मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरेंट

Submitted by वर्षू. on 8 January, 2013 - 07:48

काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..

मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!

साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..

या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते


..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या

मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. Uhoh अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..

जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना .. Proud

सिंक मधे स्टीक

लास्ट बट नॉट द लीस्ट..

किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???

(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )

हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...

मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्‍या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगाईग, कशाला उघडलं हे सक्काळ सक्काळ ?
वर्षुतै, दंडवत तुला. माझ्यात हिम्मत नाही. नुसते फोटु पाहूनच कसंतरी होतंय Proud
पण असल्या विचित्र कल्पना का येत असाव्यात डोक्यात ???

आईगं.. य्क्क काय कल्पना आहे!!!
वर्षुतै, दंडवत तुला. माझ्यात हिम्मत नाही. नुसते फोटु पाहूनच कसंतरी होतंय
पण असल्या विचित्र कल्पना का येत असाव्यात डोक्यात ??? >> +१

पण असल्या विचित्र कल्पना का येत असाव्यात डोक्यात ???

त्याकरता मानवाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजी चा अभ्यास करावा लागेल

आयला, ते आईसक्रीम बघून अंमळ मौज वाटली. त्याचा आकार सर्पिलाकृती आहे. तर मग साचा कसा असेल हे मनी कल्पिल्यास फारच चमत्कारिक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. Rofl
-गा.पै.

आई शप्पथ... कसली खतरनाक कल्पना आहे ... तायडे .. सलाम तुला ... लैच हिम्मतवाली हैस Happy

प्रचंड यक्क आहे........:स्मित:

वर्षु, कसे खावे वाटले गं तुला?

ईईईईईईईईई च होतंय गं वर्षू! मीही डिस्कव्हरीवर व इतरत्रही याबद्दल वाचलं होतं फोटोही पाहिले होते.
तेव्हाही असंच झालं होतं गं! खूपच ब्याक(!)वर्ड आहे ना मी?

बाबु Proud हो.. फकस्त जेवणाचीच..

स्मितु... डोळं झाकून खाल्लं... Happy

मानुषी.. तू ब्याकवर्ड न्हाईस गं.. हे लोकंच थोडे फारवर्डेत Wink

तुम्ही हवं तर याला 'रिव्हर्सड सायकॉलॉजि' म्हणा, किंवा 'ब्लॅक ह्यूमर' . मला मात्र माझ्या निखळ फालतूपणाला अशीं लेबलं लावायला नाही आवडत ! -

smashaan_0.JPG

<< भाऊ काक... ब्येस >> कावळा बाराव्या/तेराव्याला येतो म्हणून 'स्मशानयात्रे'च्या मेन्यूत नाही आणला !!! Wink

भाऊ Lol

भाऊ ___/\___ Rofl

तुमच्या कल्पकतेला सला>>म....

( देवा!!! हे असलं आणी अजून 'तसलं' काही 'चियांग मू' ला सुचू देऊ नकोस.. Proud

अरा रा रा रा रा रा...... तिथे लगेच आजूबाजूला "त्या स्पेशल बॅग्ज" पण ठेवल्या असतील ना ?? सुलट प्रवास तसा "उलट" प्रवासही कोणी प्रत्यक्ष केल्यास !!!

भाऊंचा प्रतिसाद तर अगदी "वरताण......"

तू भलतीच डेअरिंगवाली आहेस याची अगदी म्हंजे अगदी खात्रीच पटली.....

खुप कल्पक आहे खरं. उद्योग वाढवायचा तर नाविन्य हवेच ना !
पण हे ट्रॅडिशनल आकार झाले, सध्या बाजारात असलेली वॉश बेसिन्स एवढ्या सुंदर आकारात आणि रंगात असतात, कि त्याचा असा वापर केल्यास अजिबात खटकणार नाही.

कुठल्यातरी आंधळ्या माणसाने डोळस लोकांचा बदला घेण्यासाठी ही कल्पना लढवलेली दिसतेय.... Wink

बाकी एकेका पदार्थाचे रंगही असे येल्लो येल्लो ब्राऊन ब्राऊन दिलेत ना.....

तरी इंग्लिश कमोड म्हणून त्यातल्या त्यात बरे वाटते.. भारतीय बैठक असती अन समोर पिण्यासाठी पाणी म्हणून छोटासा डालड्याचा डबा पाण्याने भरून ठेवला असता तर झालेच समजा जेवण.. Sad

>>. भारतीय बैठक असती अन समोर पिण्यासाठी पाणी म्हणून छोटासा डालड्याचा डबा पाण्याने भरून ठेवला असता तर झालेच समजा जेवण

Proud

>>आइसक्रीम खायची हिमंत नाही

अगदी अगदी

वर्षा _/\_ बाई तुला. स्मशानयात्रा रेस्टॉरा मस्तच Happy

अभिषेक Rofl तुझं इमॅजिनेशन ही जोर्दारे.. बरं झालं तो चियांग मू भारतात आला नव्हता नाहीतर त्याच्या ही कल्पनेचे वारू चौखूर उधळले गेले असते.. हुश्श!!!!

वर्षूताई,

>> बरं झालं तो चियांग मू भारतात आला नव्हता नाहीतर त्याच्या ही कल्पनेचे वारू चौखूर उधळले गेले असते..

त्याचं वारू नसलं म्हणून काय झालं. दिव्य प्रतिभावंत मायबोलीकर आहेत ना! Biggrin सुरुवात हस्तप्रक्षालनपात्र (उपाख्य फिंगरबोल) पासून करूया की! Lol

आ.न.,
-गा.पै.

Pages