.JPGDSC02192-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर म्हणायला आपल्याला वेळ लागत नाही, पण हे करताना लागलेला वेळ, दाखवलेली चिकाटी, घेतलेले कष्ट यांची कल्पनाही येत नाही.

सुरेख ग. तू etsy.com वर टाक ना ग तुझे आर्टवर्क्स. क्रीम कलरच्या सुती ड्रेसवर मस्त दिसेल

धन्यवाद Happy

दिनेश अगदी खरंय तुझं. पण एक सांगू...... आपण तयार करत असलेली गोष्ट जर मस्त रंगरुप घेत असेल ना तर करण्याचा स्पीड वाढतो..हे स्वानुभवावरुन सांगतेय.

हा स्टोल चक्क अडीच दिवसात झाला Happy

अडीच दिवस ! म्हणजे चिकाटीच.

प्रत्येक वेळी धाग्याला अगदी नेमका ताण, सूईचा नेमका कोन, सर्व टाक्यांची लांबी समान असणे हे सगळे जमले तरच अशी सुबकता येते. आणि हे जमवायला भरपूर सराव हवाच.

खूप सुंदर!! तुम्हाला __/\__

प्रत्येक वेळी धाग्याला अगदी नेमका ताण, सूईचा नेमका कोन, सर्व टाक्यांची लांबी समान असणे हे सगळे जमले तरच अशी सुबकता येते. आणि हे जमवायला भरपूर सराव हवाच.>>>>+१०००००

र.न्ग अप्रतिम आहे,मला फार आवडतो. तु निवडलेले सगळेच र.न्ग भारी आहेत...स्टोल तर खुपच सु.न्दर!!

खूपच छान आहे.
मी तुमची ऑन लाईन शिष्या आहे. तुमच्यामूळे पुन्हा क्रोशाच वेड लागल. Happy
प्लिज एक सोपा स्वेटर शिकवा.

mastach !

वॉव! मस्त. अमा..........+१००
जयश्री इट्सीचं मीही सुचवणार होते. माझ्याही लेकीचं शॉप आहे तिथे. पेंटिन्ग्स आणि काहीकाही.

अगं बाई असलं काही छान छान दाखवत जाउ नकोस ग.....जिवाला यातना होतात....समोर दिसत असुन घेता आणि घालता येत नाही..हे जरा हर्टिंग आहे....

खुपच सुंदर... असं काही शिकण्यासाठी, करण्यासाठी आयुष्यातुन थोडा वेळ काढता यायला हवा होता! निर्मितीचा आनंद काही औरच! फार फार सुंदर कला आत्मसात केलीये तुम्ही!

तहे दिल से शुक्रिया यारो Happy

मुग्धमानसी ....अगदी अगदी Happy

आरती....... अगं शिष्या वगैरे काय...... आपल्याला जे येतं ते एकमेकांना शिकवायचं, शिकायचं. बाकी स्वेटर म्हणशील तर आपली अवल आणि डॅफोडील्स. मला ते माप वगैरे घेऊन नाही करता येत. म्हणून मी आपली सोप्पं काहीतरी करते.

अनिश्का अगं विकायला नहई आवडत मला. तू काही दिवसांसाठी घेऊन जा. मिरवून झालं की परत दे आणि दुसरं घेऊन जा Happy

Pages